1इस्राएला, तू पडलास. तू परमेश्वराविरुध्द पाप केलेस. पण आता परमेश्वराकडे, तुझ्या परमेश्वराकडे, परत ये.
1CONVIÉRTETE, oh Israel, á Jehová tu Dios: porque por tu pecado has caído.
2तू ज्या गोष्टी बोलणार आहेस, त्याबद्दल विचार कर व परमेश्वराकडे परत ये. “त्याला सांग की आमचे पाप धुवून टाक आम्ही करीत असलेल्या चांगल्या गोष्टीं चा स्वीकार कर. आम्ही आमच्या ओठांद्वारे तुझी स्तुती करू.
2Tomad con vosotros palabras, y convertíos á Jehová, y decidle: Quita toda iniquidad, y acepta el bien, y daremos becerros de nuestros labios.
3“अश्शूर आम्हाला वाचविणार नाही. आम्ही घोड्यांवर स्वार होणार नाही. आम्ही हातांनी बनविलेल्या गोष्टींना ‘आमचा देव’ असे पुन्हा म्हणणार नाही का? कारण अनाथांवर करुणा करणारा तूच एकमेव आहेस.
3No nos librará Assur; no subiremos sobre caballos, ni nunca más diremos á la obra de nuestras manos: Dioses nuestros: porque en ti el huérfano alcanzará misericordia.
4परमेश्वर म्हणतो, “त्यानी माझा त्याग केली तरी मी त्यांना ह्या गोष्टीबद्दल क्षमा करीन. मी मोकळेपणाने त्यांच्यावर प्रेम करीन. आता मी त्यांच्यावर रागावलो नाही.
4Yo medicinaré su rebelión, amarélos de voluntad: porque mi furor se apartó de ellos.
5मी इस्राएलासाठी दहिवराप्रमाणे होईन. इस्राएल लिलीप्रमाणे फुलेल, लबानोनमधील गंधसरूंप्रमाणे तो फोफावेल.
5Yo seré á Israel como rocío; él florecerá como lirio, y extenderá sus raíces como el Líbano.
6त्याच्या फांद्यांचा विस्तार होईल व तो जैतुनाच्या सुंदर वृक्षाप्रमाणे होईल. लंबानोनमधील गंधसरूंच्या गंधाप्रमाणे त्याचा सुवास असेल.
6Extenderse han sus ramos, y será su gloria como la de la oliva, y olerá como el Líbano.
7इस्राएलचे लोक, पुन्हा, माझ्या सुराक्षितेत राहातील ते धान्याप्रमाणे वाढतील ते वेलीप्रमाणे विस्तारतील. ते लबानोनमधील द्राक्षारसाप्रमाणे होतील.”
7Volverán, y se sentarán bajo de su sombra: serán vivificados como trigo, y florecerán como la vid: su olor, como de vino del Líbano.
8“एफ्राईम, माझा (परमेश्वराचा) मूर्तीशी काहीही संबंध असणार नाही, तुमच्या प्रार्थनेला उत्तर देणारा मीच एकमीच आहे. फक्त मीच तुमच्यावर लक्ष ठेवतो, मी सदाहरित देवदारूसारखा आहे. माझ्यामुळे तुम्हाला फळ मिळते.”
8Ephraim dirá: ¿Qué más tendré ya con los ídolos? Yo lo oiré, y miraré; yo seré á él como la haya verde: de mí será hallado tu fruto.
9शहाण्या माणसाला या गोष्टी समजतात. चलाख माणसाने या गोष्टी शिकाव्या परमेश्वराचे मार्ग योग्य आहेत. त्यामुळे सज्जन जगतील व दुर्जन मरतील.
9¿Quién es sabio para que entienda esto, y prudente para que los sepa? Porque los caminos del Jehová son derechos, y los justos andarán por ellos: mas los rebeldes en ellos caerán.