Marathi

Syriac: NT

Ephesians

1

1देवाच्या इच्छेने झालेला येशू ख्रिस्ताचा दास पौल याजकडून, इफिस येथे जे देवाचे लोक आहेत त्यांना व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणान्यांना,
1ܦܘܠܘܤ ܫܠܝܚܐ ܕܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܒܨܒܝܢܗ ܕܐܠܗܐ ܠܐܝܠܝܢ ܕܐܝܬܝܗܘܢ ܒܐܦܤܘܤ ܩܕܝܫܐ ܘܡܗܝܡܢܐ ܒܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܀
2देव आपला पिता आणि आपला प्रभु येशू ख्रिस्त यांजकडून कृपा व शांति असो.
2ܫܠܡܐ ܥܡܟܘܢ ܘܛܝܒܘܬܐ ܡܢ ܐܠܗܐ ܐܒܘܢ ܘܡܢ ܡܪܢ ܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܀
3आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गराज्यातील प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आम्हांला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे.
3ܡܒܪܟ ܗܘ ܐܠܗܐ ܐܒܘܗܝ ܕܡܪܢ ܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܗܘ ܕܒܪܟܢ ܒܟܠ ܒܘܪܟܢ ܕܪܘܚ ܒܫܡܝܐ ܒܡܫܝܚܐ ܀
4ख्रिस्तामध्ये देवाने आम्हांला जग निर्माण होण्यापूर्वी त्याच्या आमच्यावरिल प्रेमामुळे त्याच्यासमोर आम्ही निर्दोष व पवित्र असावे म्हणून निवडले आहे.
4ܐܝܟܢܐ ܕܩܕܡ ܓܒܢ ܒܗ ܡܢ ܩܕܡ ܬܪܡܝܬܗ ܕܥܠܡܐ ܕܢܗܘܐ ܩܕܝܫܐ ܘܕܠܐ ܡܘܡ ܩܕܡܘܗܝ ܘܒܚܘܒܐ ܩܕܡ ܪܫܡܢ ܠܗ ܀
5त्याच्या कृपायुक्त हेतूनुसार येशू ख्रिस्ताद्वारे त्याने दत्तक होण्यासाठी आमची नेमणूक केली.
5ܘܤܡܢ ܠܒܢܝܐ ܒܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܐܝܟ ܕܫܦܪ ܠܨܒܝܢܗ ܀
6त्याने हे त्याच्या गौरवी कृपेची स्तुति व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हांला फुकट दिली.
6ܕܢܫܬܒܚ ܫܘܒܚܐ ܕܛܝܒܘܬܗ ܗܘ ܕܐܫܦܥ ܥܠܝܢ ܒܝܕ ܚܒܝܒܗ ܀
7त्याच्यामध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही स्वंतत्र केले गेलो, त्याच्या कृपेच्या समृद्धीने आम्हांला आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे.
7ܕܒܗ ܐܝܬ ܠܢ ܦܘܪܩܢܐ ܘܒܕܡܗ ܫܘܒܩܢܐ ܕܚܛܗܐ ܐܝܟ ܥܘܬܪܐ ܕܛܝܒܘܬܗ ܀
8त्याची कृपा आपले ज्ञान आणि समजबुद्धी वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे.
8ܗܝ ܕܐܬܝܬܪܬ ܒܢ ܒܟܠ ܚܟܡܐ ܘܒܟܠ ܤܘܟܠ ܀
9ख्रिस्तामध्ये आपणांला दाखविण्याच्या त्याच्या अनुग्रहाप्रमाणे त्याच्या इच्छेचे रहस्य आपल्याला कळविले.
9ܘܐܘܕܥܢ ܐܪܙܐ ܕܨܒܝܢܗ ܗܘ ܕܩܕܡ ܗܘܐ ܤܡ ܕܢܤܥܘܪ ܒܗ ܀
10पृथ्वीवरील आणि स्वर्गातील सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र आणण्यासाठी अशी ती योजना काळाच्या पूर्णतेसाठी होती.
10ܠܡܕܒܪܢܘܬܐ ܕܡܘܠܝܗܘܢ ܕܙܒܢܐ ܕܟܠܡܕܡ ܡܢ ܕܪܝܫ ܢܬܚܕܬ ܒܡܫܝܚܐ ܕܒܫܡܝܐ ܘܒܐܪܥܐ ܀
11ख्रिस्तामध्ये आम्ही देवाचे लोक म्हणून निवडले गेलो होतो. यासाठी आम्ही अगोदरच निवडले गेलो होतो. देवाचा हेतू लक्षात घेऊन जो सर्व गोष्टी त्याच्या इच्छेच्या हेतूनुसार पूर्णत्वास नेतो
11ܘܒܗ ܚܢܢ ܐܬܓܒܝܢ ܐܝܟ ܕܩܕܡ ܪܫܡܢ ܘܨܒܐ ܗܘ ܕܟܠ ܤܥܪ ܐܝܟ ܬܪܥܝܬܐ ܕܨܒܝܢܗ ܀
12यासाठी की, ज्या आम्ही ख्रिस्तावर अगोदरच आशा ठेवली होती, त्या आम्हांकडून त्याच्या गौरवाची स्तुति व्हावी.
