Marathi

Turkish

1 Samuel

12

1शमुवेल सर्व इस्राएलांना उद्देशून म्हणाला, “मी सर्व काही तुमच्या म्हणण्याप्रमाणे केले आहे. तुमच्यावर राजा नेमला आहे.
1Bundan sonra Samuel İsrail halkına şöyle dedi: ‹‹Bana söylediğiniz her şeye kulak verdim: Size bir kral atadım.
2तो आता तुमचे नेतृत्व करील. मी आता म्हातारा झालो, थकलो पण माझी मुल तुमच्या बरोबर आहेत. मी अगदी लहान असल्यापासून तुमचे नेतृत्व केले.
2Şimdi size önderlik yapan bir kralınız var. Bense yaşlandım, saçım ağardı. Oğullarım da sizlerle birlikte. Gençliğimden bu güne dek size önderlik yaptım.
3हा मी इथे आहे. माझ्या हातून काही चुकलेले असेल तर ते परमेश्वराला आणि तुम्ही निवडलेल्या राजाला सांगा. मी कोणाचा बैल किंवा गाढव चोरले आहे का? कोणाला दुखवले किंवा फसवले का? कोणाकडून मी कधी पैसाच काय पण जोडा तरी लाच म्हणून घेतला का? तसे असेल तर मी त्याची भरपाई करीन.”
3İşte karşınızda duruyorum. Hanginizin öküzünü aldım? Kimin eşeğine el koydum? Kimi dolandırdım? Kime baskı yaptım? Göz yummak için kimden rüşvet aldım? RABbin ve Onun meshettiğinin önünde bana karşı tanıklık edin de size karşılığını vereyim.››
4यावर सर्व इस्राएलांनी उत्तर दिले, “नाही, तुमच्या हातून कोणतेही कुकर्म झालेले नाही. तुम्ही कधी आम्हाला फसवले नाहीत की लाच घेतली नाहीत.”
4Halk, ‹‹Bizi dolandırmadın›› diye karşılık verdi, ‹‹Bize baskı da yapmadın. Kimsenin elinden hiçbir şey almadın.››
5तेव्हा शमुवेल सर्वाना म्हणाला, “आज या घटनेला परमेश्वर आणि त्याने निवडलेला राजा साक्षी आहेत. तुमचे म्हणणे त्यांनी ऐकले आहे. माझ्याहातून काहीही वावगे घडले नसल्याचे तुमचे मत त्यांना माहीत आहे.” तेव्हा लोक एकमताने म्हणाले, “होय! परमेश्वर त्याला साक्षी आहे.”
5Samuel, ‹‹Bana karşı bir şey bulamadığınıza bugün hem RAB, hem de Onun meshettiği kral tanıktır›› dedi. ‹‹Evet, tanıktır›› dediler.
6मग शमुवेल म्हणाला, “काय काय घडले ते परमेश्वराला माहीत आहे. मोशे आणि अहरोन यांना त्यानेच नेमले. तुमच्या पूर्वजांनाही त्यानेच मिसरमधून सोडवले.
6Samuel konuşmasını şöyle sürdürdü: ‹‹Musa ile Harunu görevlendiren, atalarınızı Mısırdan çıkaran RABdir.
7आता सर्वजण येथे शांत उभे राहा म्हणजे परमेश्वराने तुमच्यासाठी आणि तुमच्या पूर्वजांसाठी कोणकोणती सत्कृत्ये केली ती मी तुम्हाला सांगतो.
7Şimdi burada durun, RABbin önünde, Onun sizi ve atalarınızı tekrar tekrar nasıl kurtardığına dair kanıtlar göstereyim size.
8याकोब मिसरमध्ये गेल्यावर तेथील लोकांनी त्याच्या वंशजांचे जिणे कठीण केले तेव्हा त्यांनी परमेश्वराची करुणा भाकली. म्हणून परमेश्वराने मोशे आणि अहरोन यांना पाठवले. त्यानी मग त्या तुमच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले आणि या ठिकाणी आणले.
8‹‹Yakup Mısıra gittikten sonra, atalarınız RABbe yakardı. O da atalarınızı Mısırdan çıkarıp burada yerleşmelerini sağlayan Musa ile Harunu gönderdi.
