Marathi

Syriac: NT

Revelation

19

1यानंतर मी मोठ्या जनसमुदायाच्या गर्जनेसारखा स्वर्गातून आवाज ऐकला. ते म्हणत होते: “हालेलुया! तारण, गौरव आणि सत्ता आमच्या देवाची आहेत
1ܘܡܢ ܒܬܪ ܗܠܝܢ ܫܡܥܬ ܩܠܐ ܪܒܐ ܕܟܢܫܐ ܤܓܝܐܐ ܒܫܡܝܐ ܕܐܡܪܝܢ ܗܠܠܘܝܐ ܦܘܪܩܢܐ ܘܬܫܒܘܚܬܐ ܘܚܝܠܐ ܠܐܠܗܢ ܀
2कारण त्याचे न्यायनिवाडे खरे आणि योग्य आहेत ज्या मोठ्या वेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने सर्व पृथ्वी भ्रष्ट केली, तिला देवाने शिक्षा केली आहे. त्याच्या सेवकाच्या रक्ताचा त्याने सूड घेतला आहे.”
2ܡܛܠ ܕܫܪܝܪܝܢ ܘܟܐܢܝܢ ܕܝܢܘܗܝ ܡܛܠ ܕܕܢ ܠܙܢܝܬܐ ܪܒܬܐ ܐܝܕܐ ܕܚܒܠܬ ܠܐܪܥܐ ܒܙܢܝܘܬܗ ܘܬܒܥ ܕܡܐ ܕܥܒܕܘܗܝ ܡܢ ܐܝܕܝܗ ܀
3ते पुन्हा म्हणाले, “हालेलुया! तिच्यापासून निघालेला धूर अनंतकाळ वर जातो.”
3ܕܬܪܬܝܢ ܐܡܪܘ ܗܠܠܘܝܐ ܘܬܢܢܗ ܤܠܩ ܠܥܠܡ ܥܠܡܝܢ ܀
4मग चोवीस वडीलजन आणि चार जिवंत प्राणी जो देव सिंहासनावर बसला आहे त्याच्या पाया पडले व त्यांनी त्याची उपासना केली. ते म्हणाले: “आमेन, हालेलुया!”
4ܘܢܦܠܘ ܥܤܪܝܢ ܘܐܪܒܥܐ ܩܫܝܫܝܢ ܘܐܪܒܥ ܚܝܘܢ ܘܤܓܕܘ ܠܐܠܗܢ ܕܝܬܒ ܥܠ ܟܘܪܤܝܐ ܘܐܡܪܝܢ ܐܡܝܢ ܗܠܠܘܝܐ ܀
5मग सिंहासनावरुन एक वाणी झाली, ती म्हणाली, “देवाच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुति करा, जे तुम्ही त्याचे भय धरता ते तुम्ही सर्व लहानथोर देवाची स्तुति करा!”
5ܘܩܠܐ ܡܢ ܟܘܪܤܝܐ ܕܐܡܪ ܫܒܚܘ ܠܐܠܗܢ ܟܠܗܘܢ ܥܒܕܘܗܝ ܘܕܚܠܝ ܫܡܗ ܟܠܗܘܢ ܙܥܘܪܐ ܥܡ ܪܘܪܒܐ ܀
6नंतर मोठ्या लोकसमुदायाच्या गर्जनेसारखा आवाज मी ऐकला, तो आवाज महापूराच्या आणि मेघांच्या मोठया गडगडाटासारखा होता. तो लोकसमुदास असे मोठ्याने म्हणत होता की: “हालेलुया! कारण आमच्या सर्वसमर्थ देवाने सत्ता गाजविण्यास सुरुवात केली आहे.
