1Сын мой! наставления моего не забывай, и заповеди мои да хранит сердце твое;
1मुला, माझी शिकवण विसरु नकोस. मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या लक्षात ठेव.
2ибо долготы дней, лет жизни и мира они приложат тебе.
2मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या तुला अधिक दीर्घ आणि अधिक सुखी आयुष्य देतील.
3Милость и истина да не оставляют тебя: обвяжи ими шею твою, напиши их на скрижали сердца твоего,
3प्रेम करणे कधी सोडू नकोस. नेहमी इमानदार आणि प्रामाणिक राहा. या गोष्टी तुझाच एक घटक बनव. त्यांना तुझ्या मानेभोवती बांध. त्या गोष्टी तुझ्या हृदयावर कोर.
4и обретешь милость и благоволение в очах Бога и людей.
4म्हणजे तू शहाणा होशील व देवाला व लोकांना तुझ्याबद्दल आनंद वाटेल.
5Надейся на Господа всем сердцем твоим, и не полагайся на разум твой.
5परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस.
6Во всех путях твоих познавай Его, и Он направит стези твои.
6तू जी प्रत्येक गोष्ट करशील ती करताना देवाचा विचार कर. म्हणजे तो तुला मदत करील.
7Не будь мудрецом в глазах твоих; бойся Господа и удаляйся от зла:
7तुझ्या स्वत:च्या शहाणपणावर अवलंबून राहू नकोस. पण परमेश्वराला मान दे आणि वाईट गोष्टींपासून दूर राहा.
8это будет здравием для тела твоего и питанием для костей твоих.
8तू जर हे केलेस तर ते तुझ्या शरीराला औषधाप्रमाणे बरे करील किंवा पेयाप्रमाणे तुझ्या हाडांना ताजेतवाने करील.
9Чти Господа от имения твоего и от начатков всех прибытков твоих,
9तुझ्या संपत्तीने परमेश्वराला मान दे. तुझ्या जवळच्या सर्वांत चांगल्या गोष्टी त्याला दे.
10и наполнятся житницы твои до избытка, и точила твои будут переливаться новым вином.
10नंतर तुझ्या सर्व गरजा पूर्ण होतील. तुझे कोठार धान्याने भरेल. आणि तुझी पिंपे द्राक्षारसाने भरुन वाहातील.
11Наказания Господня, сын мой, не отвергай, и не тяготись обличением Его;
11मुला, परमेश्वर तुला कधी कधी तू चूक करीत आहेस हे दाखवून देईल. पण या शिक्षेमुळे तू रागावू नकोस. त्यापासून शिकायचा प्रयत्न कर.
12ибо кого любит Господь, того наказывает и благоволит к тому, как отецк сыну своему.
12का? कारण परमेश्वर ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाच सुधारतो. होय, मुलावर प्रेम करणाऱ्या व त्याला शिक्षा करणाऱ्या बापासारखा देव आहे.
13Блажен человек, который снискал мудрость, и человек, который приобрел разум, –
13ज्या माणसाला ज्ञान मिळेल तो खूप सुखी होईल. त्याला जेव्हा समजायला लागते तेव्हाच त्याला आशीर्वाद मिळतात.
14потому что приобретение ее лучше приобретения серебра, и прибыли от нее больше, нежели от золота:
14ज्ञानामुळे जे लाभ होतात ते रुप्यापेक्षा चांगले आहेत. ज्ञानापासून मिळणारे लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत.
15она дороже драгоценных камней; и ничто из желаемого тобою не сравнится с нею.
15ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यावान आहे. तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्यापैकी कोणतीही गोष्ट ज्ञानाइतकी मौल्यवान असणार नाही.
16Долгоденствие – в правой руке ее, а в левой у нее – богатство и слава;
16ज्ञान तुम्हाला मोठे आयुष्य संपत्ती आणि मानसन्मान देते.
17пути ее – пути приятные, и все стези ее – мирные.
17ज्ञान असलेले लोक शांतीत आणि समाधानात जगतात.
18Она – древо жизни для тех, которые приобретают ее, – и блаженны, которые сохраняют ее!
18ज्ञान जीवनाच्या वृक्षाप्रमाणे आहे. जे लोक त्याचा स्वीकार करतात त्यांना संपूर्ण आयुष्य लाभते. जे लोक ज्ञान धारण करतात ते खरोखरच सुखी होतात.
