1Aku datang ke kebunku, dinda, pengantinku, kukumpulkan mur dan rempah-rempahku; kumakan sarang lebah dan maduku, kuminum susu dan air anggurku.
1माझ्या प्रिये, माझ्या वधू, मी माझ्या बागेत गेलो. मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये घेतली. मी माझा मध व मधाचे पोळे खाल्ले. मी माझा द्राक्षारस व दूध प्यालो. प्रिय मित्रांनो, खा, प्या. प्रेमाने धुंद व्हा.
2Aku tidur, namun hatiku berjaga. Dengarlah, kekasihku mengetuk pintu.
2मी झोपलेली आहे. पण माझे हृदय जागे आहे. माझा प्रियकर दार वाजवतो ते मी ऐकते. “प्रिये माझ्यासाठी दार उघड माझ्या प्रेमा, माझ्या कबुतरा, माझ्या सर्वोत्कृष्टा! माझे डोके दवाने ओले झाले आहे. माझे केस रात्रीच्या धुक्याने ओले झाले आहेत.”
3Bajuku sudah kulepaskan; apakah akan kupakai lagi? Kakiku sudah kubasuh, apakah akan kukotori lagi?
3“मी माझा पोषाख काढून टाकला आहे. मला तो पुन्हा घालायचा नाही. मी माझे पाय धुतले आहेत. मला ते पुन्हा घाण करायचे नाहीत.”
4Berdebar-debar hatiku karena kekasihku memegang gagang pintu.
4पण माझ्या प्रियकराने फटीतून हात घातला आणि माझे हृदय त्याच्यासाठी हेलावले.
5Maka bangunlah aku hendak membuka pintu bagi kekasihku. Mur menetes dari tangan dan jari-jariku, membasahi pegangan kancing pintu.
5माझ्या प्रियकराला दार उघडायला मी उठले. माझ्या हातातून गंधरस गळत होता. इतर सुवासिक द्रव्ये माझ्या बोटांतून कुलुपाच्या कडीवर गळत होती.
6Kubukakan pintu bagi kekasihku, tetapi ia telah berbalik dan pergi. Aku sangat merindukan suaranya; kucari dia, tapi sia-sia. Kupanggil namanya, tapi ia tak menyahut.
6मी माझ्या प्रियकरासाठी दार उघडले. पण माझा प्रियकर तोंड फिरवून निघून गेला होता. तो गेला तेव्हा मी जवळ जवळ गतप्राण झाले. मी त्याला शोधले पण तो मला सापडू शकला नाही. मी त्याला हाक मारली पण त्याने मला ओ दिली नाही.
7Aku ditemui para peronda kota; mereka memukul dan melukai aku, selendangku mereka ambil dengan paksa.
7शहरावर पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना मी दिसले. त्यांनी मला मारले, इजा केली. भिंतीवरच्या पहारेकऱ्यांनी माझा अंगरखा घेतला.
8Berjanjilah, hai putri-putri Yerusalem, bila kamu menemukan kekasihku, kabarkanlah kepadanya, bahwa aku sakit asmara.
8यरुशलेमच्या स्त्रियांनो! मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला माझा प्रियकर दिसला, तर त्याला सांगा की मी प्रेमविव्हळ झाले आहे.
9Apakah kekasihmu melebihi kekasih-kekasih lain, hai gadis yang paling jelita? Apakah kekasihmu melebihi kekasih-kekasih lain, sehingga engkau menyuruh kami berjanji?
9सुंदर स्त्रिये! तुझा प्रियकर इतर प्रियकरांहून वेगळा कसा? तो इतर प्रियकरांपेक्षा चांगला आहे का? म्हणूनच तू आम्हाला वचन द्यायला सांगत आहेस का?
10Kekasihku gagah dan tampan, unggul di antara sepuluh ribu orang.
10माझा प्रियकर उन्हाने काळवंडला आहे व तेजस्वी दिसतो. तो दहा हजार माणसात उठून दिसेल.
11Kepalanya seperti emas, emas murni, rambutnya berombak dan hitam, sehitam gagak.
11त्याचे मस्तक शुध्द सोन्याप्रमाणे आहे. त्याचे केस कुरळे आहेत आणि डोंबकावळ्यासारखे काळे आहेत.
12Matanya bagaikan merpati pada mata air, merpati bermandi susu, duduk di tepi kolam.
12त्याचे डोळे झऱ्याजवळच्या कबुतरासारखे आहेत, दुधाच्या थारोळ्यातील कबुतरासारखे आहेत कोदंणातल्या हिऱ्यासारखे आहेत.
13Pipinya seperti kebun rempah yang wangi, bibirnya bunga bakung yang meneteskan mur asli.
13त्याचे गाल मसाल्याच्या पदार्थांच्या बागेप्रमाणे आहेत, अत्तरासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांसारखे आहेत. त्याचे ओठ सुंगध गळणाऱ्या कमलपुष्पाप्रमाणे आहेत.
14Tangannya elok, bercincin emas dengan permata, tubuhnya bagaikan gading bertatah batu nilam.
14त्याचे बाहू रत्नांनी जडवलेल्या सोन्याच्या कांबीप्रमाणे आहेत. त्याचे शरीर नीलमणी जडवलेल्या मऊ हस्तिदंतासारखे आहे.
15Kakinya seperti tiang-tiang marmer putih, dengan alas emas murni. Perawakannya segagah gunung-gunung di Libanon, dan seanggun pohon aras.
15त्याचे पाय सोन्याचा पाया असलेल्या संगमरवरी खांबासारखे आहेत. तो लबानोनमधल्या गंधसरुच्या झाडासारखा उंच उभा राहतो.
16Teramat manis tutur katanya, segala sesuatu padanya menarik. Begitulah kekasih dan sahabatku, hai putri-putri Yerusalem!
16होय, यरुशलेमच्या स्त्रियांनो, माझा प्रियकर खूप हवाहवासा वाटणारा आहे. त्याचे तोंड सर्वांत गोड आहे. तोच माझा प्रियकर, तोच माझा सखा आहे.