Marathi

Syriac: NT

Revelation

20

1आणि मी एक देवदूत स्वर्गातून खाली येताना पाहिला. त्याच्या हातात खोल बोगद्याची किल्ली आणि एक मोठा साखळदंड होता.
1ܘܚܙܝܬ ܐܚܪܢܐ ܡܠܐܟܐ ܕܢܚܬ ܡܢ ܫܡܝܐ ܕܐܝܬ ܥܠܘܗܝ ܩܠܝܕܐ ܕܬܗܘܡܐ ܘܫܝܫܠܬܐ ܪܒܬܐ ܒܐܝܕܗ ܀
2त्या देवदूताने त्या जुनाट अजगराला म्हणजे सैतानाला धरले आणि एक हजार वर्षासाठी साखळदंडाने बांधून ठेवले.
2ܘܠܒܟܗ ܠܬܢܝܢܐ ܚܘܝܐ ܩܕܡܝܐ ܗܘ ܕܐܝܬܘܗܝ ܐܟܠܩܪܨܐ ܘܤܛܢܐ ܘܐܤܪܗ ܐܠܦ ܫܢܝܢ ܀
3त्याने एक हजार वर्षे पुरी होईपर्यंत राष्ट्रांना आणखी फसवू नये. म्हणून त्या देवदूताने त्याला खोल बोगद्यात टाकून दिले. आणि त्या दाराला कुलूप लावून शिक्का मारला. त्या काळांनंतर पुन्हा थोडा काळ त्याला मोकळे सोडण्यात येणार होते.
3ܘܐܪܡܝܗ ܒܬܗܘܡܐ ܘܐܚܕ ܘܛܒܥ ܠܥܠ ܡܢܗ ܕܠܐ ܬܘܒ ܢܛܥܐ ܠܟܠܗܘܢ ܥܡܡܐ ܒܬܪ ܗܠܝܢ ܝܗܝܒ ܠܡܫܪܝܗ ܩܠܝܠ ܙܒܢܐ ܀ 4 ܘܚܙܝܬ ܡܘܬܒܐ ܘܝܬܒܘ ܥܠܝܗܘܢ ܘܕܝܢܐ ܐܬܝܗܒ ܠܗܘܢ ܘܢܦܫܬܐ ܗܠܝܢ ܕܐܬܦܤܩ ܡܛܠ ܤܗܕܘܬܐ ܕܝܫܘܥ ܘܡܛܠ ܡܠܬܐ ܕܐܠܗܐ ܘܕܐܝܠܝܢ ܕܠܐ ܤܓܕܘ ܠܚܝܘܬܐ ܘܠܐ ܠܨܠܡܗ ܘܠܐ ܢܤܒܘ ܪܘܫܡܐ ܥܠ ܒܝܬ ܥܝܢܝܗܘܢ ܐܘ ܥܠ ܐܝܕܝܗܘܢ ܕܚܝܘ ܘܐܡܠܟܘ ܥܡ ܡܫܝܚܐ ܐܠܦ ܫܢܝܢ ܀
4नंतर ज्यांच्यावर लोक बसलेले आहेत, अशी काही सिंहासने मी पाहिली. या लोकांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार देण्यात आला होता आणि येशूबाबतच्या सत्याविषयी साक्ष दिल्यामुळे व प्रभु देवाच्या संदेशामुळे ज्या लोकांना जिवे मारण्यात आले, त्यांचे आत्मे मी पाहिले. त्या लोकांनी श्र्वापदाची अथवा त्याच्या मूर्तीची उपासना केली नव्हती, आणि त्यांच्या कपाळावर किंवा हातावर त्या जनावराचा शिक्का मारलेला नव्हता. ते परत जिवंत झाले. आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले.
4
5(इतर जे मेले होते, ते एक हजार वर्षे पुरी होईपर्यंत परत जिवंत झाले नाही) जे पाहिले पुनरुत्थान ते हेच होय.
5ܘܗܕܐ ܗܝ ܩܝܡܬܐ ܩܕܡܝܬܐ ܀
6ज्याला पहिल्या पुनरुत्थानात भाग आहे, तो धन्य! त्या लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता चालणार नाही; उलट ते लोक देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील; आणि ते त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.
6ܛܘܒܢܐ ܗܘ ܘܩܕܝܫܐ ܡܢ ܕܐܝܬ ܠܗ ܡܢܬܐ ܒܩܝܡܬܐ ܩܕܡܝܬܐ ܘܥܠ ܗܠܝܢ ܠܝܬ ܫܘܠܛܢܐ ܠܡܘܬܐ ܬܢܝܢܐ ܐܠܐ ܢܗܘܘܢ ܟܗܢܐ ܕܐܠܗܐ ܘܕܡܫܝܚܐ ܘܢܡܠܟܘܢ ܥܡܗ ܐܠܦ ܫܢܝܢ ܀
7नंतर, जेव्हा एक हजार वर्षे संपतील, तेव्हा सैतानाला त्याच्या तुरुंगवासातून सोडण्यात येईल.
7ܘܡܐ ܕܐܫܬܠܡ ܐܠܦ ܫܢܝܢ ܢܫܬܪܐ ܤܛܢܐ ܡܢ ܚܒܘܫܝܗ ܀