6ܘܫܡܥܬ ܩܠܐ ܐܝܟ ܕܟܢܫܐ ܤܓܝܐܐ ܘܐܝܟ ܩܠܐ ܕܡܝܐ ܤܓܝܐܐ ܘܐܝܟ ܩܠܐ ܕܪܥܡܐ ܚܝܠܬܢܐ ܕܐܡܪܝܢ ܗܠܠܘܝܐ ܡܛܠ ܕܐܡܠܟ ܡܪܝܐ ܐܠܗܐ ܐܚܝܕ ܟܠ ܀
7आपण उल्हास करु व आनंदात राहू! आणि त्याचे गौरव करु कारण कोकऱ्याचे लग्न जवळ आले आहे. आणि त्याच्या वधूने स्वत:ला नटवून तयार केले आहे
7ܚܕܝܢܢ ܘܡܬܦܨܚܝܢܢ ܢܬܠ ܠܗ ܬܫܒܘܚܬܐ ܡܛܠ ܕܐܬܬ ܡܫܬܘܬܗ ܕܐܡܪܐ ܘܐܢܬܬܗ ܛܝܒܬ ܢܦܫܗ ܀
8तिला स्वच्छ, चमकणारे तागाचे कपडे नेसायला दिले आहेत.” (देवाच्या पवित्र लोकांनी केलेली नीतीमत्त्वाची कामे म्हणजेच तलम तागाचे कपडे आहेत)
8ܘܐܬܝܗܒ ܠܗ ܕܬܬܥܛܦ ܒܘܨܐ ܕܟܝܐ ܘܢܗܝܪܐ ܒܘܨܐ ܓܝܪ ܬܪܝܨܬܐ ܐܢܝܢ ܕܩܕܝܫܐ ܀
9नंतर तो देवदूत मला म्हणाला, “हे लिही, ज्यांना कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण दिले आहे, ते धन्य!” तो मला म्हणाला, “हे देवाचे खरेखुरे शब्द आहेत.”
9ܘܐܡܪܘ ܠܝ ܟܬܘܒ ܛܘܒܝܗܘܢ ܠܐܝܠܝܢ ܕܠܚܫܡܝܬܐ ܕܡܫܬܘܬܗ ܕܐܡܪܐ ܐܝܬܝܗܘܢ ܩܪܝܐ ܘܐܡܪ ܠܝ ܗܠܝܢ ܡܠܐ ܕܫܪܝܪܢ ܕܐܠܗܐ ܐܝܬܝܗܝܢ ܀
10यावर मी देवदूताच्या पायावर डोके ठेवून त्याची उपासना करु लागलो; परंतु देवदूत म्हणाला, “असे करु नको, मी तर तुझ्याबरोबरीचा आणि येशूच्या सत्याबाबत साक्ष देण्याची जबाबदारी तुझ्या ज्या भावांवर आहे, त्यांच्या बरोबरीचा एक सेवक मात्र आहे. देवाची उपासना कर! येशूच्या सत्याचे शिक्षण देणे हाच देवाच्या संदेशाचा आत्मा आहे.”
10ܘܢܦܠܬ ܩܕܡ ܪܓܠܘܗܝ ܘܤܓܕܬ ܠܗ ܘܐܡܪ ܠܝ ܠܐ ܟܢܬܟ ܐܝܬܝ ܘܕܐܚܝܟ ܗܠܝܢ ܕܐܝܬ ܠܗܘܢ ܤܗܕܘܬܐ ܕܝܫܘܥ ܠܐܠܗܐ ܤܓܘܕ ܝܬܝܪܐܝܬ ܤܗܕܘܬܐ ܓܝܪ ܕܝܫܘܥ ܐܝܬܝܗ ܪܘܚܐ ܕܢܒܝܘܬܐ ܀
11नंतर माझ्यासमोर स्वर्ग उघडलेला मी पाहिला; आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा होता. त्या घोड्यावर बसलेल्याचे ‘नाव विश्वासू आणि खरा’ असे होते; कारण तो न्यायाने निवाडा करतो आणि न्यायाने लढाई करतो.
