1(134:1) Аллилуия. Хвалите имя Господне, хвалите, рабы Господни,
1परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, त्याची स्तुती करा.
2(134:2) стоящие в доме Господнем, во дворах дома Бога нашего.
2त्यांचे गुणवर्णन करा. परमेश्वराच्या मंदिरात उभे राहाणाऱ्या लोकांनो, आमच्या देवाच्या मंदिराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, त्याची स्तुती करा.
3(134:3) Хвалите Господа, ибо Господь благ; пойте имени Его, ибо это сладостно,
3परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याच्या नावाचे गुणगान करा. कारण तो चांगला आहे.
4(134:4) ибо Господь избрал Себе Иакова, Израиля в собственность Свою.
4परमेश्वराने याकोबला निवडले. इस्राएल देवाचा आहे.
5(134:5) Я познал, что велик Господь, и Господь наш превыше всех богов.
5परमेश्वरा महान आहे हे मला माहीत आहे. आमचा प्रभु सगळ्या देवांपेक्षा महान आहे.
6(134:6) Господь творит все, что хочет, на небесах и на земле, на морях и во всех безднах;
6परमेश्वर त्याला हवे ते पृथ्वीवर आणि स्वर्गात समुद्रात आणि खोल महासागरात करत असतो.
7(134:7) возводит облака от края земли, творит молнии при дожде, изводит ветер из хранилищ Своих.
7देव सर्व पृथ्वीभर ढग तयार करतो. विजा आणि पाऊस तयार करतो आणि वाराही तयार करतो.
8(134:8) Он поразил первенцев Египта, от человека до скота,
8देवाने मिसर मधले सगळे पहिल्यांदा जन्माला आलेले पुरुष आणि प्राणी मारुन टाकले.
9(134:9) послал знамения и чудеса среди тебя, Египет, на фараона и навсех рабов его,
9देवाने मिसरमध्ये अनेक अद्भूत आणि चमत्कारिक गोष्टी केल्या. देवाने फारो आणि त्याच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत या गोष्टी केल्या.
10(134:10) поразил народы многие и истребил царей сильных:
10देवाने पुष्कळ राष्ट्रांचा पराभव केला. देवाने शक्तिशाली राजांना मारले.
11(134:11) Сигона, царя Аморрейского, и Ога, царя Васанского, и все царства Ханаанские;
11देवाने अमोऱ्याच्या सिहोन राजाचा पराभव केला. देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. देवाने कनानमधल्या सर्व राष्ट्रांचा पराभव केला.
12(134:12) и отдал землю их в наследие, в наследие Израилю, народуСвоему.
12आणि देवाने त्यांची जमीन इस्राएलला दिली. देवाने ती जमीन त्याच्या लोकांना दिली.
13(134:13) Господи! имя Твое вовек; Господи! память о Тебе в род и род.
13परमेश्वरा, तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील. परमेश्वरा, लोकांना तुझी नेहमी आठवण येईल.
14(134:14) Ибо Господь будет судить народ Свой и над рабами Своими умилосердится.
14परमेश्वराने राष्ट्रांना शिक्षा केली. पण परमेश्वर त्याच्या सेवकांबरोबर दयाळू होता.
15(134:15) Идолы язычников – серебро и золото, дело рук человеческих:
15दुसऱ्या लोकांचे देव केवळ सोन्याचांदीचे पुतळे होते. त्यांचे देव म्हणजे लोकांनी केलेले पुतळे होते.
16(134:16) есть у них уста, но не говорят; есть у них глаза, но не видят;
16त्या पुतळ्यांना तोंड होते पण ते बोलू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना डोळे होते पण ते पाहू शकत नव्हते.
17(134:17) есть у них уши, но не слышат, и нет дыхания в устах их.
17पुतळ्यांना कान होते पण ते ऐकू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना नाक होते पण ते वास घेऊ शकत नव्हते.
18(134:18) Подобны им будут делающие их и всякий, кто надеется на них.
18आणि ज्या लोकांनी हे पुतळे केले तेही या पुतळ्यांसारखेच होतील. का? कारण त्यांनी त्या पुतळ्यांवर मदतीसाठी विश्वास टाकला होता.
19(134:19) Дом Израилев! благословите Господа. Дом Ааронов! благословите Господа.
19इस्राएलाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. अहरोनाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा.
20(134:20) Дом Левиин! благословите Господа. Боящиеся Господа! благословите Господа.
20लेवीच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा.
21(134:21) Благословен Господь от Сиона, живущий в Иерусалиме! Аллилуия!
21परमेश्वराला सियोनहून त्याचे घर असलेल्या यरुशलेममधून धन्यवाद मिळोत. परमेश्वराची स्तुती करा.