Marathi

Turkish

Judges

4

1एहूदच्या मृत्यूनंतर पुन्हा लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य वर्तन करायला सुरुवात केली.
1Ehutun ölümünden sonra İsrailliler yine RABbin gözünde kötü olanı yaptılar.
2तेव्हा परमेश्वराने कनानी राजा याबीन याला इस्राएल लोकांचा पराभव करु दिला. हासोर नावाच्या नगरात हा राजा राज्य करत होता. सीसरा हा त्याचा सेनापती होता. हरोशेथ या नगरात सीसरा राहात होता.
2RAB de İsraillileri Hasorda egemenlik süren Kenanlı kral Yavinin eline teslim etti. Yavinin Sisera adında bir ordu komutanı vardı; Haroşet-Goyimde yaşardı.
3सीसराकडे नऊशे लोखंडी रथ होते. त्याच्या जुलमी राजवटीत इस्राएल लोक वीस वर्षे होते. तेव्हा त्यांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली.
3Dokuz yüz demir savaş arabasına sahip olan Yavin, yirmi yıldır İsraillileri acımasızca eziyordu. Bu yüzden İsrailliler RABbe yakardılar.
4तेव्हा दबोरा नांवाची एक संदेष्ट्री होती. ती लप्पिदोथ नांवाच्या माणसाची पत्नी होती. ती इस्राएल लोकांची न्यायाधीश होती.
4O sırada İsraili Lappidotun karısı Peygamber Debora yönetiyordu.
5एक दिवस ती खजुरीच्या झाडाखाली बसलेली असताना सीसराबद्दल विचार विनिमय करण्यासाठी इस्राएल लोक तिच्याकडे आले. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा व बेथल यांच्यामध्ये हे खजुरीचे झाड होते.
5Debora Efrayimin dağlık bölgesinde, Rama ile Beytel arasındaki hurma ağacının altında oturur, kendisine gelen İsraillilerin davalarına bakardı.
6तिने बाराक नामक माणसाला बोलावणे पाठवले. बाराक हा अबीनवामचा मुलगा होता. तो नफतालीच्या भागातील केदेश या नगरात राहात असे. दबोरा त्याला म्हणाली, “इस्राएल लोकांच्या परमेश्वराची तुला आज्ञा आहे की, नफताली आणि जबुलून यांच्या वंशातील दहाहजार पुरुषांना गोळा कर. त्यांना घेऊन ताबोर डोंगराकडे जा.
6Debora bir gün adam gönderip Avinoam oğlu Barakı Kedeş-Naftaliden çağırttı. Ona, ‹‹İsrailin Tanrısı RAB, yanına Naftali ve Zevulunoğullarından on bin kişi alıp Tavor Dağına gitmeni buyuruyor›› dedi,
7मी सेनापती सीसरा याला रथ आणि सैन्य यासह किशोन नदीकडे तुझ्या दिशेला यायला लावीन. तेथे सीसराचा पराभव करायला मी तुला मदत करीन.
7‹‹RAB, ‹Kral Yavinin ordu komutanı Siserayı, savaş arabalarını ve ordusunu Kişon Vadisine, senin yanına çekip eline teslim edeceğim› diyor.››
8त्यावर बाराक दबोराला म्हणाला, “तूही माझ्याबरोबर येणार असलीस तर मी हे करीन. तू नसलीस तर मात्र करणार नाही.”
8Barak Deboraya, ‹‹Eğer benimle gelirsen giderim›› dedi, ‹‹Benimle gelmezsen gitmem.››
9दबोरा म्हणाली, “अर्थातच मी येणार आहेच पण तुझ्या अशा वृत्तीमुळे सीसराचा पराभव होईल तेव्हा तुझी प्रतिष्ठा राहणार नाही. परमेश्वर एका स्त्रीच्या हातून सीसराचा पराभव करणार आहे.” आणि दबोरा बाराक बरोबर केदेश नगराला गेली.
9Debora, ‹‹Seninle gelmesine gelirim, ama böyle bir yol tuttuğun için onurlandırılmayacaksın›› dedi, ‹‹Çünkü RAB Siserayı bir kadının eline teslim etmiş olacak.›› Böylece Debora kalkıp Barakla birlikte Kedeşe gitti.
10तेथे बाराकने जबुलून आणि नफताली यांच्या वंशातील लोकांना बोलावून दहाहजार जणांना घेतले. दबोराही बाराक बरोबर होती.
10Barak Zevulun ve Naftali oğullarını Kedeşte topladı. Ardında on bin kişi vardı. Debora da onunla birlikte gitti.
11हेबेर नावाचा एक माणूस केनी लोकांमध्ये होता. तो आपल्या लोकांपासून वेगळा झाला होता. (केनी लोक होबाबचे वंशज होते. होबाब म्हणजे मोशेचा सासरा) केदेशजवळच्या साननीम येथे एलोन वृक्षाजवळ हेबेरने तळ दिला होता.
11Kenlilerden Hever, Musanın kayınbiraderi Hovavın torunlarından, yani Kenlilerden ayrılmış, çadırını Kedeş yakınında Saanannimdeki meşe ağacının yanına kurmuştu.
12अबीनवामचा मुलगा बाराक ताबोर डोंगरापाशी आला असल्याचे कोणीतरी सीसराला सांगितले.
12Avinoam oğlu Barakın Tavor Dağına çıktığını duyan Sisera,
13तेव्हा सीसराने आपले नऊशे लोखंडी रथ आणि सर्व सैन्य एकत्र केले हरोशेथपासून त्या सर्वांनी किशोन नदीच्या दिशेने मोर्चा वळवला.
