Indonesian

Marathi

Ezekiel

13

1TUHAN berkata kepadaku,
1त्यानंतर परमेश्वराचा संदेश मला मिळाला. तो म्हणाला,
2"Hai manusia fana, kecamlah nabi-nabi Israel yang mengucapkan ramalan karangannya sendiri. Suruhlah mereka mendengarkan perkataan-Ku."
2“मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलच्या संदेष्ट्यांशी बोल. ते संदेष्टे खरे म्हणजे माझ्यावतीने बोलत नसून त्यांना पाहिजे ते सांगतात म्हणून तू त्यांच्याशी बोल. त्यांना पुढील गोष्टी सांग. ‘परमेश्वराकडून आलेला हा संदेश ऐका.
3TUHAN Yang Mahatinggi berkata, "Celakalah nabi-nabi yang bodoh itu! Ilhamnya didapatnya dari khayalannya sendiri dan penglihatannya palsu belaka.
3परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो की दुष्ट संदेष्ट्यांनो, तुमचे वाईट होईल. तुम्ही दृष्टान्तांत पाहिलेल्या गोष्टी लोकांना न सांगता, तुमच्या मनाचेच सांगता.
4Hai Israel, nabi-nabimu itu tak berguna, sama seperti serigala-serigala yang hidup di tengah-tengah puing kota.
4“इस्राएल, ओसाड, पडक्या वास्तूंतून धावणाऱ्या कोल्ह्यांप्रमाणे तुझे संदेष्टे असतील.
5Mereka tidak menjaga tempat-tempat di mana tembok-temboknya runtuh, dan juga tidak memperbaiki tembok-tembok itu. Jadi, Israel tak dapat dipertahankan apabila pecah perang pada hari Aku, TUHAN datang menghukum.
5नगरीच्या तटबंदीच्या भगदाडांजवळ तू सैनिक ठेवले नाहीस वा इस्राएलवासीयांच्या रक्षणासाठी भिंतही बांधली नाहीस. तेव्हा परमेश्वराने तुला शिक्षा करायची वेळ येताच, तू युद्धात हरशील.
6Penglihatan-penglihatan mereka palsu dan ramalan-ramalan mereka hanyalah dusta. Mereka mengaku membawa pesan dari Aku, padahal Aku tak pernah mengutus mereka. Bagaimana mungkin mereka mengharapkan ramalan mereka itu akan terjadi?
6“खोट्या संदेष्ट्यांनी दृष्टान्त पाहिल्याचे सांगितले. ते जादू करतात आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सांगतात. पण ते खोटे बोलतात. त्यांना परमेश्वराने पाठविल्याचे ते सांगतात. पण ते खोटे आहे. खोटे खरे ठरावे म्हणून ते अजूनही वाट पाहत आहेत.
7Aku, TUHAN Yang Mahatinggi berkata kepada mereka, 'Penglihatan-penglihatan itu palsu dan ramalan-ramalanmu itu dusta. Kamu berkata bahwa semua itu adalah pesan-Ku, padahal Aku tak pernah berbicara kepadamu! Karena itu Aku akan menjadi lawanmu.
7“खोट्या संदेष्ट्यांनो, तुम्ही पाहिलेले दुष्टान्त खरे नाहीत. तुम्ही जादू केली व असे घडेल म्हणून सांगितले. पण तुम्ही खोटे बोललात, परमेश्वराने असे सांगितले असे तुम्ही म्हणालात. पण मी तुमच्याशी बोललोच नाही.”
8(13:7)
8पण आता परमेश्वर, माझ्या प्रभु, खरोखरच बोलेल. तो म्हणतो, “तुम्ही खोट्या गोष्टी सांगितल्या, तुम्ही खोटे दुष्टान्त पाहिले. म्हणून मी (देव) तुमच्याविरुद्ध आहे.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, असे म्हटले.
9Aku akan menghukum kamu, hai nabi-nabi yang mengucapkan ramalan dusta dan mengkhayalkan penglihatan-penglihatan! Kamu tak boleh lagi ikut memberi keputusan di dalam sidang-sidang umat-Ku. Nama-namamu akan dicoret dari daftar marga Israel, dan kamu tak akan pulang lagi ke tanah airmu. Maka tahulah kamu bahwa Akulah TUHAN Yang Mahatinggi.
