Marathi

Syriac: NT

Ephesians

2

1पूर्वी तुम्ही आपले अपराध आणि पातके यांमुळे आध्यात्मिक रीतीने मेला होता.
1ܘܐܦ ܠܟܘܢ ܕܡܝܬܝܢ ܗܘܝܬܘܢ ܒܚܛܗܝܟܘܢ ܘܒܤܟܠܘܬܟܘܢ ܀
2ज्यामध्ये तुम्ही पूर्वी जगत होता, जगातील दुष्ट मार्गाचे अनुकरण करीत होता, आणि आपल्याला न दिसणारे आध्यात्मिक सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्या सताधीशाचे अनुकरण करीत होता. जे देवाच्या आज्ञा पाळीत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये हाच आत्मा कार्य करीत आहे.
2ܒܗܠܝܢ ܕܡܢ ܩܕܝܡ ܗܠܟܬܘܢ ܗܘܝܬܘܢ ܒܗܝܢ ܐܝܟ ܥܠܡܝܘܬܗ ܕܥܠܡܐ ܗܢܐ ܘܐܝܟ ܨܒܝܢܗ ܕܪܝܫ ܫܘܠܛܢܐ ܕܐܐܪ ܘܕܪܘܚܐ ܗܕܐ ܕܡܬܚܦܛܐ ܒܒܢܝܐ ܕܠܐ ܡܬܛܦܝܤܢܘܬܐ ܀
3एके काळी आम्हीसुद्धा त्यांच्यामध्ये आमच्या मानवी देहाच्या दुष्ट इच्छांचे समाधान करीत होतो आणि आमच्या मानवी मनाच्या दुष्ट वासनांची पूर्तंता करीत होतो. तसेच जगातील इतरांप्रमाणेच आम्ही त्याच्या क्रोधाची मुले झालो होतो.
3ܒܗܢܘܢ ܥܒܕܐ ܕܐܦ ܚܢܢ ܐܬܗܦܟܢ ܒܗܘܢ ܡܢ ܩܕܝܡ ܒܪܓܝܓܬܐ ܕܒܤܪܢ ܘܥܒܕܝܢ ܗܘܝܢ ܨܒܝܢܐ ܕܒܤܪܢ ܘܕܬܪܥܝܬܢ ܘܒܢܝܐ ܗܘܝܢ ܕܪܘܓܙܐ ܡܠܝܐܝܬ ܐܝܟ ܫܪܟܐ ܀
4पण देव खूप दयाळू आहे. त्याच्या महान प्रीतिने त्याने आमच्यावर प्रेम केले.
4ܐܠܗܐ ܕܝܢ ܕܥܬܝܪ ܒܪܚܡܘܗܝ ܡܛܠ ܚܘܒܗ ܤܓܝܐܐ ܕܐܚܒܢ ܀
5आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या आमच्या पापांमध्ये मेलेले असतानाच त्याने आम्हांला ख्रिस्ताबरोबर जीवन दिले. (तुमचे तारण देवाच्या कृपने झाले आहे.)
5ܟܕ ܡܝܬܝܢ ܗܘܝܢ ܒܚܛܗܝܢ ܐܚܝܢ ܥܡ ܡܫܝܚܐ ܘܒܛܝܒܘܬܗ ܦܪܩܢ ܀
6देवाने आम्हांला ख्रिस्ताबरोबर नविन जीवनात उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात त्याच्याबरोबर त्याच्या आसनावर बसविले, कारण आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहोत.
6ܘܐܩܝܡܢ ܥܡܗ ܘܐܘܬܒܢ ܥܡܗ ܒܫܡܝܐ ܒܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܀
7देवाने हे केले यासाठी की, येणाऱ्या युगात त्याच्या अतुलनीय कृपेची संपत्ती दाखविता यावी आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्हांविषयीची ममता व्यक्त करावी.
7ܕܢܚܘܐ ܠܥܠܡܐ ܕܐܬܝܢ ܪܒܘܬܐ ܕܥܘܬܪܐ ܕܛܝܒܘܬܗ ܘܒܤܝܡܘܬܗ ܕܗܘܬ ܥܠܝܢ ܒܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܀
8कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आणि ते तुमच्याकडून झाले नही, तर ते देवापासूनचे दान असे आहे.
