Marathi

Spanish: Reina Valera (1909)

Joel

1

1पथूएलचा मुलगा योएल ह्याला परमेश्वराकडून पुढील संदेश मिळाला:
1PALABRA de Jehová que fué á Joel hijo de Pethuel.
2नेत्यांनो, हा संदेश ऐका! ह्या देशात राहणाऱ्या सर्व लोकानो, माझे ऐका! तुमच्या आयुष्यात पूर्वी, असे काही घडले आहे का? नाही. तुमच्या वडिलांच्या काळात असे काही घडले का? नाही.
2Oid esto, viejos, y escuchad, todos los moradores de la tierra. ¿Ha acontecido esto en vuestros días, ó en los días de vuestros padres?
3तुम्ही तुमच्या मुलांना ह्या गोष्टी सांगाल. तुमची मुले, त्यांच्या मुलांना व तुमची नातवंडे त्यांच्या पुढच्या पिढीला ह्या गोष्टी सांगतील.
3De esto contaréis á vuestros hijos, y vuestros hijos á sus hijos, y su hijos á la otra generación.
4जे नाकतोड्याने खाल्ले व जे कुसरूडाने सोडले, ते घुल्याने खाल्ले.
4Lo que quedó de la oruga comió la langosta, y lo que quedó de la langosta comió el pulgón; y el revoltón comió lo que del pulgón había quedado.
5मद्यप्यांनो, जागे व्हा व रडा! सर्व दारूड्यांनो, रडा! का? कारण तुमचे गोड मद्य संपले आहे. पन्हा तुम्हाला त्याची चव चाखता येणार नाही.
5Despertad, borrachos, y llorad; aullad todos los que bebéis vino, á causa del mosto, porque os es quitado de vuestra boca.
6माझ्या राष्ट्राबरोबर लढण्यासाठी एक मोठा व शक्तिशाली देश येत आहे. त्यांचे सैनिक अगणित आहेत. ते टोळ (शत्रू-सैनिक) तुमचा नाश करण्यास समर्थ आहेत. त्यांचे दात सिंहाच्या दाताप्रमाणे आहेत
6Porque gente subió á mi tierra, fuerte y sin número; sus dientes, dientes de león, y sus muelas, de león.
7माझ्या द्राक्षवेलीवरची सर्व द्राक्षे ते ‘टोळ’ खातील. चांगल्या द्राक्षवेली जळाल्या व मेल्या माझी झाडे, ते, सोलून खातील. त्या झाडांच्या फांद्या पांढऱ्या पडून त्यांचा नाश होईल.
7Asoló mi vid, y descortezó mi higuera: del todo la desnudó y derribó: sus ramas quedaron blancas.
8एखाद्या तरुण वाग्दत्त वधूचा भावी पती मारला गेल्यावर ती जशी रडते, तसे रडा!
8Llora tú como moza vestida de saco por el marido de su juventud.
9याजकांनो, परमेश्वराच्या सेवकांनो, शोक करा! का? कारण परमेश्वराच्या मंदिरात अन्नार्पणे व पेयार्पणे होणार नाहीत.
9Pereció el presente y la libación de la casa de Jehová: los sacerdotes ministros de Jehová hicieron luto.
10शेतांचा नाश झाला आहे. भूमीसुध्दा रडत आहे. का? कारण धान्याचा नाश झाला आहे, नवे मद्य सुकून गेले आहे आणि जैतुनाचे तेल नाहीसे झाले आहे.
10El campo fué destruído, enlutóse la tierra; porque el trigo fué destuído, se secó el mosto, perdióse el aceite.
11शेतकऱ्यांनो, दु:खी व्हा! द्राक्षमळेवाल्यांनो, मोठ्याने रडा! का? कारण शेतातील पीक नाहीसे झाले आहे.
11Confundíos, labradores, aullad, viñeros, por el trigo y la cebada; porque se perdió la mies del campo.
12वेली सुकून गेल्या आहेत, अंजिराचे झाड वठत आहे, डाळींब, खजूर, सफस्चंद अशी सर्वच बागेतील झाड सुकत आहेत आणि लोकांमधील आनंद लोपला आहे.
12Secóse la vid, y pereció la higuera, el granado también, la palma, y el manzano; secáronse todos los árboles del campo; por lo cual se secó el gozo de los hijos de los hombres.
13याजकांनो, शोकप्रदर्शक कपडे चढवून मोठ्याने रडा. वेदीच्या सेवकांनो, मोठ्याने शोक करा. माझ्या परमेश्वराच्या सेवकानो, शोकप्रदर्शक कपडे घालूनच तुम्ही झोपाल. का? कारण परमेश्वराच्या मंदिरात यापुढे अन्नार्पणे व पेयार्पणे होणार नाहीत.
13Ceñíos y lamentad, sacerdotes; aullad, ministros del altar; venid, dormid en sacos, ministros de mi Dios: porque quitado es de la casa de vuestro Dios el presente y la libación.
14‘उपवासाची एक विशिष्ट वेळ असेल’, असे लोकांना सांगा. खास सभेसाठी लोकांना एकत्र बोलवा. देशात राहणाऱ्या लोकांना व नेत्यांना एकत्र गोळा करा. त्यांना प्रभूच्या, तुमच्या परमेश्वराच्या मंदिरात आणा, व परमेश्वराची प्रार्थना करा.
14Pregonad ayuno, llamad á congregación; congregad los ancianos y todos los moradores de la tierra en la casa de Jehová vuestro Dios, y clamad á Jehová.
15शोक करा! का? कारण परमेश्वराचा खास दिवस जवळच आहे. त्या वेळी, सर्वशक्तिमान परमेश्वराची शिक्षा हल्ल्याप्रमाणे अचानक येईल.
15Ay del día! porque cercano está el día de Jehová, y vendrá como destrucción por el Todopoderoso.
16आमचे अन्न तुटले आहे. आमच्या परमेश्वराच्या मंदिरातून आनंद व सुख निघून गेले आहे.
16¿No es quitado el mantenimiento de delante de nuestros ojos, la alegría y el placer de la casa de nuestro Dios?
17आम्ही बियाणे पेरले पण ते मातीतच सुकून मरून गेले. आमची झाडे वाळली व मेली आहेत. आमची धान्याची कोठारे रिकामी झाली आणि कोसळत आहेत.
17El grano se pudrió debajo de sus terrones, los bastimentos fueron asolados, los alfolíes destruídos; porque se secó el trigo.
18प्राणी भुकेन व्याकूळ होऊन कण्हत आहेत. गुरांचे कळप गांगरून जाऊन, इतस्तत: भटकत आहेत. त्यांना खाण्यास चारा नाही. मेंढ्या मरत आहेत.
18Cuánto gimieron las bestias! ­cuán turbados anduvieron los hatos de los bueyes, porque no tuvieron pastos! también fueron asolados los rebaños de las ovejas.
19हे परमेश्वरा, मी तुझा मदतीसाठी धावा करतो. आगीने आमच्या हिरव्या रानांचे वाळवंटात रूपांतर केले आहे.
19A ti, oh Jehová, clamaré: porque fuego consumió los pastos del desierto, y llama abrasó todos los árboles del campo.
20हिंस्र पशूसुध्दा तहानेने व्याकूळ झालेले आहेत आणि ते तुझ्या मदतीसाठी आक्रोश करत आहेत. झरे आटले आहेत-कोठेही पाणी नाही. आगीने आमच्या हिरव्या रानांचे वाळवंट केले आहे.
20Las bestias del campo bramarán también á ti; porque se secaron los arroyos de las aguas, y fuego consumió las praderías del desierto.