1“मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलमधील पर्वताशी बोल. त्यांना परमेश्वराचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकायला सांग.
1Y TU, hijo del hombre, profetiza sobre los montes de Israel, y di: Montes de Israel, oid palabra de Jehová:
2त्यांना सांग की परमेश्वर आणि प्रभू पुढील गोष्टी सांगतो. ‘शत्रू तुमच्याविषयी वाईट बोलताना सुखावले, ते म्हणाले की अरे वा! आता प्राचीत पर्वत आमचे होतील.’
2Así ha dicho el Señor Jehová: Por cuanto el enemigo dijo sobre vosotros: Ea! también las alturas perpetuas nos han sido por heredad;
3“म्हणून माझ्यावतीने इस्राएलमधील पर्वतांशी बोल. त्यांना सांग की परमेश्वर आणि प्रभू असे सांगतो ‘शत्रूने तुमची शहरे नष्ट केली, सर्व बाजूंनी तुमच्यावर हल्ला केला. तुम्ही दुसऱ्या राष्ट्रांचे व्हावे म्हणून त्याने असे केले. मग लोक तुमच्याबद्दल चर्चा करतील. तुमची निंदानालस्ती करतील.”
3Profetiza por tanto, y di: Así ha dicho el Señor Jehová: Pues por cuanto asolándoos y tragándoos de todas partes, para que fueseis heredad á las otras gentes, se os ha hecho andar en boca de lenguas, y ser el oprobio de los pueblos,
4म्हणून, इस्राएलच्या पर्वतांनो, परमेश्वराचे, प्रभूचे, म्हणणे ऐका. परमेश्वर व प्रभू पर्वत, टेकड्या, झरे, दऱ्या उजाड भग्नावशेष, आणि सोडून दिलेली शहरे यांना असे सांगतो की, तुमच्या सभोवतालच्या इतर राष्ट्रांकडून तुम्ही लुबाडले गेलात, त्यांनी तुमची टर उडविली.
4Por tanto, montes de Israel, oid palabra del Señor Jehová: Así ha dicho el Señor Jehová á los montes y á los collados, á los arroyos y á los valles, á las ruinas y asolamientos, y á las ciudades desamparadas, que fueron puestas á saco y en escarnio á las
5“म्हणून मी वचन देतो की माझ्या बोलण्यात आवेश असेल. मी अदोम आणि इतर राष्ट्रांना माझा राग जाणवून देईन. माझी जमीन त्या लोकांनी स्वत:साठी घेतली, त्या वेळी त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी ती फक्त लुटण्यासाठी आणि नाश करण्यासाठी घेतली.”
5Por eso, así ha dicho el Señor Jehová: He hablado por cierto en el fuego de mi celo contra las demás gentes, y contra toda Idumea, que se disputaron mi tierra por heredad con alegría de todo corazón, con enconamiento de ánimo, para que sus expelidos fuese
6“म्हणून, परमेश्वर माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: म्हणून माझ्यावतीने इस्राएल देशाशी बोल. पर्वत, टेकड्या, झरे आणि दऱ्या ह्यांच्याशी बोल. त्यांना सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो मी आवेशाने आणि रागाने बोलेन. का? कारण, इतर राष्ट्रांकडून तुम्हाला अपमान सहन करावा लागला.”
6Por tanto, profetiza sobre la tierra de Israel, y di á los montes y á los collados, y á los arroyos y á los valles: Así ha dicho el Señor Jehová: He aquí, en mi celo y en mi furor he hablado, por cuanto habéis llevado el oprobio de las gentes.
7म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “मी वचन देतो की तुमच्या भोवतालच्या राष्ट्रांचीही अप्रतीष्ठा होईल.”
7Por lo cual así ha dicho el Señor Jehová: Yo he alzado mi mano, que las gentes que os están alrededor han de llevar su afrenta.
8“पण इस्राएलच्या पर्वतांनो, माझ्या लोकांकरिता इस्राएल लोकांसाठी तुम्ही झाडे वाढवाल आणि ती फळांनी बहरतील. माझे लोक लवकरच परत येतील.
