Russian 1876

Marathi

Proverbs

15

1Кроткий ответ отвращает гнев, а оскорбительное слово возбуждает ярость.
1शांतपणे दिलेल्या उत्तरामुळे राग निघून जातो. पण तिखट उत्तरामुळे राग वाढतो.
2Язык мудрых сообщает добрые знания, а уста глупых изрыгают глупость.
2शहाणा माणूस बोलतो तेव्हा इतरांना ऐकावेसे वाटते. पण मूर्ख माणूस केवळ मूर्खताच बडबडतो.
3На всяком месте очи Господни: они видят злых и добрых.
3सगळीकडे काय चालले आहे ते परमेश्वर बघतो. परमेश्वर सगळ्या माणसांना बघत असतो. चांगल्या आणि वाईट.
4Кроткий язык – древо жизни, но необузданный - сокрушение духа.
4दयेचे मायेचे शब्द म्हणजे जणू जीवनवृक्ष. पण खोट्या शब्दांमुळे माणसाची उमेद खचते.
5Глупый пренебрегает наставлением отца своего; а кто внимает обличениям, тот благоразумен.
5मूर्ख माणूस त्याच्या वडिलांच्या उपदेशाकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा लोक शहाण्या माणसाला शिकवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो लक्षपूर्वक ऐकतो.
6В доме праведника – обилие сокровищ, а в прибытке нечестивого – расстройство.
6चांगले लोक पुष्कळ बाबतीत श्रीमंत असतात. पण दुष्टाकडे ज्या गोष्टी असतात त्यामुळे त्याच्यावर संकटे येतात.
7Уста мудрых распространяют знание, а сердце глупых не так.
7शहाणे लोक बोलतात तेव्हा नवीन माहिती मिळते. पण मूर्ख लोक ऐकण्यासारखे काही बोलत नाहीत.
8Жертва нечестивых – мерзость пред Господом, а молитва праведных благоугодна Ему.
8दुष्ट माणसे ज्या गोष्टी अर्पण करतात त्या परमेश्वराला आवडत नाहीत. पण परमेश्वर चांगल्या माणसाची प्रार्थना ऐकून आनंदी होतो.
9Мерзость пред Господом – путь нечестивого, а идущего путем правды Он любит.
9दुष्ट लोक ज्या प्रकारे जगतात ते परमेश्वराला आवडत नाही. जे लोक सत्कृत्य करायचा प्रयत्न करतात त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो.
10Злое наказание – уклоняющемуся от пути, и ненавидящий обличениепогибнет.
10जर एखाद्या माणसाने चुकीने जगायला सुरुवात केली तर त्याला शिक्षा होईल. आणि ज्या माणसाला योग्य अयोग्य सांगितलेले आवडत नाही त्याचा नाश होईल.
11Преисподняя и Аваддон открыты пред Господом, тем более сердца сынов человеческих.
11परमेश्वराला सर्व माहीत असते. मृत्युलोकांत काय घडते ते देखील त्याला माहीत असते. म्हणून लोकांच्या मनात आणि हृदयात काय चालले आहे ते परमेश्वराला नक्कीच ठाऊक असेल.
12Не любит распутный обличающих его, и к мудрым не пойдет.
12मूर्खाला तो चुकत आहे हे सांगितलेले आवडत नाही. आणि तो माणूस शहाण्या माणसाला माहिती विचारायला नकार देतो.
13Веселое сердце делает лице веселым, а при сердечной скорби дух унывает.
13माणूस जर आनंदी असला तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. पण जर एखादा मनातून दु:खी असला तर त्याचा आत्मा ते दु:ख दाखवेल.
14Сердце разумного ищет знания, уста же глупых питаются глупостью.
14शहाणा माणूस अधिक ज्ञान मिळवायता प्रयत्न करतो. पण मूर्खाला अधिक मूर्खताच हवी असते.
15Все дни несчастного печальны; а у кого сердце весело, у того всегда пир.
15काही गरीब लोक नेहमी खिन्न असतात. पण मनातून आनंदी असलेल्या लोकांसाठी जीवन म्हणजे एक मोठा समारंभ असतो.
16Лучше немногое при страхе Господнем, нежели большое сокровище, и при нем тревога.
16गरीब राहून परमेश्वराचा आदर करणे हे श्रीमंत होऊन खूप संकटे भोगण्यापेक्षा चांगले असते.
