Marathi

Spanish: Reina Valera (1909)

Job

10

1मी माझ्या स्वत:च्या आयुष्याचा तिरस्कार करतो म्हणून मी मुक्तपणे तक्रार करीन. माझा आत्मा कडू जहर झालेला आहे म्हणून मी आता बोलेन.
1ESTA mi alma aburrida de mi vida: Daré yo suelta á mi queja sobre mí, Hablaré con amargura de mi alma.
2मी देवाला म्हणेन, ‘मला दोष देऊ नकोस. मी काय चूक केली आहे ते मला सांग. माझ्याविरुध्द तुझ्या मनात काय आहे?
2Diré á Dios: no me condenes; Hazme entender por qué pleiteas conmigo.
3देवा, मला कष्ट देण्यात मुला सुख वाटते का? तुझ्या निर्मिती विषयी तुलाच आस्था नसावी असे वाटते, की वाईट लोकांनी ज्या मसलती केल्या त्या बाबतीत तू समाधानी आहेस?
3¿Parécete bien que oprimas, Que deseches la obra de tus manos, Y que resplandezcas sobre el consejo de los impíos?
4देवा, तुला मानवी डोळे आहेत का? लोकांना दिसते ते तुला दिसते का?
4¿Tienes tú ojos de carne? ¿Ves tú como ve el hombre?
5तुझे आयुष्य आमच्या आयुष्याइतकेच लहान आहे का? ते माणसाच्या आयुष्याइतकेच थोडे आहे का? नाही तर मग त्या विषयी तू कसे जाणून घेतोस?
5¿Son tus días como los días del hombre, O tus años como los tiempos humanos,
6तू माझ्या चुका शोधत असतोस, माझी पापं धुंडाळीत असतोस.
6Para que inquieras mi iniquidad, Y busques mi pecado,
7मी निष्पाप आहे हे तुला माहित आहे. परंतु तुझ्या हातातून मला कुणीही वाचवू शकणार नाही.
7Sobre saber tú que no soy impío, Y que no hay quien de tu mano libre?
8देवा, तुझ्या हातांनी माझी निर्मिती केली, माझ्या शरीराला आकार दिला. परंतु आता तेच हात माझ्याभोवती आवळले जात आहेत आणि माझा नाश करीत आहेत.
8Tus manos me formaron y me compusieron Todo en contorno: ¿y así me deshaces?
9देवा, जरा आठव तू मला मातीसारखे बनवलेस. आता तूच परत माझी माती करणार आहेस का?
9Acuérdate ahora que como á lodo me diste forma: ¿Y en polvo me has de tornar?
10तू मला दुधासारखे ओतलेस आता दही घुसळणाऱ्याप्रमाणे तू मला घुसळून बदलणार आहेस का?
10¿No me fundiste como leche, Y como un queso me cuajaste?
11हाडे आणि स्नायू यांनी तू मला एकत्र बांधलेस. नंतर तू मला कातडीचे आणि मांसाचे कपडे चढविलेस.
11Vestísteme de piel y carne, Y cubrísteme de huesos y nervios.
12तू माझ्यात प्राण ओतलेस आणि माझ्याशी अंत्यत दयाळू राहिलास. तू माझी काळजी वाहिलीस आणि माझ्या जीवाचे रक्षण केलेस.
12Vida y misericordia me concediste, Y tu visitación guardó mi espíritu.
13परंतु तू हे तुझ्या हृदयात लपवून ठेवलेस तू तुझ्या हृदयात याची गुप्तपणे आखणी केलीस हे मला माहित आहे. तुझ्या मनात हेच होते याची जाणीव मला आहे.
13Y estas cosas tienes guardadas en tu corazón; Yo sé que esto está cerca de ti.
14मी पाप करतो तेव्हा तू माझ्यावर नजर ठेवतोस कारण त्यामुळेच माझ्या पापाबद्दल तू मला शिक्षा करशील
14Si pequé, tú me has observado, Y no me limpias de mi iniquidad.
15पाप केल्यावर मी अपराधी असेन आणि माझ्या दृष्टीने ते फारच वाईट असेल. परंतु मी निष्पाप असूनही माथा उंच करु शकत नाही. मला खूप लाज वाटते आणि मी गोंधळून जातो.
15Si fuere malo, ­ay de mí! Y si fuere justo, no levantaré mi cabeza, Estando harto de deshonra, Y de verme afligido.
16मी जेव्हा यशस्वी होतो आणि मला गर्व चढू लागतो तेव्हा शिकाऱ्याने सिंहाची शिकार करावी तशी तू माझी शिकार करतोस. तू तुझे सामर्थ्य पुन्हा माझ्याविरुध्द दाखवितोस.
16Y subirá de punto, pues me cazas como á león, Y tornas á hacer en mí maravillas.
17माझी चूक सिध्द करण्यासाठी तुझ्याकडे नेहमीच कुणीतरी असते. माझ्यावराचा तुझा राग अधिकच भडकेल. तू माझ्याविरुध्द सैन्याची आणखी कुमक पुन: पुन्हा आणशील.
17Renuevas contra mí tus plagas, Y aumentas conmigo tu furor, Remudándose sobre mí ejércitos.
18म्हणून देवा, तू मला जन्माला तरी का घातलेस? मी कुणाच्या दृष्टीस पडण्याआधीच मेलो असतो तर बरे झाले असते.
18¿Por qué me sacaste de la matriz? Habría yo espirado, y no me vieran ojos.
19मी जगलोच नसतो तर बरे झाले असते. माझ्या मातेच्या उदरातून मला सरळ थडग्यातच नेले असते तर किती चांगले झाले असते.
19Fuera, como si nunca hubiera sido, Llevado desde el vientre á la sepultura.
20[This verse may not be a part of this translation]
20¿No son mis días poca cosa? Cesa pues, y déjame, para que me conforte un poco.
21[This verse may not be a part of this translation]
21Antes que vaya para no volver, A la tierra de tinieblas y de sombra de muerte;
22काळोखाच्या गर्भात, मृत्यूलोकात जाण्यासाठी जो थोडा वेळ अजून आहे तो मला सुखाने घालवू दे, जिथून कुणीही परत येत नाही अशा काळोखाने दाट छायेने आणि गोंधळाने भरलेल्या, ज्या जागी प्रकाशसुध्दा अंधकारमय आहे अशा जागी जाण्यापूर्वी मला सुखाने जगू दे.”‘
22Tierra de oscuridad, lóbrega Como sombra de muerte, sin orden, Y que aparece como la oscuridad misma.