8Mas vosotros, oh montes de Israel, daréis vuestros ramos, y llevaréis vuestro fruto á mi pueblo Israel; porque cerca están para venir.
9मी तुमच्याबरोबर आहे. मी तुम्हाला मदत करीन. लोक तुमच्या जमिनीची मशागत करतील, बी पेरतील.
9Porque heme aquí á vosotros, y á vosotros me volveré, y seréis labrados y sembrados.
10तुमच्यावर खूप लोक राहतील. सर्व इस्राएल लोक तेथे राहतील. शहरे लोकांनी गजबजील. नाश झालेली ठिकाणे पुन्हा नव्यासारखी उभारली जातील.
10Y haré multiplicar sobre vosotros hombres, á toda la casa de Israel, toda ella; y las ciudades han de ser habitadas, y serán edificadas las ruinas.
11मी तुम्हाला खूप लोक व प्राणी देईन. त्यांची संतती वाढेल पूर्वीप्रमाणे लोक राहू लागतील. मी तुम्हाला, आरंभी होता त्यापेक्षा चांगले करीन. मग तुम्हाला कळेल की मी परमेश्वर आहे.
11Y multiplicaré sobre vosotros hombres y bestias, y serán multiplicados y crecerán: y os haré morar como solíais antiguamente, y os haré más bien que en vuestros principios; y sabréis que yo soy Jehová.
12हो! मी लोकांना माझ्या माणसांना, हे इस्राएल तुझ्यावरुन चालायला लावीन. ते तुला स्वीकारतील आणि तू त्यांचा होशील, तू पुन्हा त्यांना अपत्यहीन करणार नाहीस.”
12Y haré andar hombres sobre vosotros, á mi pueblo Israel; y te poseerán, y les serás por heredad, y nunca más les matarás los hijos.
13परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “इस्राएल देश, लोक तुझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात की तू तुझ्या लोकांचा नाश केलास, तू मुले दूर नेलीस.
13Así ha dicho el Señor Jehová: Por cuanto dicen de vosotros: Comedora de hombres, y matadora de los hijos de tus gentes has sido:
14ण यापुढे तू लोकांचा नाश करणार नाहीस, मुले दूर नेणार नाहीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
14Por tanto, no devorarás más hombres, y nunca más matarás los hijos á tus gentes, dice el Señor Jehová.
15“यापुढे इतर राष्ट्रांना मी अपमान करु देणार नाही. ते तुझी अप्रतिष्ठा करणार नाहीत. तू आणखी तुझी मुले गमावणार नाहीस.” परमेश्वर, माझा प्रभू, हे म्हणाला.
15Y nunca más te haré oir injuria de gentes, ni más llevarás denuestos de pueblos, ni harás más morir los hijos á tus gentes, dice el Señor Jehová.
16मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले, तो म्हणाला,
16Y fué á mí palabra de Jehová, diciendo:
17“मानवपुत्रा, इस्राएलचे लोक त्यांच्या स्वत:च्या देशात राहिले. पण दुष्कृत्ये करुन त्यांनी तो देश गलिच्छ केला. रजस्वला स्त्रीप्रमाणे ते मला अशौच होते.
17Hijo del hombre, morando en su tierra la casa de Israel, la contaminaron con sus caminos y con sus obras: como inmundicia de menstruosa fué su camino delante de mí.
18देशात लोकांना ठार करुन त्यांनी त्या भूमीवर रक्त सांडले. त्यांच्या मूर्तीनी देश अमंगळ केला, म्हणून मी त्यांना माझा क्रोध किती आहे ते दाखविले.
18Y derramé mi ira sobre ellos por las sangres que derramaron sobre la tierra; porque con sus ídolos la contaminaron.
19मी त्यांना राष्ट्रा-राष्ट्रांत पसरविले आणि सर्व जगात विखरुन टाकले. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल मी त्यांना अशीच शिक्षा केली.
19Y esparcílos por las gentes, y fueron aventados por las tierras: conforme á sus caminos y conforme á sus obras los juzgué.
20ते त्या दुसऱ्या राष्ट्रांत गेले. तेथेही त्यांनी माझे पवित्र नाव धुळीला मिळवले, राष्ट्रे त्यांच्याबद्दल बोलली. ती म्हणाली, ‘हा परमेश्वर आहे तरी कसा? हे परमेश्वराचे लोक आहेत, पण त्यांनी त्याची भूमी सोडली.’
