1Не ревнуй злым людям и не желай быть с ними,
1वाईट लोकांचा मत्सर करु नका. त्यांच्याबरोबर तुमचा वेळ वाया घालवू नका.
2потому что о насилии помышляет сердце их, и о злом говорят устаих.
2ते त्यांच्या मनात वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात. ते फक्त त्रास देण्याच्या गोष्टी बोलत असतात.
3Мудростью устрояется дом и разумом утверждается,
3चांगली घरे शहाणपण आणि समजूतदारपणा यावर आधारलेली असतात.
4и с уменьем внутренности его наполняются всяким драгоценным и прекрасным имуществом.
4आणि सर्व मौल्यवान आणि प्रसन्न करणाऱ्या संपत्तीने खोल्या भरल्या जातात.
5Человек мудрый силен, и человек разумный укрепляет силу свою.
5शहाणपण माणसाला अधिक सामर्थ्यवान बनवते. ज्ञान माणसाला शक्ती देते.
6Поэтому с обдуманностью веди войну твою, и успех будет при множестве совещаний.
6युध्द सुरु करण्याआधी तुम्ही काळजीपूर्वक योजना आखली पाहिजे. तुम्हाला जर (युध्द) जिंकायचे असेल तर तुम्हाला अनेक चांगले मार्गदर्शक हवेत.
7Для глупого слишком высока мудрость; у ворот не откроет он устсвоих.
7मूर्ख लोकांना शहाणपण कळू शकत नाही. आणि लोक जेव्हा महत्वाच्या गोष्टींची चर्चा करतात तेव्हा मूर्ख माणूस काहीही बोलू शकत नाही.
8Кто замышляет сделать зло, того называют злоумышленником.
8जर तुम्ही नेहमी त्रास देण्याच्याच योजना आखत असाल तर लोकांना तुम्हीच त्रास देणारे आहात हे कळेल आणि ते तुमचे ऐकणार नाहीत.
9Помысл глупости – грех, и кощунник – мерзость для людей.
9मूर्ख माणूस ज्या गोष्टी करायच्या ठरवतो ते पाप असते. जो स्वत: ला इतरांपेक्षा चांगला समजतो त्याचा लोक तिरस्कार करतात.
10Если ты в день бедствия оказался слабым, то беднасила твоя.
10जर तुम्ही संकटाच्या वेळी दुर्बल असाल तर तुम्ही खरोखरच दुर्बल आहात.
11Спасай взятых на смерть, и неужели откажешься от обреченных на убиение?
11जर लोक एखाद्याला ठार मारण्याचे ठरवीत असतील तर तुम्ही त्याला वाचवायला हवे.
12Скажешь ли: „вот, мы не знали этого"? А Испытующий сердца разве не знает? Наблюдающий над душею твоею знает это, и воздаст человеку по делам его.
12“माझा त्याच्याशी काही संबंध नाही” असे तुम्ही म्हणू शकत नाही. परमेश्वराला सर्व माहीत असते. आणि तुम्ही काही गोष्टी का करता ते त्याला माहीत असते. परमेश्वर तुमच्यावर लक्ष ठेवतो. त्याला सर्व कळते. आणि तुम्ही ज्या गोष्टी करता त्याबद्दल परमेश्वर तुम्हाला बक्षीस देईल.
13Ешь, сын мой, мед, потому что он приятен, и сот, который сладок для гортани твоей:
13मुला, मध खा, तो चांगला असतो. मधाच्या पोळ्यामधला मध गोड असतो.
14таково и познание мудрости для души твоей. Если ты нашел ее , то есть будущность, и надежда твоя не потеряна.
14त्याचप्रमाणे शहाणपण तुमच्या आत्म्यासाठी चांगले असते. तुमच्या जवळ शहाणपण असेल तर तुमच्या जवळ आशाही असेल आणि तुमची आशा कधीही मावळणार नाही.
15Не злоумышляй, нечестивый, против жилища праведника, не опустошай места покоя его,
15चांगल्या माणसाकडून काही चोरु पाहणाऱ्या किंवा त्याचे घर बळकावू पहाणाऱ्या चोरासारखे होऊ नका.
16ибо семь раз упадет праведник, и встанет; а нечестивые впадут в погибель.
16चांगला माणूस जर सात वेळा पडला तर तो पुन्हा उभा राहतो. पण वाईट लोकांचा संकटात नेहमी पराभव होईल.
17Не радуйся, когда упадет враг твой, и да не веселится сердце твое, когда он споткнется.
17तुमचा शत्रू संकटात असतो तेव्हा आनंद मानू नका. तो पडतो तेव्हा आनंदून जाऊ नका.
