Indonesian

Marathi

Ezekiel

14

1Beberapa orang dari pemimpin bangsa Israel datang kepadaku untuk menanyakan kehendak TUHAN.
1इस्राएलमधील काही वडीलधारी माणसे (नेते) माझ्याकडे आले. माझ्याशी बोलण्यासाठी ते बसले.
2Lalu berkatalah TUHAN kepadaku,
2मला परमेश्वराचा संदेश आला. तो म्हणाला,
3"Hai manusia fana, orang-orang ini telah mempercayakan dirinya kepada berhala sehingga mereka terjerumus ke dalam dosa. Masakan Aku mau ditanyai oleh mereka?
3“मानवपुत्रा, हे लोक तुझ्याशी बोलायला आले आहेत. मला तू त्यांचा हिताच्या गोष्टी विचाराव्यास अशी त्यांची इच्छा आहे. पण अजूनही त्यांच्याजवळ त्या अमंगळ मूर्ती आहेत. त्यांना पाप करायला लावणाऱ्या ह्या गोष्टी त्यांनी जवळ बाळगल्या आहेत. ते अजूनही त्यांची पूजा करतात. मग ते सल्ला विचारण्यासाठी माझ्याकडे कशाला येतात? मी त्यांच्या प्रश्र्नंना उत्तर द्यावे का? नाही!
4Sebab itu, katakanlah kepada mereka bahwa Aku, TUHAN Yang Mahatinggi berpesan begini, 'Setiap orang Israel yang telah mempercayakan dirinya kepada berhala dan membiarkan dirinya terjerumus ke dalam dosa, lalu datang untuk minta nasihat kepada seorang nabi, akan Kujawab sendiri dengan jawaban yang selayaknya bagi berhala-berhalanya yang banyak itu!
4पण उत्तर मी त्यांना देईन. मी त्यांना शिक्षा करीन. तू ह्या गोष्टी त्यांना सांगच. ‘परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो : जर कोणी इस्राएली संदेष्ट्यामार्फत मला सल्ला विचारु लागला, तर संदेष्ट्याऐवजी मीच त्याच्या प्रश्र्नाला उत्तर देईन. जरी त्याच्याजवळ त्या घाणेरड्या मूर्ती असल्या, त्याला पापाला प्रवृत करणाऱ्या गोष्टी त्याने जवळ बालगल्या आणि त्यांची तो अजूनही पूजा करीत असला, तरी मी त्याच्या प्रश्र्नाला उत्तर देईन. त्याच्याजवळ त्या अंमगळ मूर्ती असल्या, तरी मी त्याच्याशी बोलेन.
5Semua berhala itu telah menjauhkan umat-Ku daripada-Ku, tetapi mudah-mudahan dengan jawaban-Ku itu umat-Ku akan kembali kepada-Ku.'
5का? कारण मला त्यांच्या हृदयात हात घालायचा आहे. त्या गलिच्छ मूर्तीसाठी त्यांनी माझा त्याग केला असला तरी, मी त्यांच्यावर प्रेम करतो, हे मला त्यांना दाखवायचे आहे.’
6Beritahukanlah juga kepada orang Israel bahwa Aku, TUHAN Yang Mahatinggi berkata kepada mereka, 'Bertobatlah dari dosa-dosamu, dan tinggalkanlah berhala-berhalamu yang memuakkan itu.'
6“म्हणून इस्राएलच्या लोकांना पुढील गोष्टी सांग. परमेश्वर, माझा प्रभु, म्हणतो, ‘त्या अमंगळ मूर्तीचा त्याग करुन माझ्याकडे परत या. त्या भयानक खोट्या देवांपासून दूर व्हा.
7Setiap orang Israel atau orang asing yang tinggal di antara bangsa Israel, yang menjauhi Aku dan mempercayakan dirinya kepada berhala, lalu minta nasihat kepada seorang nabi, akan Kujawab sendiri.
7एखादा इस्राएली वा इस्राएलमध्ये राहणारा परका हिताच्या गोष्टीसाठी संदेष्ट्याकडे जाऊन माझा सल्ला काय आहे ते विचारू लागला, तर मी त्याला सल्ला देईन. त्याच्याजवळ जरी त्या घाणेरड्या मूर्ती असल्या, त्याला पाप करायला लावणाऱ्या गोष्टी त्याने जवळ बाळगल्या आणि तो त्यांची अजूनही पूजा करीत असला, तरी मी त्याच्या प्रश्र्नाला उत्तर देईन. आणि माझे उत्तर असे असेल.