20Y entrados á las gentes á donde fueron, profanaron mi santo nombre, diciéndose de ellos: Estos son pueblo de Jehová, y de su tierra de él han salido.
21“इस्राएलच्या लोकांनी माझे पवित्र नाव बदनाम केले. त्याबद्दल मला खेद वाटला.
21Y he tenido lástima en atención á mi santo nombre, el cual profanó la casa de Israel entre las gentes á donde fueron.
22म्हणून इस्राएलच्या लोकांना सांग की परमेश्वर, प्रभू पुढील गोष्टी सांगतो ‘इस्राएल लोकानो, तुम्ही जेथे जेथे गेलात, तेथे तेथे तुम्ही माझे पवित्र नाव बदनाम केलेत. हे थांबविण्यासाठी मी काहीतरी करीन. ते मी तुमच्यासाठी म्हणून करणार नाही, तर माझ्या पवित्र नावासाठी करीन.
22Por tanto, di á la casa de Israel: Así ha dicho el Señor Jehová: No lo hago por vosotros, oh casa de Israel, sino por causa de mi santo nombre, el cual profanasteis vosotros entre las gentes á donde habéis llegado.
23मी त्या मोठ्या राष्ट्रांना दाखवून देईन की माझे नाव खरोखरच पवित्र आहे. तुम्ही त्या राष्ट्रांत माझ्या पवित्र नावाला कलंक लावलात. पण मी पवित्र आहे. हे मी तुम्हाला दाखवून देईन. मग त्या राष्ट्रांना, मी परमेश्वर असल्याचे, समजेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
23Y santificaré mi grande nombre profanado entre las gentes, el cual profanasteis vosotros en medio de ellas; y sabrán las gentes que yo soy Jehová, dice el Señor Jehová, cuando fuere santificado en vosotros delante de sus ojos.
24देव म्हणाला, “मी तुम्हाला त्या राष्ट्रांतून बाहेर काढून एकत्र करीन आणि तुमच्या देशात तुम्हाला परत आणीन.
24Y yo os tomaré de las gentes, y os juntaré de todas las tierras, y os traeré á vuestro país.
25मग तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडून मी तुम्हाला शुद्ध करीन. तुमची घाण मी धुवून काढीन. त्या ओंगळ मूर्तीचीही घाण मी धुवून काढीन आणि तुम्हाला शुद्ध करीन.”
25Y esparciré sobre vosotros agua limpia, y seréis limpiados de todas vuestras inmundicias; y de todos vuestros ídolos os limpiaré.
26देव म्हणाला, “मी तुमच्यात नवीन आत्मा घालून नवे ह्दय बसवीन तुमचे दगडाचे ह्दय बदलून त्या जागी माणसाचे कोमल ह्दय बसवीन.
26Y os daré corazón nuevo, y pondré espíritu nuevo dentro de vosotros; y quitaré de vuestra carne el corazón de piedra, y os daré corazón de carne.
27मी माझा आत्मा तुम्हाला देईन. मग तुम्ही बदलाल व माझे नियम पाळाल. काळजीपूर्वक माझ्या आज्ञा पाळाल.
27Y pondré dentro de vosotros mi espíritu, y haré que andéis en mis mandamientos, y guardéis mis derechos, y los pongáis por obra.
28मग तुम्ही, मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या, देशात राहाल. तुम्ही माझे व्हाल व मी तुमचा देव होईल.”
28Y habitaréis en la tierra que dí á vuestros padres; y vosotros me seréis por pueblo, y yo seré á vosotros por Dios.
29देव पुढे म्हणाला, “तसेच, मी तुमचे रक्षण करीन व तुम्हाला अपवित्र होऊ देणार नाही. मी पिकांना वाढायची आज्ञा देईन व तुमच्यावर उपासमारीची वेळ येऊ देणार नाही.
29Y os guardaré de todas vuestras inmundicias; y llamaré al trigo, y lo multiplicaré, y no os daré hambre.