9“पण तुमचे पूर्वज आपला स्वामी जो परमेश्वर त्याला विसरले. तेव्हा परमेश्वराने त्यांना सीसराचे गुलाम बनू दिले. सीसरा हा हासोर येथील सैन्याचा सेनापती होता. त्यानंतर परमेश्वराने त्यांना पलिष्टी आणि मवाबचा राजा यांचे गुलाम बनवले. हे सर्व तुमच्या पूर्वजांबरोबर घडले.
9Ama atalarınız Tanrıları RABbi unuttular. Bu yüzden RAB onları Hasor ordusunun komutanı Siseranın, Filistlilerin ve Moav Kralının eline teslim etti. Bunlar atalarınıza karşı savaştılar.
10तेव्हा तुमच्या पूर्वजांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली. ते म्हणाले, “आमच्या हातून पातक घडले. परमेश्वराला सोडून बाल, अष्टारोथ या भलत्या दैवतांची आम्ही भक्ती केली. पण आता आमची शत्रूच्या तावडीतून सुटका कर म्हणजे आम्ही फक्त तुझीच सेवा करु.”
10Atalarınız RABbe, ‹Günah işledik; RABbi bırakıp Baalın ve Aştoretin putlarına kulluk ettik. Ama şimdi bizi düşmanlarımızın elinden kurtar, sana kulluk edeceğiz› diye seslendiler.
11“तेव्हा मग परमेश्वराने यरुबाबेल (गिदोन), बदान, इफताह आणि शमुवेल यांना पाठवून शत्रूंपासून तुमची सुटका केली. तेव्हा तुम्हाला स्वस्थता लाभली.
11RAB de Yerubbaalı, Bedanıfö, Yiftahı ve ben Samueli gönderdi. Güvenlik içinde yaşamanız için sizi saran düşmanlarınızın elinden kurtardı. ‹‹Barak››. ‹‹Şimşonu››.
12पण मग अम्मोन्यांचा राजा नाहाश याला तुमच्यावर चाल करुन येताना तुम्ही पाहिले आणि तुम्हाला संरक्षणासाठी राजा असाव असे वाटले. प्रत्यक्ष परमेश्वर तुमचा देव राजा असतानाही तुम्हाला असे वाटले.
12‹‹Ama siz Ammon Kralı Nahaşın üzerinize yürüdüğünü görünce, Tanrınız RAB kralınız olduğu halde bana, ‹Hayır, bize bir kral önderlik yapacak› dediniz.
13तेव्हा तोही तुम्हाला मिळाला. परमेश्वरानेच त्याची निवड केली.
13İşte seçtiğiniz, dilediğiniz kral! Evet, RAB size bir kral verdi.
14परमेश्वर तुमचे सतत रक्षण करील पण तुम्ही मात्र त्यासाठी खालील गोष्टी पाळल्या पाहिजेत; सन्मानपूर्वक परमेश्वराची सेवा करा. त्याच्या आज्ञेविरुध्द जाऊन कोणाशी लढू नका. तुम्ही व तुमचा राजा यांनी परमेश्वर देवालाच मानावे. असे वागल्याने परमेश्वर तुमचे रक्षण करील.
14Eğer RABden korkar, Ona kulluk ederseniz, Onun sözünü dinleyip buyruklarına karşı gelmezseniz, hem siz hem de önderiniz olacak kral Tanrınız RABbin ardınca giderseniz, ne âlâ!
15पण त्याचा अवमान केलात, त्याच्या आज्ञेविरुध्द बंड केलेत तर तो तुमच्याकडे पाठ फिरवील. तुमचा व तुमच्या राजाचा नाश करील.
15Ama RABbin sözünü dinlemez, buyruklarına karşı gelirseniz, RAB kralınızı cezalandırdığı gibi sizi de cezalandıracaktır. ‹‹Atalarınızı››.
16“आता स्तब्ध उभे राहा आणि परमेश्वराचे महान कृत्य आपल्या डोळ्यांदेखत पाहा.
16‹‹Şimdi olduğunuz yerde durun ve RABbin gözlerinizin önünde yapacağı şu olağanüstü olayı görün.
