1इस्राएल लोकांनी सीसराचा पराभव केला त्या दिवशी दबोरा आणि अबीनवामचा मुलगा बाराक यांनी हे गीत गायले
1Debora ile Avinoam oğlu Barak o gün şu ezgiyi söylediler:
2इस्राएलचे लोक युध्दाला तयार झाले ते स्वेच्छेने युध्दासाठी सज्ज झाले. परमेश्वराचा धन्यवाद करा.
2‹‹İsrailin önderleri başı çekince,Halk gönüllü olarak savaşıncaRABbe övgüler sunun.
3राजांनो ऐका, लक्ष द्या अधिपतींनो, मी परमेश्वराचे, इस्राएल लोकांच्या परमेश्वराचे गीत स्वत: गाईन. त्याचे स्तुति स्तोत्र म्हणीन.
3Dinleyin, ey krallar!Ey yönetenler, kulak verin!RABbe ezgiler söyleyipİsrailin Tanrısı RABbi ilahilerle öveceğim.
4परमेश्वरा. पूर्वी जेव्हा तू सेईरमधून आलास, अदोम भूमीतून तू कूच केलेस. तेव्हा पृथ्वी थरारली. आकाशाने वर्षाव केला ढगातून वृष्टी झाली.
4Seirden çıktığında, ya RAB,Edom kırlarından geçtiğinde,Yer sarsıldı, göklerden yağmur boşandı,Evet, bulutlar yağmur yağdırdı.
5पर्वतांचाही थरकाप झाला परमेश्वरापुढे. सीनाय पर्वताच्या देवापुढे. इस्राएलांचा देव परमेश्वरापुढे.
5Sina Dağında olan RABbin,İsrailin Tanrısı RABbin önündeDağlar sarsıldı.
6अनाथचा मुलगा शमगार याच्या आणि याएलच्या कारकिर्दीत राजमार्ग ओस पडले वाटसरुंचे तांडे आडवाटेने जाऊ लागले.
6Anat oğlu Şamgar zamanında,Yael zamanında kervanların ardı kesildi.Yolcular sapa yollardan gider oldu.
7दबोरा तू येईपर्यंत इस्राएलची माता म्हणून तू उभी राहीपर्यंत इस्राएलमध्ये सैनिक नव्हते. नावालाही सैनिक नव्हते.
7Bomboştu İsrailin köyleri,Ben İsrailde ana olarak ortaya çıkıncaya dek,Ben Debora ortaya çıkıncaya dekİsrailin köyleri bomboştu.
8नगराच्या वेशीपाशी युध्द करायला परमेश्वराने नवे नेते निवडले. तेव्हा चाळीस हजार इस्राएल लोकांत कोणाकडेही भाला किंवा ढाल नव्हती.
8Yeni ilahlar seçtikleri zamanSavaş kentin kapılarına dayandı.İsraildeki kırk bin askerin elindeNe kalkan ne de mızrak vardı.
9ज्यांनी स्वेच्छेने युध्दावर जाण्याचे पत्करले त्या इस्राएल लोकांच्या सेनाधिपती बरोबर माझे हृदय आहे. परमेश्वराचा धन्यवाद करा.
9Yüreğim İsraili yönetenlerleVe halkın arasındaki gönüllülerledir.RABbe övgüler sunun!
10पांढऱ्या गाढवांवर बसणाऱ्यांनो, खोगिराच्या बिछायतीवर बसणाऱ्यांनो आणि वाटेने चालणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या.
10Ey semerleri pahalı boz eşeklere binenler,Ey yoldan yaya gidenler, dinleyin!
11गुरांच्या पाणवठ्यावर आम्हाला झांजांचा नाद ऐकू येतो. जेव्हा नगराच्या वेशीपाशी परमेश्वराच्या लोकांनी लढाई केली आणि ते जिंकले तेव्हा लोक परमेश्वराच्या पराक्रमाची गाथा गातात, आणि इस्राएलच्या सैनिकांचे स्तुतिस्तोत्र म्हणतात.
11Kuyu başındaki kalabalıklarRABbin zaferlerini,İsrail savaşçılarının zaferlerini anlatıyorlar.Ardından RABbin halkı kent kapılarınaAkın etmeye başladı.