17Лучше блюдо зелени, и при нем любовь, нежели откормленный бык, и при нем ненависть.
17प्रेम असते त्या ठिकाणी थोडेसे खाणे हे तिरस्कार असलेल्या ठिकाणी भरपूर खाण्यापेक्षा चांगले असते.
18Вспыльчивый человек возбуждает раздор, а терпеливый утишает распрю.
18लवकर रागावणारे लोक संकटे आणतात. पण संयमी माणूस शांतता आणतो.
19Путь ленивого – как терновый плетень, а путь праведных – гладкий.
19आळशी माणसाला सगळीकडे संकटे मिळतील पण इमानदार माणसासाठी आयुष्य सोपे असेल.
20Мудрый сын радует отца, а глупый человек пренебрегает мать свою.
20शहाणा मुलगा त्याच्या वडिलांना सुखी करतो. पण मूर्ख माणूस त्याच्या आईला लाज आणतो.
21Глупость – радость для малоумного, а человек разумный идет прямою дорогою.
21मूर्ख गोष्टी करण्यात मूर्खाला आनंद मिळतो. पण चांगला माणूस योग्य गोष्टी काळजीपूर्वक करतो.
22Без совета предприятия расстроятся, а при множестве советников они состоятся.
22जर एखाद्याला पुरेशी माहिती मिळाली नाही तर त्याच्या योजना कोसळतील. पण जर एखाद्याने शहाण्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले तर तो यशस्वी होईल.
23Радость человеку в ответе уст его, и как хорошо слово вовремя!
23चांगले उत्तर दिल्यावर माणूस आनंदी होतो. आणि योग्य वेळी योग्य शब्द फारच चांगला असतो.
24Путь жизни мудрого вверх, чтобы уклониться от преисподней внизу.
24शहाण्या माणसाने केलेली गोष्ट यशाकडे नेते आणि त्या गोष्टी त्याला मृत्यूकडे जाण्यापासून वाचवतात.
25Дом надменных разорит Господь, а межу вдовы укрепит.
25गर्विष्ठ माणसाकडे असलेल्या सगळ्या गोष्टींचा परमेश्वर नाश करील. पण विधवेकडे असलेल्या गोष्टीचे परमेश्वर रक्षण करतो.
26Мерзость пред Господом – помышления злых, слова же непорочных угодны Ему.
26परमेश्वराला दुष्ट विचार आवडत नाहीत. पण परमेश्वर मायेच्या शब्दांनी आनंदी होतो.
27Корыстолюбивый расстроит дом свой, а ненавидящий подарки будет жить.
27जर एखद्याने काही वस्तू मिळवण्यासाठी फसवणूक केली तर तो त्याच्या कुटुंबावर संकटे आणतो. पण जर एखादा माणूस खरा असला आणि लाच घेण्याविषयी त्याच्या मनात घृणा असेल तर तो जगू शकेल.
28Сердце праведного обдумывает ответ, а уста нечестивых изрыгают зло.
28चांगले लोक उत्तर देण्याआधी विचार करतात. पण दुष्ट लोक विचार करण्याआधी बोलतात आणि त्यामुळे त्यांच्यावर संकटे येतात.
29Далек Господь от нечестивых, а молитву праведников слышит.
29परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे. पण तो चांगल्या माणसांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो.
30Светлый взгляд радует сердце, добрая весть утучняет кости.
30जो माणूस हसतो तो इतरांना आनंद देतो आणि चांगली बातमी ऐकून लोकांना अधिक चांगले वाटते.
31Ухо, внимательное к учению жизни, пребывает между мудрыми.
31जो माणूस त्याचे चुकते आहे असे सांगितल्यावर ऐकतो तो शहाणा असतो.
32Отвергающий наставление нерадеет о своей душе; а кто внимаетобличению, тот приобретает разум.
32जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर तो स्वत:लाच इजा करुन घेतो. तू चुकतो आहेस असे सांगितलेले जो ऐकून घेतो तो अधिकाधिक गोष्टी समजू शकतो.
33Страх Господень научает мудрости, и славе предшествует смирение.
33जो माणूस परमेश्वराचा आदर करतो तो शहाणे व्हायला शिकतो. परमेश्वराचा आदर करण्यासाठी माणसाने खरोखरच विनम्र व्हायला हवे.