Indonesian

Marathi

Psalms

28

1Mazmur Daud. Ya TUHAN, kepada-Mu aku berseru, Engkau pembelaku, dengarlah seruanku. Bila Engkau membisu terhadapku, aku seperti orang yang turun ke liang kubur.
1परमेश्वरा, तू माझा खडक आहेस. मी तुला मदतीसाठी बोलवीत आहे. माझ्या प्रार्थनेला तुझे कान बंद करु नकोस. तू जर माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर दिले नाहीस तर मी थडग्यातल्या मेलेल्या माणसासारखा आहे असे लोकांना वाटेल.
2Dengarlah permohonanku bila aku berteriak minta tolong, dan mengangkat tanganku ke arah Rumah-Mu yang suci.
2परमेश्वरा, मी माझे बाहू उभारुन तुझ्यापवित्र जागेकडे तोंड करुन प्रार्थना करतो. मी तुला साद घालीन त्यावेळी माझे ऐक माझ्यावर दया दाखव.
3Jangan menumpas aku bersama orang durhaka, bersama orang yang melakukan kejahatan. Mereka berbicara dengan ramah, tetapi hati mereka penuh kebusukan.
3परमेश्वरा, मी वाईट कृत्ये करणाऱ्या दुष्ट लोकांसारखा आहे असे मला वाटत नाही. ते लोक त्यांच्या शेजाऱ्यांना “शांती या शब्दाने अभिवादन करतात. परंतु मनात मात्र ते शेजाऱ्यांचे वाईटच चिंतीत असतात.
4Hukumlah mereka karena perbuatan mereka, karena kejahatan yang mereka lakukan. Hukumlah mereka sesuai dengan perbuatan mereka; berilah mereka hukuman yang setimpal.
4परमेश्वरा, ते लोक दुसऱ्यांचे वाईट करतात म्हणून त्यांचे वाईट होऊ दे. त्यांना त्यांच्या कर्माप्रमाणे शिक्षा कर.
5Mereka tidak mengindahkan perbuatan TUHAN, atau apa yang dikerjakan-Nya. Maka Ia akan menghukum mereka, dan membinasakan mereka untuk selama-lamanya.
5वाईट लोकांना परमेश्वराची चांगली कृत्ये कळत नाहीत. नाही, त्यांना ते कळू शकत नाही. ते फक्त नाश करण्याचा प्रयत्न करतात.
6Terpujilah TUHAN, sebab Ia telah mendengar permohonanku.
6परमेश्वराची स्तुती कर. त्याने माझी दयेसाठी केलेली प्रार्थना ऐकली.
7TUHAN pelindung dan pembelaku, aku percaya kepada-Nya. Ia menolong dan menggirangkan hatiku, aku memuji Dia dengan lagu syukur.
7परमेश्वर माझी शक्ती आहे. तो माझी ढाल आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याने मला मदत केली. मी खूप आनंदी आहे आणि मी त्याची स्तुती करणारी गाणी गातो.
8TUHAN memberi kekuatan kepada umat-Nya, Ia membela dan menyelamatkan raja pilihan-Nya.
8परमेश्वर त्याने निवडलेल्या लोकांचे रक्षण करतो. परमेश्वर त्याला वाचवतो. परमेश्वर त्याची शक्ती आहे.
9Selamatkanlah umat-Mu, ya TUHAN, berkatilah orang-orang milik-Mu. Jadilah seperti seorang gembala bagi mereka, dan jagalah mereka untuk selama-lamanya.
9देवा, तुझ्या लोकांना वाचव जे तुझे आहेत त्यांना आशीर्वाद दे. त्याना वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.