Russian 1876

Marathi

Proverbs

10

1Притчи Соломона. Сын мудрый радует отца, а сын глупый – огорчение для его матери.
1ही शलमोनाची नीतिसूत्रे (शहाणपणाच्या गोष्टी) आहेत शहाणा मुलगा त्याच्या वडिलांना सुखी करतो. पण मूर्ख मुलगा त्याच्या आईला अतिशय दु:खी करतो.
2Не доставляют пользы сокровища неправедные, правдаже избавляет от смерти.
2जर एखाद्याने वाईट गोष्टी करुन पैसे मिळवले तर ते पैसे कवडी मोलाचे असतात. पण सत्कर्म तुम्हाला मरणापासून वाचवू शकते.
3Не допустит Господь терпеть голод душе праведного, стяжание же нечестивых исторгнет.
3परमेश्वर चांगल्या लोकांची काळजी घेतो. तो त्यांना हवे असलेले अन्न देतो. परंतु परमेश्वर वाईट लोकाक़डून त्यांना हव्या असलेल्या गोष्टी काढून घेतो.
4Ленивая рука делает бедным, а рука прилежных обогащает.
4आळशी माणूस गरीब राहील. पण जो माणूस कष्ट करील तो श्रीमंत होईल.
5Собирающий во время лета – сын разумный, спящий же во время жатвы – сын беспутный.
5हुशार मुलगा योग्य वेळी धान्य गोळा करतो. पण हंगामाच्या वेळी झोपणारा आणि धान्य गोळा न करणारा मुलगा लाज आणतो.
6Благословения – на голове праведника, уста же беззаконных заградит насилие.
6लोक देवाला चांगल्या माणसाला आशीर्वाद द्यायला सांगतात. वाईट लोक त्या चांगल्या गोष्टी म्हणतील परंतु त्याचे शब्द त्यांच्या वाईट योजना फक्त लपवतात.
7Память праведника пребудет благословенна, а имя нечестивых омерзеет.
7चांगली माणसे चांगल्या आठवणी मागे ठेवतात. पण वाईट माणसे लवकर विसरली जातात.
8Мудрый сердцем принимает заповеди, а глупый устами преткнется.
8चांगला, इमानी माणूस सुरक्षित असतो. परंतु कुटिल, फसवणारा माणूस मात्र पकडला जातो.
9Кто ходит в непорочности, тот ходит безопасно; а кто превращает пути свои, тот будет наказан.
9शहाण्या माणसाला जर एखाद्याने काही करायला सांगितले तर तो त्या आज्ञा पाळतो. परंतु मूर्ख माणूस वाद घालतो आणि स्वत:वर संकट ओढवून घेतो.
10Кто мигает глазами, тот причиняет досаду, а глупый устами преткнется.
10जो माणूस सत्य लपवतो तो संकटे निर्माण करतो. जो माणूस उघडपणे बोलतो तो शांती निर्माण करतो.
11Уста праведника – источник жизни, уста же беззаконных заградитнасилие.
11चांगल्या माणसाच्या शब्दांमुळे आयुष्य चांगले होते. पण दुष्टाच्या शब्दांतून त्याच्या मनातला वाईटपणा तेव्वढा दिसतो.
12Ненависть возбуждает раздоры, но любовь покрывает все грехи.
12मत्सरमुळे वादविवाद होतात. पण प्रेम लोकांनी केलेल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला क्षमा करते.
13В устах разумного находится мудрость, но на теле глупого – розга.
13शहाणे लोक ऐकायला योग्य अशा गोष्टी बोलतात. पण मूर्ख लोकांनी सुधारावे म्हणून त्यांना शिक्षा करायला हवी.
14Мудрые сберегают знание, но уста глупого – близкая погибель.
14शहाणे लोक शांत असतात आणि नवीन गोष्टी शिकतात. पण मूर्ख लोक बोलतात आणि संकटे ओढवून घेतात.
15Имущество богатого – крепкий город его, беда для бедных – скудость их.
15संपत्ती श्रीमंत माणसाचे रक्षण करते आणि गरिबी गरिबांचा नाश करते.
16Труды праведного – к жизни, успех нечестивого – ко греху.
16जर एखाद्याने चांगले कृत्य केले तर त्याला बक्षीस मिळते. त्याला आयुष्य दिले जाते. पण दुष्टावा केवळ शिक्षा आणतो.