11ܘܚܙܝܬ ܫܡܝܐ ܕܦܬܝܚ ܘܗܐ ܤܘܤܝܐ ܚܘܪܐ ܘܕܝܬܒ ܥܠܘܗܝ ܡܬܩܪܐ ܡܗܝܡܢܐ ܘܫܪܝܪܐ ܘܒܟܐܢܘܬܐ ܕܐܢ ܘܡܩܪܒ ܀
12त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. आणि त्याच्या डोक्यावर अनेक मुगुट आहेत. त्याचे नाव त्याच्यावर लिहिले आहे. ते नाव काय आहे हे त्याच्याशिवाय इतर कोणालाही माहीत नाही.
12ܥܝܢܘܗܝ ܕܝܢ ܐܝܟ ܫܠܗܒܝܬܐ ܕܢܘܪܐ ܘܥܠ ܪܝܫܗ ܬܐܓܐ ܤܓܝܐܐ ܘܐܝܬ ܠܗ ܫܡܐ ܟܬܝܒܐ ܐܝܢܐ ܕܠܐ ܝܕܥ ܐܠܐ ܐܢ ܗܘ ܀
13त्याने आपल्या अंगात रक्तामध्ये भिजविलेला झगा घातला होता. त्या स्वाराचे नाव “देवाचा शब्द” असे आहे.
13ܘܡܥܛܦ ܡܐܢܐ ܕܙܠܝܥ ܒܕܡܐ ܘܡܬܩܪܐ ܫܡܗ ܡܠܬܐ ܕܐܠܗܐ ܀
14स्वच्छ आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेले स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यांवर बसून त्याच्या मागे येत होते.
14ܘܚܝܠܘܬܐ ܕܫܡܝܐ ܢܩܝܦܝܢ ܗܘܘ ܠܗ ܥܠ ܪܟܫܐ ܚܘܪܐ ܘܠܒܝܫܝܢ ܒܘܨܐ ܚܘܪܐ ܘܕܟܝܐ ܀
15त्याच्या तोंडातून एक धारदार तरवार येते जिच्याने तो राष्ट्रांना नमवील, आणि लोखंडी दंडाने तो त्यांच्यावर सता गाजवील. सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाची द्राक्षे तो द्राक्षकुंडामध्ये तुडवील.
15ܘܡܢ ܦܘܡܗܘܢ ܢܦܩܐ ܚܪܒܐ ܚܪܝܦܬܐ ܕܒܗ ܢܩܛܠܘܢ ܠܥܡܡܐ ܘܗܘ ܢܪܥܐ ܐܢܘܢ ܒܫܒܛܐ ܕܦܪܙܠܐ ܘܗܘ ܕܐܫ ܡܥܨܪܬܐ ܕܪܘܓܙܗ ܕܐܠܗܐ ܐܚܝܕ ܟܠ ܀
16त्याच्या झग्यावर आणि त्याच्या मांडीवर हे नाव लिहिले आहे:
16ܘܐܝܬ ܠܗ ܥܠ ܡܐܢܘܗܝ ܥܠ ܥܛܡܬܗ ܫܡܐ ܟܬܝܒܐ ܡܠܟܐ ܕܡܠܟܐ ܘܡܪܐ ܕܡܪܘܬܐ ܀
17नंतर सूर्यात उभा राहिलेला एक देवदूत मी पाहिला. तो मोठ्याने ओरडून आकाशामध्ये उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना म्हणत होता, “या! देवाच्या महान मेजवानीसाठी जमा व्हा!
17ܘܚܙܝܬ ܐܚܪܢܐ ܡܠܐܟܐ ܕܩܐܡ ܒܫܡܫܐ ܘܩܥܐ ܒܩܠܐ ܪܡܐ ܘܐܡܪ ܠܦܪܚܬܐ ܕܦܪܚܐ ܡܨܥܬ ܫܡܝܐ ܐܬܟܢܫܘ ܠܚܫܡܝܬܐ ܪܒܬܐ ܕܐܠܗܐ ܀
18म्हणजे राजे, सरदार आणि प्रसिद्ध माणासांचे मांस तुम्हांला खावयाला मिळेल. घोड्यांचे आणि त्यांच्यावर स्वार झालेल्यांचे, तसेच स्वतंत्र व गुलाम, लहान व थोर अशा सर्व लोकांचे मांस तुम्हांला खावयाला मिळेल.”
