1Mazmur Daud. TUHAN adalah cahayaku dan keselamatanku, tak ada yang kutakuti. TUHAN adalah benteng perlindunganku, aku tak akan gentar.
1परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस. मला कुणाचीही भीती बाळगायला नको. परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे. म्हणून मी कुणालाही भीत नाही.
2Bila aku diserang penjahat yang mau membunuh aku, merekalah yang tersandung dan jatuh.
2माझे शत्रू जेव्हा माझ्यावर कदाचित् हल्लाकरतील ते कदाचित् माझ्या शरीराचा नाशकरायचा प्रयत्न करतील. माझे शत्रू माझ्यावर हल्ला करुन माझा नाश करण्याचा प्रयत्न करतील.
3Sekalipun aku dikepung pasukan yang besar, aku tak akan takut. Sekalipun pecah perang melawan aku, aku tetap berharap.
3परंतु माझ्या सभोवती सैन्य असले तरी मी घाबरणार नाही. युध्दात लोकांनी माझ्यावर हल्ला केला तरी मी घाबरणार नाही. का? कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे.
4Hanya satu yang kuminta kepada TUHAN, hanya inilah yang kuingini: diam di Rumah TUHAN seumur hidupku, untuk merasakan kebaikan TUHAN dan mohon bimbingan-Nya.
4मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे. मला हे मागायचे आहे, “मला आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात बसू द्या म्हणजे मी परमेश्वराचे सौंदर्य बघेन आणि त्याच्या राजवाड्याला भेट देईनं.”
5TUHAN melindungi aku di waktu kesesakan; Ia menyembunyikan aku di dalam Rumah-Nya, dan mengangkat aku ke atas gunung batu.
5मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करील. तो मला त्याच्या तंबूत लपवेल तो मला त्याच्या सुरक्षित जागी नेईल.
6Sekarang aku menang atas musuh di sekelilingku; maka dengan sorak gembira kupersembahkan kurban syukur di Rumah-Nya; aku mau menyanyi dan memuji TUHAN.
6माझ्या शत्रूंनी माझ्या भोवती वेढा घातला आहे. परंतु त्यांचा पराभव करायला परमेश्वर मला मदत करील नंतर मी त्याच्या डेऱ्यात बळी अर्पण करीन. मी बळी देताना आनंदाने ओरडेन. मी परमेश्वराला आदर दाखविण्यासाठी गाणीगाईन, वाद्ये वाजवीन.
7Ya TUHAN, dengarlah bila aku berseru kepada-Mu, kasihanilah aku dan jawablah aku!
7परमेश्वरा, माझा आवाज ऐक मला उत्तर दे. माझ्याशी दयेने वाग.
8Engkau berkata, "Datanglah menyembah Aku." Kujawab, "Aku segera datang, ya TUHAN;
8परमेश्वरा मला तुझ्याशी बोलायचे आहे. मला अगदी माझ्या ह्दयातून तुझ्याशी बोलायचे आहे. परमेश्वरा, मी तुझ्यासमोर तुझ्याशी बोलायला आलो आहे.
9janganlah bersembunyi daripadaku." Janganlah marah dan menolak hamba-Mu, sebab Engkaulah yang telah menolong aku. Janganlah membuang atau meninggalkan aku, ya Allah, penyelamatku.
9परमेश्वरा, माझ्यापासून असा दूर जाऊ नकोस. तुझ्या सेवकावर रागावू नकोस आणि दूर जाऊ नकोस. मला मदत कर! मला दूर लोटू नकोस. मला सोडू नकोस. देवा, तूच माझा तारणारा आहेस.
10Sekalipun ayah dan ibu meninggalkan aku, Allah akan memelihara aku.
10माझे आईवडील मला सोडून गेले. परंतु परमेश्वराने मला घेतले आणि त्याचे बनवले.
11Tunjukkanlah aku kehendak-Mu, ya TUHAN, bimbinglah aku di jalan yang lurus, sebab musuhku amat banyak.
11परमेश्वरा, मला शत्रू आहेत म्हणून तू मला तुझे मार्ग शिकव. मला योग्य गोष्टी करायला शिकव.
12Jangan menyerahkan aku kepada nafsu lawanku, yang menyerang aku dengan dusta dan ancaman.
12मला माझ्या शत्रुंचा बळी होऊ देऊ नको त्यांनी माझ्याबद्दल खोटेनाटे सांगितले. मला दुख देण्यासाठी त्यांनी माझ्याबद्दल खोटे सांगितले.
13Aku yakin akan mengalami kebaikan TUHAN dalam hidupku di dunia ini.
13मला खरोखरच असा विश्वास वाटतो की मरण्याआधी मला परमेश्वराचा चांगुलपणा दिसेल.
14Berharaplah kepada TUHAN, kuatkanlah dan teguhkanlah hatimu; ya, berharaplah kepada TUHAN!
14परमेश्वराच्या मदतीची वाट बघ. सामर्थ्यवान आणि धीट हो व परमेश्वराच्या मदतीची वाट पहा.