Marathi

Spanish: Reina Valera (1909)

Hosea

12

1एफ्राईम त्याचा वेळ वाया घालवीत आहे-इस्राएल दिवसभर “वाऱ्याचा पाठलाग करतो.” लोक अधिकाधिक खोटे बोलतात. ते जास्तीतजास्त चोव्या करतात. त्यांनी अश्शूरशी करार केले आहेत. आणि ते जैतून तेल मिसरला नेत आहेत.
1(H12-2) Ephraim se apacienta del viento, y sigue al solano: mentira y destrucción aumenta continuamente; porque hicieron alianza con los Asirios, y aceite se lleva á Egipto.
2परमेश्वर म्हणतो, “माझे इस्राएलशी भांडण आहे. याकोबला त्याच्या कर्मांबद्दल सजा मिळालीच पाहिजे. त्याने केलेल्या वाईट कृत्यांबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे.
2(H12-3) Pleito tiene Jehová con Judá para visitar á Jacob conforme á sus caminos: pagarále conforme á sus obras.
3याकोबने आईच्या गर्भात असल्यापासूनच त्याच्या भावाला फसवायला सुरवात केली. याकोब शक्तिशाली तरुण होता. त्या वेळी तो परमेश्वराविरुध्द लढला.
3(H12-4) En el vientre tomó por el calcañar á su hermano, y con su fortaleza venció al ángel.
4याकोबने देवदूताशी मल्लयुध्द खेळले आणि तो जिंकला तो रडला व त्याने कृपा करण्याची याचना केली. हे बेथेलमध्ये घडले. तेथे तो आमच्याशी बोलला.
4(H12-5) Venció al ángel, y prevaleció; lloró, y rogóle: en Beth-el le halló, y allí habló con nosotros.
5हो, खरेच, यहोवा सैन्यांचा परमेश्वर आहे. त्याचे नाव यहोवा (परमेश्वर)असे आहे.
5(H12-6) Mas Jehová es Dios de los ejércitos: Jehová es su memorial.
6म्हणून आपल्या परमेश्वराकडे परत या त्याच्याशी निष्ठा ठेवा. योग्य तेज करा. तुमच्या परमेश्वरावर नेहमी विश्वास ठेवा.
6(H12-7) Tú pues, conviértete á tu Dios: guarda misericordia y juicio, y en tu Dios espera siempre.
7“याकोब, हा खरा व्यापारी आहे. तो त्याच्या मित्रांनासुध्दा फकवितो त्याचे तराजू सुध्दा खोटे आहेत.
7(H12-8) Es mercader que tiene en su mano peso falso, amador de opresión.
8एफ्राईम म्हणाला, ‘मी श्रीमंत आहे. मला खरी संपत्ती सापडली आहे. माझे अपराध कोणालाही कळणार नाहीत. कोणालाही माझी पापे समजणार नाहीत.’
8(H12-9) Y dijo Ephraim: Ciertamente yo he enriquecido, hallado he riquezas para mí: nadie hallará en mí iniquidad, ni pecado en todos mis trabajos.
9पण तुम्ही मिसरमध्ये असल्यापासून, मी परमेश्वर तुमचा परमेश्वर आहे. सभामंडपाच्या वेळेप्रमाणे तुम्हाला तंबूत राहायला भाग पाडीन.
9(H12-10) Empero yo soy Jehová tu Dios desde la tierra de Egipto: aun te haré morar en tiendas, como en los días de la fiesta.
10मी संदेष्ट्यांशी बोललो मी त्यांना पुष्कळ दृष्टांन्त दिले. माझी शिकवण तुम्हाला शिकविण्यासाठी मी त्याना अनेक मार्ग दाखविले.
10(H12-11) Y hablado he á los profetas, y yo aumenté la profecía, y por mano de los profetas puse semejanzas.
11पण गिलादाच्या लोकांनी पाप केले आहे. तेथे पुष्कळ भयानक मूर्ता आहेत. गिल्गालमध्ये लोक बैलांना बळी अर्पण करतात. त्यांच्या अनेक वेदी आहेत. नांगरलेल्या शेतात ज्याप्रमाणे ढेकळांच्या रांगा असतात, त्याप्रमाणे त्यांच्या वेदींच्या रंगाच्या रांगा आहेत.
11(H12-12) ¿Es Galaad iniquidad? Ciertamente vanidad han sido; en Gilgal sacrificaron bueyes: y aún son sus altares como montones en los surcos del campo.
12“याकोब अरामला पळून गेला. त्या जागी, इस्राएलने पत्नीसाठी सेवा केली. दुसरी पत्नी मिळावी म्हणून त्याने मेंढ्या पाळल्या.
12(H12-13) Mas Jacob huyó á tierra de Aram, y sirvió Israel por mujer, y por mujer fué pastor.
13पण परमेश्वराने संदेष्ट्यांच्या उपयोग करून देवाने इस्राएलला सुरक्षित ठेवले.
13(H12-14) Y por profeta hizo subir Jehová á Israel de Egipto, y por profeta fué guardado.
14पण एफ्राईम परमेश्वराच्या रागास कारणीभूत झाला एफ्राईमने अनेक लोकांना ठार केले. म्हणून त्याला त्याच्या अपराधांबद्दल शिक्षा होईल. त्याचा प्रभू (परमेश्वर) त्याला अपमान सहन करायला लावील.”
14(H12-15) Enojado ha Ephraim á Dios con amarguras; por tanto, sus sangres se derramarán sobre él, y su Señor le pagará su oprobio.