12ܕܢܗܘܐ ܚܢܢ ܐܝܠܝܢ ܕܩܕܡܢ ܤܒܪܢ ܒܡܫܝܚܐ ܠܗܕܪܐ ܕܬܫܒܘܚܬܗ ܀
13ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुद्धा जेव्हा सत्याची म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा देवाने तुम्हांवर शिक्का मारला
13ܕܐܦ ܐܢܬܘܢ ܒܗ ܫܡܥܬܘܢ ܡܠܬܐ ܕܩܘܫܬܐ ܕܐܝܬܝܗ ܤܒܪܬܐ ܕܚܝܝܟܘܢ ܘܒܗ ܗܝܡܢܬܘܢ ܘܐܬܚܬܡܬܘܢ ܒܪܘܚܐ ܕܩܘܕܫܐ ܕܡܠܝܟܐ ܗܘܬ ܀
14जोपर्यंत देव, आम्ही जे त्याचे आहोत त्यांना पूर्ण आणि शेवटचे स्वातंत्र्य देईपर्यंत पवित्र आत्मा हा आमच्या वतनाच्या हिश्शाचा विसार आहे. आणि यामुळे त्याच्या गौरवाची स्तुति होईल.
14ܗܝ ܕܐܝܬܝܗ ܪܗܒܘܢܐ ܕܝܪܬܘܬܢ ܠܦܘܪܩܢܐ ܕܐܝܠܝܢ ܕܚܐܝܢ ܘܠܫܘܒܚܐ ܕܐܝܩܪܗ ܀
15यासाठी, जेव्हापासून मी तुमच्या प्रभु येशूवरील विश्वासाविषयी ऐकले आणि देवाच्या लोकांबद्दलच्या तुमच्या प्रेमाविषयी ऐकले,
15ܡܛܠ ܗܢܐ ܐܦ ܐܢܐ ܗܐ ܡܢ ܕܫܡܥܬ ܗܝܡܢܘܬܟܘܢ ܕܒܡܪܢ ܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܘܚܘܒܟܘܢ ܕܠܘܬ ܩܕܝܫܐ ܀
16तेव्हापासून तुमच्यासाठी देवाचे उपकार मानण्याचे मी थांबविले नाही.
16ܠܐ ܡܫܬܠܐ ܐܢܐ ܠܡܘܕܝܘ ܥܠ ܐܦܝܟܘܢ ܘܠܡܥܗܕܟܘܢ ܒܨܠܘܬܝ ܀
17मी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, तुम्हाला ज्ञान व प्रकटीकरणाचे आध्यात्मिक सामर्थ्य जे पित्याविषयी ज्ञान तुम्हांला पुरवील, ते देवो.
17ܕܐܠܗܗ ܕܡܪܢ ܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܐܒܐ ܕܬܫܒܘܚܬܐ ܢܬܠ ܠܟܘܢ ܪܘܚܐ ܕܚܟܡܬܐ ܘܕܓܠܝܢܐ ܒܝܕܥܬܗ ܀
18मी असे सांगतो की, तुमच्या अंत:करणाचे डोळे प्रकाशित होवोत यासाठी की तुम्हाला तुमच्या पाचारणाची आशा व संतांमध्ये त्याच्या वतनाच्या वैभवाची श्रीमंती किती आहे हे कळावे.
18ܘܢܢܗܪܢ ܥܝܢܐ ܕܠܒܘܬܟܘܢ ܕܬܕܥܘܢ ܡܢܘ ܤܒܪܐ ܕܩܪܝܢܗ ܘܡܢܘ ܥܘܬܪܐ ܕܫܘܒܚܐ ܕܝܪܬܘܬܗ ܒܩܕܝܫܐ ܀
19आणि आम्हांला विश्वासणान्यांसाठी त्याचे अतुलनीय सामर्थ्य किती महान आहे, जणू काय त्याच्या प्रचंड सामर्थ्यचा तो सराव आहे.
19ܘܡܢܐ ܗܝ ܝܬܝܪܘܬܐ ܕܪܒܘܬܐ ܕܚܝܠܗ ܒܢ ܒܐܝܠܝܢ ܕܡܗܝܡܢܝܢܢ ܐܝܟ ܡܥܒܕܢܘܬܐ ܕܬܘܩܦܐ ܕܚܝܠܗ ܀
20जो तो ख्रिस्तामध्ये करतो. जेव्हा त्याला (ख्रिस्ताला) मरणातून उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात देवाच्या उजव्या हाताला बसविले.
20ܕܥܒܕ ܒܡܫܝܚܐ ܘܐܩܝܡܗ ܡܢ ܒܝܬ ܡܝܬܐ ܘܐܘܬܒܗ ܡܢ ܝܡܝܢܗ ܒܫܡܝܐ ܀
21देवाने ख्रिस्ताला प्रत्येक अधिपती, अधिकारी, सामर्थ्य, प्रभूत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे या युगातच नव्हे तर येणाऱ्या युगातही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा उंच ठिकाणी ठेवले.
21ܠܥܠ ܡܢ ܟܠܗܝܢ ܐܪܟܘܤ ܘܫܘܠܛܢܐ ܘܚܝܠܐ ܘܡܪܘܬܐ ܘܠܥܠ ܡܢ ܟܠ ܫܡ ܕܡܫܬܡܗ ܠܐ ܒܠܚܘܕ ܒܥܠܡܐ ܗܢܐ ܐܠܐ ܐܦ ܒܕܥܬܝܕ ܀
22आणि देवाने ख्रिस्ताला मंडळीचा सर्वोच्च प्रमुख केले.
22ܘܫܥܒܕ ܟܠܡܕܡ ܬܚܝܬ ܪܓܠܘܗܝ ܘܠܗ ܕܐܝܬܘܗܝ ܠܥܠ ܡܢ ܟܠ ܝܗܒܗ ܪܫܐ ܠܥܕܬܐ ܀
23मंडळी ख्रिस्ताचे शरीर आहे. जी पूर्णता त्याने सर्व गोष्टींमध्ये सर्व रीतीने भरली आहे, ती पूर्णता तो मंडळीला देतो.
23ܕܐܝܬܝܗ ܓܘܫܡܗ ܘܫܘܡܠܝܐ ܕܗܘ ܕܟܠ ܒܟܠ ܡܫܡܠܐ ܀