9परमेश्वर म्हणतो, “खोटे दृष्टान्त पाहणाऱ्या आणि खोटे बोलणाऱ्या संदेष्ट्यांना मी शिक्षा करीन. माझ्या लोकांतून मी त्यांना बाजूला काढीन. इस्राएलच्या वंशजांच्या नामावळीत त्यांची नावे असणार नाहीत. ते इस्राएलच्या भूमीत परत येणार नाहीत. मगच तुम्हाला मी परमेश्वर व प्रभू असल्याचे कळेल.
10Hai nabi-nabi palsu! Kamu telah menyesatkan umat-Ku dengan mengatakan bahwa segalanya aman dan beres. Padahal sama sekali tidak! Umat-Ku telah mendirikan tembok dengan batu bata yang longgar pemasangannya, kemudian kamu datang dan mengapurnya.
10“ते खोटे संदेष्टे पुन्हा पुन्हा माझ्या लोकांशी खोटे बोलले. त्यांनी ‘शांती प्रस्थापित होईल.’ असे सांगितले. पण तेथे शांती नाही. भिंतीची चांगली दुरुस्ती करुन लोकांनी लढायला सज्ज होण्याची जरुरी आहे. पण त्याऐवजी लोक भिंतीना फक्त गिलावा करतात.
11Hai, nabi-nabi palsu, tembokmu akan runtuh. Aku akan menurunkan hujan lebat. Tembok itu akan dilanda angin topan dan ditimpa hujan es
11मी त्यांच्यावर गारांचा वर्षांव करीन आणि मुसळधार पाऊस (शत्रू - सैन्य) पाडीन, असे तू त्यांना सांग. जोराचे वारे वाहतील आणि तुफान येईल. मग तटबंदी पडेल.
12sehingga roboh, dan setiap orang akan bertanya apa gunanya tembok itu dikapur.'"
12भिंत पडेल आणि लोक संदेष्ट्यांना विचारतील ‘तुम्ही गिलावा केला होता, त्याचे काय झाले?”
13TUHAN Yang Mahatinggi berkata, "Dalam kemarahan-Ku, Aku akan mendatangkan angin topan, hujan lebat dan hujan es untuk menghancurkan tembok itu.
13परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी तुमच्यावर रागावलो आहे म्हणून मी वादळ उत्पन्न करीन, मुसळधार पाऊस पाडीन, गारांचा वर्षाव करीन आणि तुमचा संपूर्ण नाश करीन.
14Aku berniat untuk merubuhkan tembok yang kamu kapur itu, mengobrak-abriknya sehingga tinggal pondamennya saja. Tembok itu akan menimpa dan membunuh kamu semua. Maka tahulah kamu bahwa Akulah TUHAN.
14तुम्ही भिंतीला गिलावा करता. पण संपूर्ण तटबंदीच मी उद्ध्वस्त करीन. ती मी जमीनदोस्त करीन. ती तुमच्या अंगावर पडेल आणि मग तुम्हाला कळून चुकेल की मीच परमेश्वर आहे.
15Tembok itu dan kamu yang telah mengapurnya akan merasakan hebatnya amarah-Ku. Kemudian akan Kukatakan kepadamu bahwa tembok itu telah hilang lenyap, sama seperti kamu yang mengapurnya,
15मी माझा सगळा राग त्या तटबंदीवर व तिच्यावर गिलावा देणाऱ्या लोकांवर ओतून टाकीन. मग मी म्हणेन ‘आता भिंतही नाही आणि तिच्यावर गिलावा करणारेही राहिले नाहीत.’
16hai nabi-nabi palsu! Kamu meramalkan bahwa Yerusalem aman dan beres, padahal sama sekali tidak!" Begitulah kata TUHAN Yang Mahatinggi.
16“ह्या सर्व गोष्टी इस्राएलच्या खोट्या संदेष्ट्यांबाबत घडतील. ते यरुशलेमच्या लोकांशी बोलतात. ते शांतीचे भाकीत करतात. पण शांती मिळत नाही.” परमेश्वराने, माझ्या प्रभुने, हे सांगितले.
17TUHAN berkata, "Sekarang, hai manusia fana, perhatikanlah wanita-wanita yang berlagak nabiah di antara bangsamu. Kecamlah mereka,
17देव म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएल मधील स्त्री संदेष्ट्यांकडे पाहा. त्या माझ्यावतीने बोलत नाहीत. त्या त्यांच्या मनाचेच सांगतात. म्हणून तू माझ्यावतीने त्यांच्याविरुद्ध बोल. तू त्यांना पुढील गोष्टी सांगितल्या पाहिजेस.