13dokuz yüz demir arabasını ve yanındaki halkı Haroşet-Goyimden çıkarıp Kişon Vadisinde topladı.
14तेव्हा दबोरा बाराकला म्हणाली, “आज सीसराचा पराभव करायला परमेश्वर तुला मदत करणार आहे. त्याने आधीच तुझा मार्ग मोकळा केला आहे हे तुला माहीतच आहे.” तेव्हा बाराक ताबोर डोंगरावरुन दहाहजार माणसांसह निघाला.
14Debora Baraka, ‹‹Haydi kalk! Çünkü RABbin Siserayı senin eline teslim ettiği gün bugündür›› dedi, ‹‹RAB senin önünden gidiyor.›› Bunun üzerine Barak ardında on bin kişiyle Tavor Dağından indi.
15त्यांनी सीसरावर हल्ला चढवला. लढाईत सीसरा, त्याचे रथ, सैन्य यांच्यामध्ये परमेश्वराने गोंधळ माजवला त्यांना काय करावे हे सुचेना. बाराक व त्याचे सैन्य यांनी सीसराच्या सैन्याचा पराभव केला. सीसरा रथ सोडून पळाला.
15RAB, Siserayı, savaş arabalarını sürenleri ve ordusunu Barakın önünde şaşkına çevirerek bozguna uğrattı. Sisera savaş arabasından indi ve yaya olarak kaçtı.
16बाराकने सीसराच्या सैन्याशी लढाई चालूच ठेवली. त्याने व त्याच्या सैन्याने सीसराच्या रथांचा व सैन्याचा हरोशेथपर्यंत पाठलाग केला. तलवारीने ते सैन्य कापून काढले. एकालाही जिवंत ठेवले नाही.
16Barak savaş arabalarını ve orduyu Haroşet-Goyime kadar kovaladı. Siseranın bütün ordusu kılıçtan geçirildi, tek kişi bile kurtulamadı.
17पण सीसरा पळून गेला होता. तो हेबेरची बायको याएल हिच्या तंबूकडे आश्रयाला गेला. केनी हेबेर आणि हासोरचा राजा याबीन यांच्यात सलोख्याचे संबेध होते. म्हणून सीसरा तेथे गेला.
17Yaya olarak kaçan Sisera ise Kenlilerden Heverin karısı Yaelin çadırına sığındı. Çünkü Hasor Kralı Yavinle Kenlilerden Heverin arası iyiydi.
18याएलने त्याला येताना पाहिले, तेव्हा त्याला भेटायला ती पुढे झाली व म्हणाली, “आत या, व निर्धास्त राहा.” सीसरा आत आला. तिने त्याच्यावर जाजम टाकून त्याला लपवले.
18Yael Siserayı karşılamaya çıktı. Ona, ‹‹Korkma, efendim, gel çadırıma sığın›› dedi. Çadırına sığınan Siseranın üzerine bir yorgan örttü.
19सीसरा याएलला म्हणाला, “मला खूप तहान लागली आहे. आधी मला थोडे पाणी प्यायला दे.” याएलने त्याला, चामड्याच्या बुधल्यात ती दूध भरुन ठेवत असे ते प्यायला दिले. मग तिने त्याला पुन्हा लपवले.
19Sisera, ‹‹Susadım, lütfen biraz su ver de içeyim›› dedi. Yael süt tulumunu açıp ona içirdikten sonra üzerini yine örttü.
20तो तिला म्हणाला, “तू तंबूच्या दारात जाऊन उभी राहा आणि “आत कोणी आहे का?” असे कोणी विचारले तर “नाही” म्हणून सांग.”
20Sisera kadına, ‹‹Çadırın kapısında dur›› dedi, ‹‹Biri gelir de çadırda kimse var mı diye sorarsa, yok de.››
21मग याएलने तंबू ठोकायची मोठी मेख व हातोडी घेतली. व हळूच त्याच्याजवळ गेली. सीसरा खूप थकून गाढ झोपला होता. तिने ती मेख त्याच्या कानशिलाजवळ ठेवून हातोडीने ठोकली. त्याच्या डोक्यातून ती आरपार घुसून पार जमिनीत रुतली. सीसरा मरण पावला.
21Heverin karısı Yael eline bir çadır kazığı ile tokmak aldı. Yorgunluktan derin bir uykuya dalmış olan Siseraya sessizce yaklaşarak kazığı şakağına dayadı ve yere saplanıncaya dek çaktı. Sisera hemen öldü.
22तेवढचात सीसराला शोधत बाराक याएलच्या तंबूपाशी पोहोंचला. याएल त्याला पाहून बाहेर गेली व म्हणाली, “आत या तुम्हाला हवा असलेला माणूस मी दाखवते.” तेव्हा याएल बरोबर बाराक आत शिरला तेथे त्याला मेख मारलेल्या अवस्थेत मरुन पडलेला सीसरा दिसला.
22Yael Siserayı kovalayan Barakı karşılamaya çıktı. ‹‹Gel, aradığın adamı sana göstereyim›› dedi. Barak kadını izledi ve şakağına kazık çakılmış Siserayı ölü buldu.
23त्या दिवशी परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी कनान्यांचा राजा याबीन याचा पराभव केला.
23Böylece Tanrı o gün Kenanlı kral Yavini İsraillilerin önünde bozguna uğrattı.
24या याबीनला नामोहरम करत शेवटी त्याचा नाश करीपर्यंत इस्राएल लोकांचे सामर्ध्य उत्तरोत्तर वाढत गेले.
24Giderek güçlenen İsrailliler sonunda Kenanlı kral Yavin'i ortadan kaldırdılar.