18Иначе, увидит Господь, и неугодно будет это в очах Его, и Он отвратит от него гнев Свой.
18जर तुम्ही तसे केलेत तर परमेश्वर ते बघेल आणि परमेश्वराला तुमच्याविषयी आनंद वाटणार नाही. नंतर परमेश्वर कदाचित् तुमच्या शत्रूला मदत करील.
19Не негодуй на злодеев и не завидуй нечестивым,
19दुष्ट लोकांना तुम्हाला तुम्हाला काळजीत पडायला लावू देऊ नका आणि दुष्टांचा मत्सर करु नका.
20потому что злой не имеет будущности, – светильник нечестивых угаснет.
20या दुष्ट लोकांना आशा नसते. त्यांचा प्रकाश काळोख होईल.
21Бойся, сын мой, Господа и царя; с мятежниками не сообщайся,
21मुला, परमेश्वराचा आणि राजाचा आदर कर. आणि जे लोक त्यांच्या विरुध्द आहेत त्यांच्यात सामील होऊ नकोस.
22потому что внезапно придет погибель от них, и беду от них обоих кто предузнает?
22का? कारण त्या प्रकारच्या माणसांचा लगेच नाश होऊ शकतो. देव आणि राजा त्यांच्या शत्रूंसाठी किती संकटे निर्माण करु शकतात हे तुम्हाला माहीत नाही.
23Сказано также мудрыми: иметь лицеприятие на суде – нехорошо.
23हे शहाण्या माणसाचे शब्द आहेत. न्यायाधीशाने अगदी न्यायी असले पाहिजे. एखादा माणूस त्याच्या माहितीतला आहे म्हणून त्याला त्याने पाठिंबा देऊ नये.
24Кто говорит виновному: „ты прав", того будут проклинать народы, того будут ненавидеть племена;
24जर न्यायाधीशाने अपराधी माणसाला ‘तू जाऊ शकतोस’ असे सांगितले तर लोक त्याच्याविरुध्द जातील. आणि राष्ट्रे त्याच्याविरुध्द वाईट गोष्टी बोलतील.
25а обличающие будут любимы, и на них придет благословение.
25पण जर न्यायाधीशाने अपराध्याला शासन केले तर सर्व लोक आनंदी होतील.
26В уста целует, кто отвечает словами верными.
26खरे उत्तर सर्वांना आनंदी करते. ते ओठावरच्या चुंबनासारखे वाटते.
27Соверши дела твои вне дома, окончи их на поле твоем, и потомустрояй и дом твой.
27शेतात पेरणी करण्याआधी तुमचे घर बांधू नका. धान्य पिकवण्याची तुमची तयारी आहे याची आधी खात्री करा. मग घर बांधा.
28Не будь лжесвидетелем на ближнего твоего: к чему тебе обманывать устами твоими?
28काही चांगले कारण असल्याशिवाय कुणाच्याही विरुध्द बोलू नका. खोटे सांगू नका.
29Не говори: „как он поступил со мною, так и я поступлю с ним, воздамчеловеку по делам его".
29“त्याने मला दु:ख दिले म्हणून मीही त्याला तसेच करीन. त्याने मला त्रास दिला म्हणून मी त्याला शिक्षा करीन.” असे म्हणू नका.
30Проходил я мимо поля человека ленивого и мимо виноградника человека скудоумного:
30मी आळशी माणसाच्या शेताजवळून जात होतो. मी शहाणा नसलेल्या माणसाच्या द्राक्षाच्या मळ्याजवळून जात होतो. त्या
31и вот, все это заросло терном, поверхность его покрылась крапивою, и каменная ограда его обрушилась.
31शेतात सगळीकडे तण माजले होते. क्षुल्लक वनस्पती तिथे वाढत होत्या. आणि शेताभोवतालची भिंत तुटली होती आणि पडायला आली होती.
32И посмотрел я, и обратил сердце мое, и посмотрел и получил урок:
32मी ते बघितले आणि त्याचा विचार करु लागलो. व नंतर त्या गोष्टींपासून मी धडा शिकलो.
33„немного поспишь, немного подремлешь, немного, сложив руки, полежишь, –
33“थोडीशी झोप, थोडी विश्रांती, हाताची घडी आणि वामकुक्षी.”
34и придет, как прохожий, бедность твоя, и нужда твоя – как человек вооруженный".
34या गोष्टी तुम्हाला लवकरच गरीब करतील. तुमच्याकडे काहीही नसेल चोर घर फोडून घरात आला आणि सारे काही घेऊन गेल्यासारखे ते असेल.