30मी तुमच्या फळबागाचे आणि शेतांचे उत्पादन वाढवीन मग तुम्हाला कधीही परक्या देशात भुकेने व्याकूळ होऊन लज्जित व्हावे लागणार नाही.
30Multiplicaré asimismo el fruto de los árboles, y el fruto de los campos, porque nunca más recibáis oprobio de hambre entre las gentes.
31तुम्ही केलेल्या वाईट गोष्टी तुम्हाला आठवतील. त्या गोष्टी चांगल्या नव्हत्या, हे तुम्हाला स्मरेल. मग तुम्ही केलेल्या पापाबद्दल आणि भयानक कृत्यांबद्दल स्वत:चाच तिरस्कार कराल.”
31Y os acordaréis de vuestros malos caminos, y de vuestras obras que no fueron buenas; y os avergonzaréis de vosotros mismos por vuestras iniquidades, y por vuestras abominaciones.
32परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या असे मला वाटते. तुमच्या भल्याकरिता मी ह्या गोष्टी करीत नाही. मी माझ्या नावाकरिता त्या करीत आहे म्हणून इस्राएल लोकांनो, तुम्ही ज्या तऱ्हेने जगलात, त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही ओशाळे झाले पाहिजे.”
32No lo hago por vosotros, dice el Señor Jehová, séaos notorio: avergonzaos y confundíos de vuestras iniquidades, casa de Israel.
33परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “ज्या दिवशी मी तुमची पापे धूवून काढीन, त्या दिवशी मी लोकांना गावांत परत आणीन. विद्ध्वंस झालेली गावे पुन्हा वसविली जातील.
33Así ha dicho el Señor Jehová: El día que os limpiaré de todas vuestras iniquidades, haré también habitar las ciudades, y las asoladas serán edificadas.
34जी भूमी, तिच्या जवळून जाणाऱ्या प्रत्येकाला, भग्नावशेषांच्या ढिगाप्रमाणे दिसत होती, तीच मशागत केल्याप्रमाणे दिसेल.
34Y la tierra asolada será labrada, en lugar de haber sido asolada en ojos de todos los que pasaron;
35वाटसरु म्हणतील, ‘पूर्वी, ह्या प्रदेशाचा विद्ध्वंस झाला. पण आता तोच एदेनच्या बागेप्रमाणे झाला आहे. शहरांचा नाश झाला. ती उद्ध्वस्त व ओसाड झाली. पण आता ती सुरक्षित आहेत आणि त्यांत लोकांनी वस्ती केली आहे.”
35Los cuales dijeron: Esta tierra asolada fué como huerto de Edén; y estas ciudades desiertas y asoladas y arruinadas, fortalecidas estuvieron.
36देव म्हणाला, “मग तुमच्या सभोवतालच्या राष्ट्रांना कळेल की मीच परमेश्वर आहे आणि मीच नष्ट झालेली ठिकाणे पुन्हा उभारली. ओसाड जमिनीत मी पेरणी केली. मी परमेश्वर आहे. मी हे बोललो, ते मी घडवून आणीन.”
36Y las gentes que fueron dejadas en vuestros alrededores, sabrán que yo edifiqué las derribadas, y planté las asoladas: yo Jehová he hablado, y harélo.
37परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “इस्राएलचे लोक मला त्यांच्याकरिता पुढील गोष्टी करण्यास सांगतील: त्यांची संख्या मी पुष्कळ मोठी करावी. त्यांना मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे करावे.
37Así ha dicho el Señor Jehová: Aun seré solicitado de la casa de Israel, para hacerles esto: multiplicarélos de hombres á modo de rebaños.
38यरुशलेमच्या खास सणांमध्ये असतात त्याप्रमाणे पवित्र मेंढ्या व बोकडांच्या पुष्कळ कळपांप्रमाणे पुष्कळ लोक तेथे राहतील. गावे व नष्ट झालेल्या जागा लोकांनी गजबजून जातील. मग त्यांना, मी देव आहे हे कळेल.”
38Como las ovejas santas, como las ovejas de Jerusalem en sus solemnidades, así las ciudades desiertas serán llenas de rebaños de hombres; y sabrán que yo soy Jehová.