18dan sampaikanlah apa yang Aku, TUHAN Yang Mahatinggi katakan kepada mereka: 'Celakalah kamu! Kamu membuat untuk semua orang gelang-gelang jimat dan kerudung-kerudung sakti supaya orang yang memakainya dapat menguasai hidup orang lain. Kamu ingin berkuasa atas hidup mati umat-Ku, dan kuasa itu kamu pakai demi keuntunganmu sendiri.
18“परमेश्वर, माझा प्रभू, ह्या गोष्टी सांगतो. स्त्रियांनो, तुमचे वाईट होईल. तुम्ही कापडाच्या पटृ्या करुन लोकांना बांगड्यांप्रमाणे घालायला देता, डोक्याला बांधण्यासाठीही विशेष प्रकारचे पट्टे करुन देता. तुम्ही लोकांना सांगता की ह्या गोष्टीमध्ये तुमच्या आयुष्याचे नियंत्रण करण्याची जादूची शक्ती आहे. स्वत:ला जगविण्यासाठी तुम्ही लोकांना अशा रीतीने जाळ्यात पकडता!
19Kamu telah menghina Aku di depan umat-Ku hanya untuk mendapat beberapa genggam jelai dan beberapa potong roti. Orang-orang yang tak bersalah, kamu bunuh sedangkan orang-orang yang patut mati kamu biarkan hidup. Lalu kamu mendustai umat-Ku dan mereka percaya kepadamu.'"
19तुम्ही मला लोकांच्यापुढे क्षुद्र बनविता. तुम्ही ओंजळभर सातू व भाकरीच्या काही तुकड्यांसाठी त्यांना माझ्याविरुद्ध फिरविता. माझ्या लोकांशी तुम्ही खोटे बोलता. त्या लोकांना खोटे आवडते. तुम्ही ज्यांनी जगायला पाहिजे त्यांना मारता आणि ज्यांनी मरायला पाहिजे, त्यांना जगविता.
20TUHAN Yang Mahatinggi berkata kepada wanita-wanita yang berlagak nabiah itu, "Aku benci melihat gelang-gelang jimat yang kamu pakai untuk menguasai hidup mati umat-Ku. Gelang-gelang itu akan Kurenggut dari pergelanganmu, dan orang-orang yang kamu kuasai akan Kubebaskan.
20म्हणून परमेश्वर, प्रभू, तुम्हाला पुढील गोष्टी सांगतो, तुम्ही बांगड्यासारखे कापडी पट्टे करुन लोकांना सापळ्यात पकडू बघता पण मी त्यांना मुक्त करीन. तुमच्या हातातील ते कापडी पट्टे मी फाडून टाकीन, म्हणजे ते लोक पिंजऱ्यातून सोडून दिलेल्या पाखराप्रमाणे स्वतंत्र होतील.
21Kerudung-kerudung saktimu akan Kusobek, dan umat-Ku akan Kuhindarkan dari pengaruh jahatmu untuk selama-lamanya. Maka tahulah kamu bahwa Akulah TUHAN.
21“मी डोक्याला बांधायचे पट्टे तोडीन आणि माझ्या माणसांना तुमच्या पकडीतून सोडवीन. तुमच्या सापळ्यातून ते निसटतील आणि मगच तुम्हाला कळेल की मी परमेश्वर आहे.
22Orang-orang baik yang tidak mau Kuapa-apakan, kamu buat kecil hati dengan kebohonganmu. Orang-orang jahat kamu buat besar hati supaya tetap berdosa dan tidak diselamatkan.
22“तुमचे संदेष्टे खोट्या गोष्टी सांगतात. सज्जनांना त्याचा त्रास होतो. मला हे पंसत नाही. तुम्ही वाईट लोकांना पठिंबा देता, त्यांना उत्तेजन देता. त्यांना त्यांचे मार्ग बदलायला सांगत नाही. त्यांचे जीव वाचवायचा प्रयत्न करीत नाही.
23Sekarang berakhirlah penglihatan-penglihatan palsu dan ramalan-ramalan dustamu. Kuselamatkan umat-Ku dari pengaruh jahatmu. Maka tahulah kamu bahwa Akulah TUHAN."
23तेव्हा ह्यापुढे तुम्हाला तुमचे निरर्थक दृष्टान्त दिसणे बंद होईल तुम्ही जादूही करणार नाही. तुमच्यापासून मी माझ्या लोकांचे रक्षण करीन. मग तुम्हाला कळेल की मीच खरा परमेश्वर आहे.”