17सध्या गव्हाच्या कापणीचे दिवस आहेत. मी परमेश्वराची प्रार्थना करतो. त्याने ढगांच्या गडाडाटासह पाऊस पाडावा अशी मी विनंती करतो. तेव्हा, राजाची मागणी करुन आपण परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कृत्य केले आहे हे तुम्हाला कळेल.”
17Bugün buğday biçme zamanı değil mi? Göğü gürletsin, yağmur yağdırsın diye RABbe yalvaracağım. Böylece bir kral istemekle yaptığınız kötülüğün RABbin gözünde ne denli büyük olduğunu iyice anlayacaksınız.››
18आणि शमुवेलने परमेश्वराची प्रार्थना केली. त्याच दिवशी मेघगर्जनेसह जोरदार वृष्टी झाली. त्यामुळे लोकांनी परमेश्वराची आणि शमुवेलची धास्ती घेतली.
18Samuel RABbe yalvardı ve RAB o gün göğü gürletti, yağmur yağdırdı. Halk RABden de Samuelden de çok korktu.
19ते शमुवेलला म्हणाले, “आम्हा दासांच्या वतीने तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करा. आम्हाला मरु देऊ नका. आमच्या हातून अनेक पातके घडली आहेत. राजाची मागणी करुन तर आम्ही त्यात आणखी भरच घातली आहे.”
19Bunun üzerine Samuele, ‹‹Yok olmayalım diye, biz kulların için Tanrın RABbe yakar›› dediler, ‹‹Çünkü bütün günahlarımıza kendimize bir kral istemek kötülüğünü de ekledik.››
20शमुवेल त्यांना म्हणाला, “तुमच्या हातून पापे घडली आहेत हे खरे, पण घाबरुन जाऊ नका. परमेश्वराला अनुसरायचे सोडू नका. मनोभावे त्याची सेवा करा.
20Samuel halka, ‹‹Korkmayın›› dedi, ‹‹Siz bu büyük kötülüğü yaptınız, ama yine de RABbin ardınca gitmekten vazgeçmeyin; tersine, bütün yüreğinizle RABbe kulluk edin.
21मूर्ती म्हणजे निरर्थक वस्तू. निळळ पुतळे. तेव्हा त्यांची पूजा करु नका. मूर्ती तुमचे रक्षण करत नाहीत की मदतीला येत नाहीत त्या व्यर्थ होत.
21Kimseyi kurtaramayan yararsız putların ardınca gitmeyin; çünkü onlar değersizdir.
22“पण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करत नाही. उलट त्याने मोठ्या प्रेमाने तुम्हाला आपले मानले आहे. तेव्हा त्याच्या मोठ्या नावाखातर तो तुम्हाला सोडून देणार नाही.
22RAB görkemli adının hatırına halkını bırakmayacak. Çünkü sizi kendi halkı kılmaktan hoşnut kaldı.
23आणि माझे म्हणाल, तर मी तुमच्या वतीने नेहमीच प्रार्थना करत राहीन. तसे मी केले नाही तर परमेश्वराच्या दृष्टीने ते मोठे पाप ठरेल. चांगले आयुष्य जगायचा योग्य मार्ग मी तुम्हाला दाखवत राहीन.
23Bana gelince, sizin için RABbe yalvarmaktan vazgeçip Ona karşı günah işlemek benden uzak olsun! Ancak size iyi ve doğru yolu öğreteceğim.
24पण तुम्ही परमेश्वराला मानले पाहिजे. मनापासून त्याचीच सेवा केली पाहिजे. त्याने तुमच्यासाठी जे चमत्कार केले ते आठवले पाहिजेत.
24Yalnız RABden korkun, Ona bağlılıkla ve bütün yüreğinizle kulluk edin. Onun sizler için ne görkemli işler yaptığını bir düşünün!
25पण तुम्ही आडमुठेपणा आणि दुष्टपणा दाखवलात तर मात्र केरसुणीने केर झटकावा तसा, तुम्हाला तुमच्या राजासह परमेश्वर नष्ट करुन टाकील.”
25Ama kötülük yapmayı sürdürürseniz, hem siz yok olacaksınız, hem de kralınız.››