8आणि जगाच्या चारही कोपऱ्यात पसरलेल्या राष्ट्रांना फसविण्यासाठी सैतान बंदीवासातून बाहेर पडेल. त्याने फसवून गोग व मागेग यांना लढाईसाठी एकत्र आणले. त्यांची संख्या सागराच्या वाळूच्या संख्येइतकी आहे.
8ܘܢܦܘܩ ܠܡܛܥܝܘ ܠܟܠܗܘܢ ܥܡܡܐ ܒܐܪܒܥ ܙܘܝܬܗ ܕܐܪܥܐ ܠܓܘܓ ܘܠܡܓܘܓ ܘܠܡܟܢܫܘ ܐܢܘܢ ܠܩܪܒܐ ܐܝܠܝܢ ܕܡܢܝܢܗܘܢ ܐܝܟ ܚܠܐ ܕܝܡܐ ܀ 9 ܘܤܠܩܘ ܥܠ ܦܬܝܗ ܕܐܪܥܐ ܘܚܕܪܘܗ ܠܡܕܝܢܬܐ ܕܡܫܪܝܬܐ ܕܩܕܝܫܐ ܘܠܡܕܝܢܬܐ ܚܒܝܒܬܐ ܘܢܚܬܬ ܢܘܪܐ ܡܢ ܫܡܝܐ ܡܢ ܐܠܗܐ ܘܐܟܠܬ ܐܢܘܢ ܀
9ते सैतानाचे सैनिक जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चाल करुन आले आणि त्यांनी देवाच्या लोकांच्या छावणीला व प्रिय नगराला वेढा दिला. परंतु स्वर्गातून अग्नि खाली उतरला आणि त्यांना जाळून त्यांची राख केली.
9
10मग ज्याने त्यांना फसविले होते, त्याला त्या धगधगत्या सरोवरामध्ये, श्र्वापद आणि खोटा संदेष्टा यांना टाकले होते त्या गंधकाच्या तळ्यात टाकण्यात येईल. आणि त्यांना अनंतकाळ रात्रंदिवस पीडा होत राहील.
10ܘܐܟܠܩܪܨܐ ܡܛܥܝܢܗܘܢ ܐܬܪܡܝ ܒܝܡܬܐ ܕܢܘܪܐ ܘܟܒܪܝܬܐ ܐܝܟܐ ܕܚܝܘܬܐ ܘܢܒܝܐ ܕܓܠܐ ܘܢܫܬܢܩܘܢ ܐܝܡܡܐ ܘܠܠܝܐ ܠܥܠܡ ܥܠܡܝܢ ܀
11नंतर एक मोठे पांढरे सिंहासन आणि त्याच्यावर जो बसला होता. त्याला मी पाहिले. त्याच्या समोरुन पृथ्वी आणि आकाश ही पळून गेली. आणि त्याच्यासाठी कोठेच जागा नव्हती.
11ܘܚܙܝܬ ܟܘܪܤܝܐ ܪܒܐ ܚܘܪܐ ܘܠܕܝܬܒ ܠܥܠ ܡܢܗ ܗܘ ܕܡܢ ܩܕܡ ܐܦܘܗܝ ܥܪܩܬ ܐܪܥܐ ܘܫܡܝܐ ܘܐܬܪ ܠܐ ܐܫܬܟܚ ܠܗܘܢ ܀
12नंतर मेलेले लहानथोर लोक सिंहासनासमोर उभे राहिलेले मी पाहिले. अनेक पुस्तके उघडलेली होती. आणि आणखी एक. म्हणजे जीवनी पुस्तक उघडले होते. आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या त्या मेलेल्या लोकांच्या कृतीप्रमाणे त्यांचा न्यायनिवाडा करण्यात आला.
12ܘܚܙܝܬ ܠܡܝܬܐ ܪܘܪܒܐ ܘܙܥܘܪܐ ܕܩܡܘ ܩܕܡ ܟܘܪܤܝܐ ܘܤܦܪܐ ܐܬܦܬܚܘ ܘܐܚܪܢܐ ܤܦܪܐ ܐܬܦܬܚ ܕܐܝܬܘܗܝ ܕܕܝܢܐ ܘܐܬܕܝܢܘ ܡܝܬܐ ܡܢ ܐܝܠܝܢ ܕܟܬܝܒܢ ܒܤܦܪܐ ܐܝܟ ܥܒܕܝܗܘܢ ܀
13सागराने आपल्यामधील मेलेले लोक बाहेर सोडून दिले. तसेच मरण आणि अधोलोक यांनी आपल्यामधील मेलेले लोक सोडून दिले. आणि प्रत्येक मनुष्याचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्यानुसार करण्यात आला.
13ܘܝܗܒ ܝܡܐ ܡܝܬܐ ܕܒܗ ܘܡܘܬܐ ܘܫܝܘܠ ܝܗܒܘ ܡܝܬܐ ܕܨܐܝܕܝܗܘܢ ܘܐܬܕܝܢ ܚܕ ܚܕ ܡܢܗܘܢ ܐܝܟ ܥܒܕܝܗܘܢ ܀
14नंतर मरण व अधोलोक यांना अग्नीच्या तळ्यात टाकण्यात आले. हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण होय.
14ܘܡܘܬܐ ܘܫܝܘܠ ܐܬܪܡܝܘ ܒܝܡܬܐ ܕܢܘܪܐ ܗܢܐ ܕܐܝܬܘܗܝ ܡܘܬܐ ܬܢܝܢܐ ܀
15आणि जर कोणाचे नाव जीवनी पुस्तकात सापडले नाही, तर त्याला अग्नीच्या तळ्यात टाकण्यात येत होते.
15ܘܐܝܢܐ ܕܠܐ ܐܫܬܟܚ ܕܪܫܝܡ ܒܟܬܒܐ ܕܚܝܐ ܐܬܪܡܝ ܒܝܡܬܐ ܕܢܘܪܐ ܀