18ܕܬܐܟܠܘܢ ܒܤܪܐ ܕܡܠܟܐ ܘܒܤܪܐ ܕܪܫܝ ܐܠܦܐ ܘܒܤܪܐ ܕܥܫܝܢܐ ܘܒܤܪܐ ܕܪܟܫܐ ܘܕܐܝܠܝܢ ܕܝܬܒܝܢ ܥܠܝܗܘܢ ܘܒܤܪܐ ܕܚܐܪܐ ܘܕܥܒܕܐ ܘܕܙܥܘܪܐ ܘܕܪܘܪܒܐ ܀
19मग मी ते श्र्वापद आणि पृथ्वीवरील राजे आपापले सैन्य घेऊन जमा झालेले पाहिले. घोडेस्वारबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करण्यासाठी ते जमा झाले होते.
19ܘܚܙܝܬ ܠܚܝܘܬܐ ܘܠܚܝܠܘܬܗ ܘܡܠܟܐ ܕܐܪܥܐ ܘܠܦܠܚܝܗܘܢ ܕܡܟܢܫܝܢ ܠܡܥܒܕ ܩܪܒܐ ܥܡ ܗܘ ܕܝܬܒ ܥܠ ܤܘܤܝܐ ܘܥܡ ܦܠܚܘܗܝ ܀
20त्या श्र्वापदाला पकडण्यात आले. त्या प्राण्याच्या समक्ष ज्या खोट्या संदेष्ट्याने चमत्कार केले होते, त्याला देखील प्राण्याबरोबर पकडण्यात आले. प्राण्याचा शिक्का अंगावर असलेल्या आणि त्याच्या मूर्तीची उपासना करणाऱ्या लोकांना त्या खोट्या संदेष्ट्याने चमत्कार दाखवून फसविले, त्या दोघांना (प्राणी आणि खोटा संदेष्टा यांना) धगधगत्या गंधकाच्या अग्नीने भरलेल्या तळ्यात जिवंत असे टाकण्यात आले.
20ܘܐܬܬܨܝܕܬ ܚܝܘܬܐ ܘܢܒܝܐ ܕܓܠܐ ܥܡܗ ܗܘ ܕܥܒܕ ܐܬܘܬܐ ܩܕܡܝܗ ܕܒܗܝܢ ܐܛܥܝ ܠܐܝܠܝܢ ܕܢܤܒܘ ܪܘܫܡܐ ܕܚܝܘܬܐ ܘܠܐܝܠܝܢ ܕܤܓܕܘ ܠܨܠܡܗ ܘܢܚܬܘ ܬܪܝܗܘܢ ܘܐܬܪܡܝܘ ܒܝܡܬܐ ܕܢܘܪܐ ܕܝܩܕܐ ܘܕܟܒܪܝܬܐ ܀
21शिल्लक राहीलेले सैन्य, घोडेस्वाराच्या तोंडामधून निघालेल्या तरवारीने ठार मारण्यात आले. आणि साऱ्या पक्ष्यांनी त्या सैनिकांचे मांस पोटभर खाल्ले.
21ܘܕܫܪܟܐ ܕܝܢ ܐܬܩܛܠܘ ܒܚܪܒܗ ܕܗܘ ܕܝܬܒ ܥܠ ܤܘܤܝܐ ܒܐܝܕܐ ܕܢܦܩܐ ܡܢ ܦܘܡܗ ܘܟܠܗ ܛܝܪܐ ܤܒܥܬ ܡܢ ܒܤܪܗܘܢ ܀