1Ke mana kekasihmu pergi, hai gadis yang paling jelita? Ke mana kekasihmu pergi, agar kami ikut mencarinya?
1सुंदर स्त्रिये! तुझा प्रियकर कुठे गेला आहे? आम्हाला सांग म्हणजे आम्ही त्याला शोधण्यात तुला मदत करु शकू.
2Kekasihku pergi ke kebunnya, ke kebun rempah-rempah untuk menggembalakan domba-domba di kebun, dan memetik bunga-bunga bakung.
2माझा प्रियकर त्याच्या बागेत गेला. मसाल्याच्या फुलांच्या ताटव्यात गेला. तो बागेत खाऊ घालायला आणि कमलपुष्पे गोळा करायला गेला.
3Aku milik kekasihku, dan dia milikku, ia menggembalakan domba-domba di tengah bunga-bunga bakung.
3मी माझ्या प्रियकराची आहे. तो माझा आहे. कमलपुष्पात खाऊ घालणारा तोच माझा प्रियकर आहे.
4Engkau cantik, manisku, secantik kota Yerusalem, seelok kota Tirzah. Engkau sangat mempesonakan, seperti bala tentara dengan panji-panjinya.
4प्रिये तू तिरझा नगरीप्रमाणे सुंदर आहेस. यरुशलेमसारखी आल्हाददायक आहेस आणि तटबंदी असलेल्या शहरासारखी भयंकर आहेस.
5Palingkanlah wajahmu daripadaku, sebab pandanganmu membingungkan aku. Rambutmu seperti kawanan kambing yang menuruni bukit-bukit Gilead.
5माझ्याकडे बघू नकोस! तुझे डोळे मला उद्दीपित करतात. लहान बकऱ्या गिलाद पर्वताच्या उतरावरुन नाचत खाली जातात तसे तुझे केस लांब आणि मोकळे आहेत.
6Gigimu putih seperti kawanan domba yang baru dicukur dan dimandikan; berpasangan seperti anak-anak domba kembar, satu pun tak ada yang hilang.
6तुझे दात नुकत्याच आंघोळ करुन आलेल्या बकरीसारखे पांढरे शुभ्र आहेत. त्या सगळ्या जुळ्यांना जन्म देतात आणि त्यांच्यापैकी एकीचेही बछडे दगावलेले नाही.
7Pipimu seperti belahan buah delima, tersembunyi di balik cadarmu.
7बुरख्याखाली असलेली तुझी कानशिले डाळींबाच्या फोडींसारखी आहेत.
8Biarpun ada enam puluh permaisuri, dan delapan puluh selir, serta gadis-gadis banyak sekali,
8तिथे कदचित 60 राण्या आणि 80 दासी असतील आणि तरुण स्त्रिया अगणित असतील.
9namun hanya satulah merpatiku, idamanku, anak tunggal kesayangan ibunya. Gadis-gadis melihat dan memuji dia, para permaisuri dan selir kagum padanya.
9पण माझ्यासाठी मात्र फक्त एकच स्त्री आहे. माझे कबुतर, माझी सर्वोत्कृष्ट स्त्री. ति तिच्या आईची लाडकी आहे. आईचे सगळ्यात आवडते अपत्य आहे. तरुण स्त्रिया तिला पाहतात आणि तिची स्तुती करतात. राण्या आणि दासीसुध्दा तिची स्तुती करतात.
10Siapakah dia yang datang laksana fajar merekah, seindah bulan purnama, secerah sang surya? Ia sangat mempesonakan, seperti bala tentara dengan panji-panjinya.
10ती तरुण स्त्री कोण आहे? ती पहाटेप्रमाणे चमकते आहे, ती चंद्रासारखी सुंदर आहे. सूर्यासारखी तेजस्वी आहे आणि आकाशातल्या सैन्याप्रमाणे भयंकर आहे.
11Aku datang ke kebun kenari, melihat kuntum-kuntum di lembah; entah pohon anggur sudah ada kuncupnya, dan pohon delima sudah berbunga.
11मी आक्रोडाच्या राईतून दरीतली फळे बघायला गेले. द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत का, डाळींबाना कळ्या आल्या आहेत का, ते बघायला गेले.
12Aku sangat merindukan cintamu, seperti kurindukan naik kereta perang bersama para bangsawan.
12मला काही कळायच्या आतच माझ्या आत्म्याने मला राजाच्या लोक रथात ठेवले.
13Menarilah, hai gadis Sulam, berputar-putarlah, supaya kami kagumi.
13शुलामिथ, परत ये, परत ये. म्हणजे आम्ही तुला बघू शकू, ती म्हानेम नाच करीत असताना टक लावून का तू शुलमिथकडे पहात आहेस?