1(117:1) Славьте Господа, ибо Он благ, ибо вовек милость Его.
1परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा. त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.
2(117:2) Да скажет ныне дом Израилев: ибо вовек милость Его.
2इस्राएल, म्हण “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
3(117:3) Да скажет ныне дом Ааронов: ибо вовек милость Его.
3याजकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
4(117:4) Да скажут ныне боящиеся Господа: ибо вовек милость Его.
4परमेश्वराची उपासना करणाऱ्या लोकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
5(117:5) Из тесноты воззвал я к Господу, – и услышал меня, и на пространное место вывел меня Господь.
5मी संकटात होतो म्हणून परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.
6(117:6) Господь за меня – не устрашусь: что сделает мне человек?
6परमेश्वर माझ्या बरोबर आहे म्हणून मी घाबरणार नाही. लोक मला त्रास देण्यासाठी काहीही करु शकणार नाहीत.
7(117:7) Господь мне помощник: буду смотреть на врагов моих.
7परमेश्वर मला मदत करणारा आहे. माझ्या शत्रूंचा पराभव झालेला मी बघेन.
8(117:8) Лучше уповать на Господа, нежели надеяться на человека.
8परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.
9(117:9) Лучше уповать на Господа, нежели надеяться на князей.
9परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे तुमच्या नेत्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.
10(117:10) Все народы окружили меня, но именем Господним я низложилих;
10बऱ्याच शत्रूंनी मला घेरले होते. परंतु परमेश्वराच्या शक्तीमुळे मी माझ्या शत्रूंचा पराभव केला.
11(117:11) обступили меня, окружили меня, но именем Господним я низложил их;
11शत्रूंनी मला पुन्हा पुन्हा घेरले, मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.
12(117:12) окружили меня, как пчелы, и угасли, как огонь в терне: именем Господним я низложил их.
12शत्रूंनी मला मधमाशांच्या थव्याप्रमाणे घेरले होते. परंतु त्यांचा पटकन् जळून जाणाऱ्या झुडपाप्रमाणे लवकरच नाश झाला. मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.
13(117:13) Сильно толкнули меня, чтобы я упал, но Господь поддержал меня.
13माझ्या शत्रूने माझ्यावर हल्ला केला आणि माझा जवळ जवळ सर्वनाश केला परंतु परमेश्वराने मला मदत केली.
14(117:14) Господь – сила моя и песнь; Он соделался моим спасением.
14परमेश्वर माझी शक्ती आणि माझे विजयगान आहे. परमेश्वर मला वाचवतो.
15(117:15) Глас радости и спасения в жилищах праведников: десница Господня творит силу!
15चांगल्या लोकांच्या घरात चाललेला विजयोत्सव तुम्ही ऐकू शकता. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचे दर्शन घडवले.
16(117:16) Десница Господня высока, десница Господня творит силу!
16परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.
17(117:17) Не умру, но буду жить и возвещать дела Господни.
17मी जगेन आणि मरणार नाही आणि परमेश्वराने काय काय केले ते मी सांगेन.
18(117:18) Строго наказал меня Господь, но смерти не предал меня.
18परमेश्वराने मला शिक्षा केली परंतु त्याने मला मरु दिले नाही.
19(117:19) Отворите мне врата правды; войду в них, прославлю Господа.
19चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा. मी आत येईन आणि परमेश्वराची उपासना करीन.
20(117:20) Вот врата Господа; праведные войдут в них.
20ते परमेश्वराचे दरवाजे आहेत आणि केवळ चांगले लोकच त्यातून आत जाऊ शकतात.
21(117:21) Славлю Тебя, что Ты услышал меня и соделался моим спасением.
21परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो. तू माझा उध्दार केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
22(117:22) Камень, который отвергли строители, соделался главою угла:
22इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता तो कोनाशिला झाला.
23(117:23) это – от Господа, и есть дивно в очах наших.
23हे परमेश्वराने घडवून आणले आहे आणि ते अतिशय अद्भुत आहे असे आम्हाला वाटते.
24(117:24) Сей день сотворил Господь: возрадуемся и возвеселимся в оный!
24आजचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे. आपण आज मौज करु आणि सुखी होऊ.
25(117:25) О, Господи, спаси же! О, Господи, споспешествуй же!
25लोक म्हणाले, “परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपला उध्दार केला.
26(117:26) Благословен грядущий во имя Господне! Благословляем вас из дома Господня.
26परमेश्वराचे नाव घेऊन येणाऱ्या माणसाचे स्वागत करा. “याजकांनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या घरी आम्ही तुझे स्वागत करतो.”
27(117:27) Бог – Господь, и осиял нас; вяжите вервями жертву, ведите к рогам жертвенника.
27परमेश्वर देव आहे आणि तो आपला स्वीकार करतो. बळी देण्यासाठी कोकराला बांधून ठेवा आणि त्याला वेदीच्या कोपऱ्यावर न्या.
28(117:28) Ты Бог мой: буду славить Тебя; Ты Бог мой: буду превозносить Тебя.
28परमेश्वरा, तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो.
29(117:29) Славьте Господа, ибо Он благ, ибо вовек милость Его.
29परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव टिकणारे आहे.