12ऊठ दबोरा, जागी हो, गाणे म्हण! बाराका ऊठ, अबीनवामाच्या मुला शत्रूंना बंदिवान कर.
12Uyan, uyan Debora, uyan uyan!Söyle, ezgiler söyle!Ey Avinoam oğlu Barak,Kalk, götür tutsaklarını.
13उरलेल्या मानकऱ्यांनो आता आपल्या नेत्यांकडे जा. परमेश्वराचे लोकाहो. तुम्ही माझ्यासाठी सैनिकांबरोबर जा. परमेश्वराने इस्राएलच्या वीरांना विजय मिळवून दिला. इस्राएलमधील जिवंत राहिलेले लोक बलवान लोकांवर विजयी झाले.
13Geriye kalanlar soyluların yanına geldi,RABbin halkı yiğitleriyle bana geldi.
14अमाले कच्या डोॅगराळ प्रदेशातून एफ्राइमचे लोक आले. हे बन्यामीन तुमच्या पाठोपाठ ते आले माखीरच्या वंशातूनही सेनापती आले. जबुलूनच्या लोकांतील सरदार तांब्याचा अधिकारदंड घेऊन आले.
14Amalek kökünden olanlar Efrayimden geldi,Benyaminliler de seni izleyenlerin arasındaydı.Yöneticiler Makirden,Başbuğ asasını taşıyanlar Zevulundan geldi.
15इस्साखारच्या नेत्यांचा दबोराला पाठिंबा होता. तसेच ते बाराकशीही प्रामाणिक होते. ते खोऱ्यात पायी चालत आले. रऊबेनी, तुमच्याही सैन्यात अनेक शूर सैनिक आहेत.
15Deborayla birlikteydi İssakarın beyleri.Evet, İssakaroğulları da Barakın ardındanHızla ovaya indi.Ama Ruben oymağının bölükleriBüyük bir kararsızlık içindeydi.
16मग तुमच्या मेंढवाड्याच्या कुंपणाजवळ बसून का राहिलात? शूर रऊबेनी टोळीच्या सैनिकांनी युध्दाचा गांभीर्याने विचार केला. पण तरी शेव्व्यामेंढ्यांसाठी वाजवलेला पावा ऐकत ते घरीच थांबले.
16Sürülerine kaval çalan çobanlarıDinlemek için neden ağıllarda kaldılar?Evet, Ruben oymağının bölükleriBüyük bir kararsızlık içindeydi.
17गिलाद लोक यार्देन नदीपलीकडल्या आपल्या छावणीत तसेच बसून राहिले. आणि दान लोकांनो, तुम्ही आपल्या गलबतांजवळ नुसते बसून का राहिलात? आशेर लोक समुद्रकाठी, सुरक्षित बंदरात तळ ठोकून राहिले.
17Gilatlılar Şeria Irmağının ötesinde kaldı,Dan oymağıysa gemilerde oyalandı.Aşer oymağı deniz kıyısında dinlendi,Koylarda yan gelip oturdu.
18पण जबुलून आणि नफताली यांनी मात्र डोंगरावरच्या त्या युध्दात प्राणांची पर्वा न करता पराक्रम केला.
18Ama Zevulun ve Naftali halklarıTehlikeye attılar canlarını savaş alanında.
19कनानी राजेही लढाईत उतरले. कनानच्या राजांनी तनाखमध्ये, मगिद्दोच्या जलाशयाजवळ लढाई केली. पण कोणतीही लूट बरोबर घेऊन ते गेले नाहीत.
19Taanakta ve Megiddo sularının kıyısındaKrallar gelip savaştılar.Kenan kralları da savaştı.Ancak ne gümüş ne ganimet aldılar.
20स्वर्गातून आकाशातील तारे आपल्या कक्षेतून सीसराशी लढले.
20Yıldızlar göklerden savaşa katıldı.Göğü bir baştan öbür başa geçerken,Siseraya karşı savaştı.
21किशोन या प्राचीन नदीने सीसराच्या सैन्याला वाहून नेले. चला, प्राणपणाने झुंजू या.
21Kişon Irmağı, o eski ırmak,Süpürüp götürdü onları.Yürü, ey ruhum, üzerlerine güçle yürü!