8Aku akan melawan dia dan menjadikan dia contoh bagi yang lain. Aku akan mengucilkan dia dari masyarakat umat-Ku, maka tahulah umat-Ku bahwa Akulah TUHAN.
8मी त्याच्याकडे पाठ फिरवीन. मी त्याचा नाश करीन. तो इतरांसाठी एक उदाहरण होईल. लोक त्याला हसतील. माझ्या लोकांतून मी त्याला बाजूला काढीन. मगच तुम्हाला कळेल की मीच परमेश्वर आहे.
9Kalau seorang nabi telah ditipu sehingga memberi jawaban yang salah, Akulah yang telah menipunya. Aku, TUHAN Yang Mahatinggi akan mengucilkan dia dari orang-orang Israel.
9जर एखाद्या संदेष्ट्याने चुकीचे उत्तर दिले, तर मी, देवाने त्याला तसे करण्यास भाग पाडले आहे. मी त्याच्याविरुद्ध माझे सामर्थ्य वापरीन. मी त्याचा नाश करीन आणि माझ्या माणसांतून इस्राएल लोकातून त्याला काढून टाकीन.
10Baik nabi itu maupun mereka yang minta nasihatnya, akan mendapat hukuman yang sama.
10म्हणजेच सल्ला विचारणारा, आणि त्याला उत्तर देणारा (संदेष्टा) ह्या दोघांनाही सारखीच शिक्षा होईल.
11Semua itu Kulakukan supaya orang Israel jangan lagi menjauhi Aku dan jangan pula menajiskan diri dengan dosa. Dengan demikian mereka akan menjadi umat-Ku, dan Aku menjadi Allah mereka." Aku, TUHAN Yang Mahatinggi telah berbicara.
11का? म्हणजे तो संदेष्टा माझ्या माणसांना माझ्यापासून दूर नेणार नाही, माझे लोकही पापांत बरबटणार नाहीत. मग ते माझे खास लोक होतील, आणि मीच त्यांचा देव असेन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,
12TUHAN berkata kepadaku, "Hai manusia fana,
12मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला,
13bila suatu negeri berdosa dan tak setia kepada-Ku, Aku akan menghukum negeri itu. Aku akan menghancurkan persediaan makanannya, mendatangkan bencana kelaparan dan membunuh baik manusia maupun binatang.
13“मानवपुत्रा, माझा त्याग करणाऱ्या आणि पाप करणाऱ्या राष्ट्रांला मग ते राष्ट्र कोणतेही असो मी शिक्षा करीन. त्यांचा अन्न पुरवठा मी बंद करीन. मी कदाचित् देशात दुष्काळ पाडीन व लोक व प्राणी यांना देशातून बाहेर काढीन.
14Sekalipun Nuh, Danel dan Ayub tinggal di tempat itu, maka kebaikan mereka bertiga hanya dapat menyelamatkan nyawa mereka sendiri saja. Aku, TUHAN Yang Mahatinggi telah berbicara.
14नोहा, दानीएल व इयोब हे तिथले असले, आणि तरीसुध्दा मी त्या देशाला शिक्षा करीन. आपल्या चांगुलपणाने फारतर ते स्वत:चा जीव वाचवू शकत असले तरी त्या देशाला वाचवू शकत नाही.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
15Boleh jadi Aku mendatangkan binatang-binatang buas untuk menerkam penduduk negeri itu, sehingga daerah itu menjadi sangat berbahaya dan tak seorang pun berani melewatinya.
15देव म्हणाला, “अथवा, कदाचित् मी हिंस्र प्राणी त्या देशात सोडीन आणि ते सर्व लोकांना ठार मारतील. त्या हिंस्र प्राण्यांमुळे कोणीही त्या देशामधून प्रवास करणार नाही.
16Sekalipun Nuh, Danel dan Ayub tinggal disitu, maka demi Aku, Allah yang hidup, TUHAN Yang Mahatinggi, mereka tidak akan dapat menyelamatkan siapa saja, bahkan anak mereka sendiri pun tidak. Hanya mereka sendiri saja yang selamat, sedangkan negeri itu akan menjadi gurun.
