1मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले तो म्हणाला,
1Y FUÉ á mí palabra de Jehová, diciendo:
2“मानवपुत्रा, सोईर पर्वताकडे पाहा, आणि माझ्यावतीने त्याच्याविरुद्ध बोल.
2Hijo del hombre, pon tu rostro hacia el monte de Seir, y profetiza contra él,
3त्याला सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “सेईर पर्वता, मी तुझ्याविरुद्ध आहे. मी तुला शिक्षा करीन. मी तुला उजाड करीन.
3Y dile: Así ha dicho el Señor Jehová: He aquí yo contra ti, oh monte de Seir, y extenderé mi mano contra ti, y te pondré en asolamiento y en soledad.
4तुझ्या गावांचा मी नाश करीन. तू ओसाड होशील. मग तुला कळून चुकेल की मी परमेश्वर आहे.
4A tus ciudades asolaré, y tú serás asolado; y sabrás que yo soy Jehová.
5का? कारण तू नेहमीच माझ्या माणसांच्या विरुद्ध होतास. इस्राएलच्या अखेरच्या शिक्षेच्या वेळी, त्यांच्या संकटकाळी, तू त्यांच्यावर तलवार चालविलीस.”
5Por cuanto tuviste enemistades perpetuas, y esparciste los hijos de Israel á poder de espada en el tiempo de su aflicción, en el tiempo extremadamente malo;
6म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “ती शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की मी तुला मृत्युदंड देईन. मृत्यू तुझा पाठलाग करील. लोकांना ठार करण्यात तुला घृणा वाटली नाही. म्हणून मृत्यू तुझा पाठलाग करील.
6Por tanto, vivo yo, dice el Señor Jehová, que á sangre te diputaré, y sangre te perseguirá: y pues la sangre no aborreciste, sangre te perseguirá.
7सेईर पर्वताला ओसाड, उजाड करीन. त्या गावातून येणाऱ्या प्रत्येकाला मी ठार करीन. तसेच त्या गावात जाऊ पाहणाऱ्यालाही मी ठार मारीन.
7Y pondré al monte de Seir en asolamiento y en soledad, y cortaré de él pasante y volviente.
8त्याचे डोंगर मी मृत शरींरांनी झाकून टाकीन. टेकड्यांवर, दऱ्यांतून, आणि घळींतून प्रेते पडतील.
8Y henchiré sus montes de sus muertos: en tus collados, y en tus valles, y en todos tus arroyos, caerán ellos muertos á cuchillo.
9मी तुला कायमचा ओसाड करीन. तुझ्या शहरांतून कोणीही राहाणार नाही. मग तुला पटेल की मीच परमेश्वर आहे.”
9Yo te pondré en asolamientos perpetuos, y tus ciudades nunca más se restaurarán; y sabréis que yo soy Jehová.
10तू म्हणालास “ती दोन राष्ट्रे (इस्राएल व यहूदा) माझी होतील आम्ही त्यांना आमच्या मालकीची करु.” पण परमेश्वर तिथे होता.
10Por cuanto dijiste: Las dos naciones y las dos tierras serán mías, y las poseeremos, estando allí Jehová;
11आणि तो परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “तू माझ्या माणसांचा द्वेष केलास. त्यांच्यावर रागावलास, म्हणून मी तुझा तिरस्कार करतो. मी शपथपूर्वक वचन देतो की तू जसे त्यांना दुखावलेस, तशीच शिक्षा मी तुला करीन. मी तुला शिक्षा करुन लोकांना दाखवून देईन की मी त्यांच्या पाठीशी आहे.
11Por tanto, vivo yo, dice el Señor Jehová, yo haré conforme á tu ira, y conforme á tu celo con que procediste, á causa de tus enemistades con ellos: y seré conocido en ellos, cuando te juzgaré.
12मग तुलासुद्धा कळेल की मी तू त्यांना उच्चारलेले सर्व अपमानकारक शब्द ऐकले होते. इस्राएलच्या पर्वताबद्दल तू खूप वाईट बोललास. तू म्हणालास ‘इस्राएलचा नाश झाला आहे. मी त्याला भक्ष्याप्रमाणे चोखीन.’
12Y sabrás que yo Jehová he oído todas tus injurias que proferiste contra los montes de Israel, diciendo: Destruídos son, nos son dados á devorar.
13तुला गर्व झाला होता आणि तू माझ्याविरुद्ध बोललास. तू अनेक वेळा माझ्याविरुद्ध बोललास, आणि मी खरेच सांगतो की मी प्रत्येक शब्द ऐकला.”
13Y os engrandecisteis contra mí con vuestra boca, y multiplicasteis contra mí vuestras palabras. Yo lo oí.
14परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी तुझा नाश केल्यावर सर्व जगाला आनंद होईल.
14Así ha dicho el Señor Jehová: Alegrándose toda la tierra, yo te haré soledad.
15इस्राएलचा नाश झाल्यावर तुला आनंद झाला होता. मी तुलाही अगदी तशीच वागणूक देईन. सेईर पर्वताचा व संपूर्ण अदोम देशाचा नाश होईल. मगच तुला समजेल की मी परमेश्वर आहे.”
15Como te alegraste sobre la heredad de la casa de Israel, porque fué asolada, así te haré á ti: asolado será el monte de Seir, y toda Idumea, toda ella; y sabrán que yo soy Jehová.