22घो्यांचे खूर जमिनीवर आपटले. सीसराच्या दणकट घोड्यांना पळता भुई थोडी झाली.
22O zaman atlar dörtnala koştu.Güçlü atların toynaklarıYerde izler bıraktı.
23परमेश्वराच्या दूताने सांगितले, “मेरोज शहराला, त्यातील रहिवाश्यांना शाप द्या, ते सैनिकांबरोबर परमेश्वराच्या मदतीला धावून आले नाहीत.”
23RABbin meleği, ‹Meroz Kentini lanetleyin› dedi,‹Halkına lanetler yağdırın.Çünkü RABbin yardımına,Zorbalara karşı RABbin yardımına koşmadılar.›
24याएल ही केनी हेबेरची पत्नी सर्व स्त्रियांमध्ये तिचा धन्यवाद होईल.
24Kenlilerden Heverin karısı YaelKadınlar arasında alabildiğine kutsansın.Çadırlarda yaşayan kadınlar arasındaAlabildiğine kutsansın.
25सीसराने पाणी मागितले याएलने त्याला दूध दिले राजाला साजेशा पात्रात तिने त्याला साय दिली
25Sisera su istedi, Yael ona süt verdi.Soylulara yaraşır bir çanakla ayran sundu.
26मग याएलने आपला हात पुढे केला आणि तंबूची मेख घेतली. कारागिराची हातोडी उजव्या हातात घेतली. सीसरावर तिचा प्रयोग केला. त्याच्या डोक्यावर आरपार घाव घातला.
26Sol eline çadır kazığını,Sağ eline işçi tokmağını aldı.Vurdu, Siseranın başını ezdi.Şakağına çaktı kazığı, deldi geçirdi.
27याएलच्या पायांमध्ये तो कोसळला. तो पडला तिथेच तो राहिला याएलच्या पायाशी तो कोसळला तिथेच तो पडला. तेथे तो आडवा झाला तिथेच गतप्राण झाला.
27Ayaklarının dibine çöktü,Yere serildi Sisera.Düşüp yığıldı Yaelin ayakları dibine,Yığıldığı yerde cansız kaldı.
28सीसराच्या आईने खिडकीतून पाहिले आणि तिने आकांत केला. सीसराची आई पडद्याआडून पाहू लागली “सीसराच्या रथाला एवढा उशीर का? त्याच्या रथांचा आवाज कसा ऐकू येत नाही?”
28Siseranın annesi parmaklıkların ardından,Pencereden bakıp feryat etti:‹Oğlumun savaş arabasıNeden bu kadar gecikti,Nal sesleri neden duyulmuyor?›
29तिच्या चाणाक्ष दासीने, होय दासीने, तिला उत्तर दिले.
29Bilge kadınlar onu yanıtladılar.O da şöyle düşündü:
30“माझी खात्री आहे. त्यांनी युध्द जिंकले. आता ते पराभूत लोकांकडून लूट गोळा करत आहेत ती आपसात वाटून घेत आहेत. प्रत्येक सैनिकाला एक-दोन मुली ही मिळाल्या आहेत. बहुधा सीसराला भरतकाम केलेल्या रंगीत वस्त्रांची लूट मिळाली. होय, सीसराला बहुमोल कापडच मिळाले असावे, पराक्रमी सीसराला पांघरण्यासाठी.”
30‹Ganimeti bulmuş, paylaşıyor olmalılar.Her yiğide bir ya da iki kız,Siseraya ganimet olarak rengarenk giysiler,Evet, işlemeli, rengarenk giysiler.Yağmacıların boyunları içinİki yanı işlemeli renkli giysiler,Hepsi ganimet.›
31परमेश्वरा, तुझ्या शत्रूंची अशीच अखेर होवो! आणि तुझ्यावर प्रेम करणारे लोक उगवत्या सूर्याप्रमाणे उत्तरोतर सामर्ध्यवान होवोत! अशाप्रकारे त्या प्रदेशात चाळीस वर्षे शांतता नांदली.
31Ya RAB, bütün düşmanların böyle yok olsun.Seni sevenlerse,Bütün gücüyle doğan güneş gibi olsunlar.››