1(128:1) Песнь восхождения. Много теснили меня от юности моей, да скажет Израиль:
1“मला आयुष्यभर खूप शत्रू होते.” इस्राएल, आम्हाला त्या शंत्रूंबद्दल सांग.
2(128:2) много теснили меня от юности моей, но не одолели меня.
2मला आयुष्यभर खूप शत्रू होते पण ते कधीही विजयी झाले नाहीत.
3(128:3) На хребте моем орали оратаи, проводили длинные борозды свои.
3माझ्या पाठीत खोल जखमा होईपर्यंत त्यांनी मला मारले. मला खूप मोठ्या आणि खोल जखमा झाल्या.
4(128:4) Но Господь праведен: Он рассек узы нечестивых.
4पण परमेश्वराने दोर कापले आणि मला त्या दुष्टांपासून सोडवले.
5(128:5) Да постыдятся и обратятся назад все ненавидящие Сион!
5जे लोक सियोनचा तिरस्कार करीत होते, त्यांचा पराभव झाला. त्यांनी लढणे थांबवले आणि ते पळून गेले.
6(128:6) Да будут, как трава на кровлях, которая прежде, нежели будет исторгнута, засыхает,
6ते लोक छपरावरच्या गवतासारखे होते. ते गवत वाढण्या आधीच मरुन जाते.
7(128:7) которою жнец не наполнит руки своей, и вяжущийснопы – горсти своей;
7ते गवत कामगाराला मूठ भरही मिळू शकत नाही. धान्याचा ढीग करण्याइतकेही ते नसते.
8(128:8) и проходящие мимо не скажут: „благословение Господне на вас; благословляем вас именем Господним!"
8त्यांच्या जवळून जाणारे लोक, “परमेश्वर तुला आशीर्वाद देवो” असे म्हणणार नाहीत. लोक त्यांचे स्वागत करुन, “आम्ही परमेश्वराच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद देतो” असे म्हणणार नाहीत.