8ܒܛܝܒܘܬܗ ܗܘ ܓܝܪ ܐܬܦܪܩܢ ܒܗܝܡܢܘܬܐ ܘܗܕܐ ܠܐ ܗܘܬ ܡܢܟܘܢ ܐܠܐ ܡܘܗܒܬܐ ܗܝ ܕܐܠܗܐ ܀
9आणि एखादा काही काम करतो त्याचा परिणाम म्हणून नव्हे. यासाठी कोणी बढाई मारु नये.
9ܠܐ ܡܢ ܥܒܕܐ ܕܠܐ ܐܢܫ ܢܫܬܒܗܪ ܀
10कारण आम्ही देवाच्या हाताने घडविलेले आहोत. ख्रिस्तामध्ये आम्हांला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अगोदरच तयार केले होते. यासाठी की, त्यामध्ये चालणे आम्हांला शक्य व्हावे.
10ܒܪܝܬܐ ܚܢܢ ܓܝܪ ܕܝܠܗ ܕܐܬܒܪܝܢ ܒܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܠܥܒܕܐ ܛܒܐ ܗܢܘܢ ܕܡܢ ܩܕܝܡ ܛܝܒ ܐܠܗܐ ܕܒܗܘܢ ܢܗܠܟ ܀
11म्हणून, आठवा की एके काळी, तुम्ही यहूदीतर म्हणून जन्मला होता आणि त्यांना (विदेश्यांना) सुंता न झालेले असे, ज्यांची सुंता झालेली होती ते यहूदी लोक म्हणत होते.
11ܡܛܠ ܗܕܐ ܗܘܝܬܘܢ ܥܗܕܝܢ ܕܐܢܬܘܢ ܥܡܡܐ ܡܢ ܩܕܝܡ ܕܒܤܪ ܗܘܝܬܘܢ ܘܡܬܩܪܝܢ ܗܘܝܬܘܢ ܥܘܪܠܘܬܐ ܡܢ ܗܝ ܕܡܬܩܪܝܐ ܓܙܘܪܬܐ ܘܐܝܬܝܗ ܥܒܕ ܐܝܕܝܐ ܒܒܤܪܐ ܀
12आठवा की, त्यावेळी तुम्ही ख्रिस्तविरहित, देवाचे लोक जे इस्राएल त्या समाजातून तुम्हाला बहिष्कृत केले होते, आणि देवाच्या अभिवचनाशी निगडित अशा कराराशी तुम्ही परके असे होता, तुम्ही या जगात आशेशिवाय आणि देवाशिवाय जगला.
12ܘܐܝܬܝܟܘܢ ܗܘܝܬܘܢ ܒܗܘ ܙܒܢܐ ܕܠܐ ܡܫܝܚܐ ܘܢܘܟܪܝܝܢ ܗܘܝܬܘܢ ܡܢ ܕܘܒܪܐ ܕܐܝܤܪܝܠ ܘܐܟܤܢܝܐ ܗܘ ܠܕܝܬܩܐ ܕܡܘܠܟܢܐ ܘܕܠܐ ܤܒܪ ܗܘܝܬܘܢ ܘܕܠܐ ܐܠܗ ܒܥܠܡܐ ܀
13पण आता, ख्रिस्तामध्ये जे तुम्ही एके काळी देवापासून दूर होता, ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आणलेले आहात.
13ܗܫܐ ܕܝܢ ܒܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܐܢܬܘܢ ܕܡܢ ܩܕܝܡ ܪܚܝܩܝܢ ܗܘܝܬܘܢ ܩܪܝܒܐ ܗܘܝܬܘܢ ܒܕܡܗ ܕܡܫܝܚܐ ܀
14कारण त्याच्याद्वारे आम्हांला शांतीचा लाभ झाला आहे. त्याने दोन्ही गोष्टी एक केल्या आणि आपल्या शरीराने त्याने वैराचा, दुभागणाऱ्या भिंतीचा अडथळा पाडून टाकला.