19Господь премудростью основал землю, небеса утвердил разумом;
19परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्यासाठी ज्ञानाचा वापर केला. परमेश्वराने आकाश निर्माण करण्यासाठी ज्ञान वापरले.
20Его премудростью разверзлись бездны, и облака кропят росою.
20परमेश्वराने समुद्र निर्माण करण्यासाठी त्याचे ज्ञान वापरले. आणि पावसाचे ढग तयार करण्यासाठी ज्ञान वापरले.
21Сын мой! не упускай их из глаз твоих; храни здравомыслие и рассудительность,
21मुला, तुझे ज्ञान आणि समज ही नेहमी सांभाळून ठेव. या गोष्टी सोडू नकोस.
22и они будут жизнью для души твоей и украшением для шеи твоей.
22ज्ञान आणि समज तुला जीवन देतील. आणि ते अधिक सुंदर करतील.
23Тогда безопасно пойдешь по пути твоему, и нога твоя не споткнется.
23नंतर तू सुरक्षिततेचे जीवन जगशील आणि कधीही पडणार नाहीस.
24Когда ляжешь спать, – не будешь бояться; и когда уснешь, – сон твой приятен будет.
24तू जेव्हा झोपशील तेव्हा घाबरणार नाहीस. तू विश्रांती घेशील तेव्हा तुझी झोप शांत असेल.
25Не убоишься внезапного страха и пагубы от нечестивых, когда она придет;
25[This verse may not be a part of this translation]
26потому что Господь будет упованием твоим и сохранит ногу твою от уловления.
26[This verse may not be a part of this translation]
27Не отказывай в благодеянии нуждающемуся, когда рука твоя в силе сделать его.
27जेव्हा शक्य होईल तेव्हा ज्यांना मदतीची गरज असते त्यांच्यासाठी चांगली गोष्ट करा.
28Не говори другу твоему: „пойди и приди опять, и завтра я дам", когда ты имеешь при себе.
28जर तुमच्या शेजाऱ्याने काही मागितले आणि ते तुमच्याजवळ असले तर त्याला ते लगेच द्या. “त्याला उद्या यायला सांगू नका.”
29Не замышляй против ближнего твоего зла, когда он без опасения живет с тобою.
29तुमचा शेजारी विश्वासाने तुमच्याजवळ राहातो तेव्हा शेजाऱ्याला त्रास देण्याच्या योजना आखू नका. तुम्ही स्वत:च्या सुरक्षिततेसाठी एकमेकांच्या जवळ राहता.
30Не ссорься с человеком без причины, когда он не сделал зла тебе.
30योग्य कारणाशिवाय एखाद्याला कोर्टात नेऊ नका. जर त्याने तुम्हाला काही केले नसेल तर तसे करु नका.
31Не соревнуй человеку, поступающему насильственно, и не избирай ни одного из путей его;
31काही लोकांना चटकन् राग येतो. आणि ते लगेच वाईट गोष्ट करतात. तुम्ही तसे करु नका.
32потому что мерзость пред Господом развратный, а с праведными у Него общение.
32का? कारण परमेश्वर वाईट लोकांचा तिरस्कार करतो. परंतु परमेश्वर चांगल्या लोकांचा पाठीराखा असतो.
33Проклятие Господне на доме нечестивого, а жилище благочестивых Он благословляет.
33परमेश्वर वाईट लोकांच्या कुटुंबाविरुध्द असतो. परंतु जे लोक योग्य रीतीने जगतात त्यांच्या कुटुंबांना तो आशीर्वाद देतो.
34Если над кощунниками Он посмевается, то смиренным дает благодать.
34जर एखादा माणूस गर्विष्ठ असला आणि दुसऱ्यांची चेष्टा करत असला तर परमेश्वर त्याला शिक्षा करील आणि त्याची चेष्टा करील. पण परमेश्वर नम्र लोकांशी दयाळू असतो.
35Мудрые наследуют славу, а глупые – бесславие.
35शहाणे लोक सन्मान प्राप्त होईल असे जीवन जगतात परंतु मूर्ख लोक लाज वाटण्यासारखे जीवन जगतात.