16जर नोहा, दानीएल व इयोब तेथे राहात असते, तर मी त्यांचे रक्षण केले असते. ते तिघे स्वत: चे प्राण वाचवू शकले असते. पण माझ्या प्राणाची शपथ घेऊन मी प्रतिज्ञा करतो ते इतरांचे प्राण वाचवू शकले नसते. त्यांच्या मुला-मुलींनाही ते वाचवू शकले नसते. पापी देशाचा नाश केला जाईल.” परमेश्वर माझा प्रभू, हे म्हणाला.
17Boleh jadi Aku mendatangkan perang ke negeri itu, dan Kukirimkan senjata-senjata ampuh untuk membinasakan baik manusia maupun binatang.
17देव म्हणाला, “किंवा मी कदाचित् त्या देशावर चढाई करण्यासाठी शत्रूसैन्य पाठवीन. ते सैनिक त्या देशाचा नाश करतील. मी तेथील सर्व माणसांना व प्राण्यांना देशाबाहेर हालवीन.
18Dan sekalipun ketiga orang tadi tinggal di situ, maka demi Aku, Allah yang hidup, TUHAN Yang Mahatinggi, mereka tidak akan dapat menyelamatkan siapa saja, bahkan anak mereka sendiri pun tidak. Hanya mereka sendiri saja yang selamat.
18जर नोहा, दानीएल व इयोब तेथे राहत असते, तर मी त्या तिघा सज्जानांना वाचविले असते. ते स्वत:चा प्राण वाचवू शकले असते पण माझी शपथ घेऊन वचन देतो की ते इतरांना म्हणजेच त्यांच्या मुलामुलींनासुध्दा वाचवू शकले नसते. त्या पापी देशाचा नाश केला जाईल” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.
19Boleh jadi Aku mendatangkan wabah penyakit ke negeri itu, dan Kuluapkan amarah-Ku terhadapnya sehingga baik manusia maupun binatang akan binasa.
19देव म्हणाला, “वा मी त्या देशात कदाचित् रोगराई पसरवीन. मी माझ्या क्रोधाचा त्यांच्यावर वर्षाव करीन. मी त्या देशातील सर्व लोकांचा व प्राण्यांचा मुक्काम तेथून हालवीन.
20Dan sekalipun Nuh, Danel dan Ayub tinggal di situ, maka demi Aku, Allah yang hidup, TUHAN Yang Mahatinggi, mereka tak akan dapat menyelamatkan siapa saja, bahkan anak mereka sendiri pun tidak. Hanya mereka sendiri saja yang selamat karena kebaikan mereka."
20तेथे जर नोहा, दानीएल व इयोब राहात असते, तर ते सज्जन असल्यामुळे मी त्यांना वाचविले असते. ते तिघे स्वत:चे प्राण वाचवू शकले असते. पण माझी शपथ घेऊन वचन देतो की ते इतराना म्हणजे त्यांच्या मुलामुलींना सुद्धा वाचवू शकले नसते.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
21TUHAN Yang Mahatinggi berkata, "Aku akan menjatuhkan keempat hukuman-Ku yang paling dahsyat ke atas Yerusalem untuk memusnahkan baik manusia maupun binatang. Hukuman itu ialah: perang, bala kelaparan, binatang buas dan wabah penyakit.
21मग परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “यरुशलेमाची स्थिती किती वाईट होणार त्याचा विचार कर. शत्रू सैनिक, उपासमार, रोगराई आणि हिंस्र प्राणी या चारही शिक्षा मी त्यांना करीन. त्या देशातील सर्व माणसांना व प्राण्यांचा मी नाश करीन.
22Seandainya ada yang berhasil lolos dan menyelamatkan anak-anaknya, perhatikanlah mereka apabila mereka datang kepadamu. Lihat bagaimana jahatnya mereka, maka kamu akan sadar bahwa tepatlah tindakan-Ku untuk menghukum Yerusalem.
22काही लोक त्या देशातून निसटतील, ते आपल्या मुलांमुलीना घेऊन, मदतीसाठी तुझ्याकडे येतील. मग ते लोक खरोखर किती वाईट आहेत, हे तुला कळेल आणि यरुशलेमवर मी आणलेली सर्व संकटे पाहून तुला बरेच वाटेल.
23Lalu kamu pun akan mengerti bahwa segala tindakan-Ku itu mempunyai alasan. Aku TUHAN Yang Mahatinggi telah berbicara."
23ते कसे जगतात आणि कोणत्या वाईट गोष्टी करतात हे तू पाहिल्यावर, त्यांना शिक्षा करण्यास सबळ कारण आहे, हे तुला पटेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.