1परमेश्वर म्हणाला, “इस्राएल लहान बालक असताना, मी (परमेश्वराने) त्यांच्यावर प्रेम केले. आणि मी माझ्या मुलाला मिसरबाहेर बोलाविले.
1CUANDO Israel era muchacho, yo lo amé, y de Egipto llamé á mi hijo.
2पण मी जितके अधिक इस्राएलींना बोलाविले, तितके जास्त ते मला सोडून गेले. त्यांनी बआलाना बळी अर्पण केले. मूर्ती पुढे धूप जाळला.
2Como los llamaban, así ellos se iban de su presencia; á los Baales sacrificaban, y á las esculturas ofrecían sahumerios.
3“एफ्राईमला चालावयाला शिकविणारा मीच होतो. मी इस्राएलींना हातांवर उचलून घेतले. मी त्यांना बरे केले. पण त्यांना त्याची जाणीव नाही.
3Yo con todo eso guiaba en pies al mismo Ephraim, tomándolos de sus brazos; y no conocieron que yo los cuidaba.
4मी त्यांना दोऱ्यांनी बांधून नेले. पण त्या प्रेमाच्या दोऱ्या होत्या. मी त्यांना मुक्त करणाऱ्या माणसाप्रमाणे होतो. मी खाली वाकून त्यांना जेवू घातले.
4Con cuerdas humanas los traje, con cuerdas de amor: y fuí para ellos como los que alzan el yugo de sobre sus mejillas, y llegué hacia él la comida.
5“परमेश्वराकडे परत येण्यास इस्राएल लोकांनी नकार दिला म्हणून ते मिसरला जातील अश्शूरचा राजा त्यांचाही राजा होईल.
5No tornará á tierra de Egipto, antes el mismo Assur será su rey, porque no se quisieron convertir.
6त्यांच्या गावांवर टांगती तलवार राहील. त्यांच्या सामर्थ्यवान पुरुषांना ती मारील त्यांच्या नेत्यांचा ती नाश करील.
6Y caerá espada sobre sus ciudades, y consumirá sus aldeas; consumirálas á causa de sus consejos.
7“मी परत यावे अशी माझ्या लोकांची अपेक्षा आहे. वरच्या परमेश्वराला ते बोलवतील पण देव त्यांना मदत करणार नाही.”
7Entre tanto, está mi pueblo adherido á la rebelión contra mí: aunque lo llaman al Altísimo, ninguno absolutamente quiere ensalzar le.
8“एफ्राईम, तुला सोडून देण्याची माझी इच्छा नाही. इस्राएल, तुझे रक्षण करावे असे मला वाटते. अदमाह किवा सबोईम यांच्यासारखी तुझी स्थिती करावी असे मला वाटत नाही. माझे मन:परिवर्तन होत आहे. तुझ्याबद्दलचे माझे प्रेम अतिशय उत्कट आहे.
8¿Cómo tengo de dejarte, oh Ehpraim? ¿he de entregarte yo, Israel? ¿cómo podré yo hacerte como Adma, ni ponerte como á Zeboim? Mi corazón se revuelve dentro de mí, inflámanse todas mis conmiseraciones.
9मी, माझ्या भयंकर क्रोधाचा, विजय होऊ देणार नाही. मी पुन्हा एफ्राईमचा नाश करणार नाही. मी मानव नसून परमेश्वर आहे. मी तुमच्यामधला एकमेव पवित्र आहे मी तुमच्याबरोबर आहे. मी माझा क्रोध प्रकट करणार नाही.
9No ejecutaré el furor de mi ira, no volveré para destruir á Ephraim: porque Dios soy, y no hombre; el Santo en medio de ti: y no entraré en la ciudad.
10मी सिंहासारखी डरकाळी फोडीन. मी डरकाळी फोडताच, माझी मुले माझ्यामागून येतील ती पश्चिमेकडून भयाने थरथर कापत येतील.
10En pos de Jehová caminarán: él bramará como león: cual león rugirá él de cierto, y los hijos se moverán azorados del occidente.
11ती मिसरमधून घाबरलेल्या पाखरंाप्रमाणे येतील. मग मी त्यांना घरी परत नेईन.” परमेश्वर असे म्हणाला आहे.
11Como ave se moverán velozmente de Egipto, y de la tierra de Asiria como paloma; y pondrélos en sus casas, dice Jehová.
12“एफ्राईमच्या दैवतांनी मला घेरून टाकले. इस्राएलच्या लोकांनी माझ्याकडे पाठ फिरविली. म्हणून त्यांचा नाश झाला.पण यहूदा अजून एल बरोबरच चालत आहे. यहूदा पवित्रांशी निष्ठावंत आहे.”
12(H12-1) CERCOME Ephraim con mentira, y la casa de Israel con engaño: mas Judá aún domina con Dios, y es fiel con los santos.