14ܗܘܝܘ ܓܝܪ ܫܝܢܢ ܗܘ ܕܥܒܕ ܬܪܬܝܗܝܢ ܚܕܐ ܘܫܪܐ ܤܝܓܐ ܕܩܐܡ ܗܘܐ ܒܡܨܥܬܐ ܀
15त्याने नियमशास्त्र त्याच्या नीतिनियमांसहित रद्द केले. यासाठी की स्वत:मध्ये दोघांचा एक मानव निर्माण करुन शांति करणे त्याला शक्य व्हावे.
15ܘܒܥܠܕܒܒܘܬܐ ܒܒܤܪܗ ܘܢܡܘܤܐ ܕܦܘܩܕܐ ܒܦܘܩܕܢܘܗܝ ܒܛܠ ܕܠܬܪܝܗܘܢ ܢܒܪܐ ܒܩܢܘܡܗ ܠܚܕ ܒܪܢܫܐ ܚܕܬܐ ܘܥܒܕ ܫܝܢܐ ܀
16आणि त्याच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे देवाबरोबर एका शरीरात त्या दोघांमध्ये समेट घडवून आणता यावा, ज्यामुळे या दोन गोष्टीतील वैमनस्य संपवता येईल.
16ܘܪܥܝ ܠܬܪܝܗܘܢ ܒܚܕ ܦܓܪ ܥܡ ܐܠܗܐ ܘܒܙܩܝܦܗ ܩܛܠ ܒܥܠܕܒܒܘܬܐ ܀
17म्हणून तो आला आणि त्याने जे तुम्ही देवापासून दूर होता व जे तुम्ही देवाजवळ होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली,
17ܘܐܬܐ ܤܒܪ ܫܠܡܐ ܠܟܘܢ ܠܪܚܝܩܐ ܘܠܩܪܝܒܐ ܀
18कारण त्याच्या द्वारे, आम्हा दोघांचा एका आत्म्याच्या द्वारे देवाजवळ प्रवेश होतो.
18ܡܛܠ ܕܒܗ ܗܘ ܗܘܐ ܠܢ ܩܘܪܒܐ ܠܬܪܝܢ ܒܚܕܐ ܪܘܚ ܠܘܬ ܐܒܐ ܀
19यामुळे, तुम्ही आता परके आणि यहूदीतर नाहीत. तर तुम्ही देवाच्या लोकांबरोबरचे सहनागरिक आणि देवाचे कुटुंबीय आहात.
19ܡܟܝܠ ܠܐ ܗܘܝܬܘܢ ܐܟܤܢܝܐ ܘܠܐ ܬܘܬܒܐ ܐܠܐ ܒܢܝ ܡܕܝܢܬܐ ܕܩܕܝܫܐ ܘܒܢܝ ܒܝܬܗ ܕܐܠܗܐ ܀
20तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे या पायावर बांधलेली इमारत आहा, आणि ख्रिस्त येशू स्वत: तिचा कोनशिला आहे.
20ܘܐܬܒܢܝܬܘܢ ܥܠ ܫܬܐܤܬܐ ܕܫܠܝܚܐ ܘܕܢܒܝܐ ܘܗܘ ܗܘܐ ܪܝܫ ܩܪܢܐ ܕܒܢܝܢܐ ܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܀
21संपूर्ण इमारात त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभुमध्ये एक पवित्र मंदिर होण्यासाठी वाढत आहे.
21ܘܒܗ ܡܬܪܟܒ ܟܠܗ ܒܢܝܢܐ ܘܪܒܐ ܠܗܝܟܠܐ ܩܕܝܫܐ ܒܡܪܝܐ ܀
22त्याच्यामध्ये तुम्हीही इतरांबरोबर आत्म्याच्या द्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र रचले जात आहात.
22ܟܕ ܐܦ ܐܢܬܘܢ ܒܗ ܡܬܒܢܝܢ ܐܢܬܘܢ ܠܡܥܡܪܐ ܕܐܠܗܐ ܒܪܘܚ ܀