17Кто хранит наставление, тот на пути к жизни; а отвергающий обличение – блуждает.
17जो माणूस शिक्षेपासून काही शिकतो तो इतरांनासुध्दा जगायला शिकवू शकतो. पण जो माणूस शिकायला नकार देतो तो लोकांना चुकीच्या मार्गाने नेतो.
18Кто скрывает ненависть, у того уста лживые; и кто разглашает клевету, тот глуп.
18जो माणूस त्याचा मत्सर लपवतो तो खोटे बोलत असतो. पण केवळ मूर्खच पसरवता येण्यासारख्या अफवा शोधण्याचा प्रयत्न करतो.
19При многословии не миновать греха, а сдерживающий уста свои –разумен.
19जो माणूस खूप बडबड करतो तो संकंटांना आमंत्रण देतो. शहाणा माणूस गप्प राहायला शिकतो.
20Отборное серебро – язык праведного, сердце же нечестивых – ничтожество.
20चांगल्या माणसाचे शब्द शुध्द चांदीसारखे असतात. पण दुष्ट माणसाचे विचार कवडीमोलाचे असतात.
21Уста праведного пасут многих, а глупые умирают от недостатка разума.
21चांगल्या माणसांच्या शब्दामुळे अनेकांना मदत होते. पण मूर्खाची मूर्खता त्यालाच मारु शकते.
22Благословение Господне – оно обогащает и печали с собою не приносит.
22परमेश्वराच्या आशीर्वादाने तुला खरी संपत्ती मिळेल. आणि ती आपल्याबरोबर संकटे आणणार नाही.
23Для глупого преступное деяние как бы забава, а человеку разумному свойственна мудрость.
23मूर्ख माणसाला चुका करायला आवडते. परंतु शहाणा माणूस ज्ञानाने खुश होतो.
24Чего страшится нечестивый, то и постигнет его, а желание праведников исполнится.
24दुष्ट माणसाला ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टींकडूनच त्याचा पराभव होतो. पण चांगल्या माणसाला मात्र हव्या असलेल्या गोष्टी मिळतात.
25Как проносится вихрь, так нет более нечестивого; а праведник – на вечном основании.
25दुष्टांचा नाश त्यांच्या संकटांमुळे होतो. पण चांगली माणसे नेहमी बलवान राहातात.
26Что уксус для зубов и дым для глаз, то ленивый для посылающих его.
26आळशी माणसाला तुमच्यासाठी, काहीही करायला सांगू नका. तुमच्या तोंडात शिरलेल्या आंबेप्रमाणे किंवा डोळ्यांत गेलेल्या धुराप्रमाणे तो तुम्हाला चीड आणील.
27Страх Господень прибавляет дней, лета же нечестивых сократятся.
27जर तुम्ही परमेश्वराचा आदर करीत असाल तर तुम्ही खूप जगाल. पण दुष्टाची त्याच्या आयुष्यातली अनेक वर्ष कमी होतील.
28Ожидание праведников – радость, а надежда нечестивых погибнет.
28चांगले लोक ज्या गोष्टींची आशा करतात त्या त्यांना आनंद मिळवून देतात. ज्या गोष्टींची आशा वाईट लोक करतात त्या त्यांना विनाश आणतात.
29Путь Господень – твердыня для непорочного и страх для делающих беззаконие.
29परमेश्वर चांगल्या माणसांचे रक्षण करतो. पण जे लोक चुका करतात त्यांचा परमेश्वर नाश करतो.
30Праведник во веки не поколеблется, нечестивые же не поживут на земле.
30चांगले लोक नेहमी सुरक्षित असतात. पण दुष्टांना जबरदस्तीने देश सोडणे भाग पडते.
31Уста праведника источают мудрость, а язык зловредный отсечется.
31चांगले लोक शहाणपणाच्या गोष्टी सांगतात. पण जो संकटे आणणाऱ्या गोष्टी सांगतो त्याचे ऐकणे लोक बंद करतात.
32Уста праведного знают благоприятное, а уста нечестивых – развращенное.
32चांगले लोक बोलण्याच्या योग्य गोष्टी जाणतात. पण वाईट लोक संकटे आणणाऱ्या गोष्टीच बोलतात.