Russian 1876

Marathi

Psalms

86

1(85:1) Молитва Давида. Приклони, Господи, ухо Твое и услышь меня, ибо я беден и нищ.
1मी गरीब, असहाय्य माणूस आहे. परमेश्वरा माझे ऐक आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे.
2(85:2) Сохрани душу мою, ибо я благоговею пред Тобою; спаси, Боже мой,раба Твоего, уповающего на Тебя.
2परमेश्वरा मी तुझा भक्त आहे. कृपा करुन माझे रक्षण कर. मी तुझा सेवक आहे. तू माझा देव आहेस. माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मला वाचव.
3(85:3) Помилуй меня, Господи, ибо к Тебе взываю каждый день.
3माझ्या प्रभु, माझ्यावर दया कर मी दिवसभर तुझी प्रार्थना करीत आहे.
4(85:4) Возвесели душу раба Твоего, ибо к Тебе, Господи, возношу душу мою,
4प्रभु, माझे जीवन तुझ्या हाती दिले आहे. मला सुखी कर, मी तुझा सेवक आहे.
5(85:5) ибо Ты, Господи, благ и милосерд и многомилостив ко всем, призывающим Тебя.
5प्रभु, तू चांगला आणि दयाळू आहेस. तुझी माणसे तुला मदतीसाठी हाका मारतात, तू त्या माणसांवर खरोखरच प्रेम करतो.
6(85:6) Услышь, Господи, молитву мою и внемли гласу моления моего.
6परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक. दयेसाठी माझी प्रार्थना ऐक.
7(85:7) В день скорби моей взываю к Тебе, потому что Ты услышишь меня.
7परमेश्वरा, मी तुझी संकट काळात प्रार्थना करीत आहे. तू मला उत्तर देशील हे मला माहीत आहे.
8(85:8) Нет между богами, как Ты, Господи, и нет дел, как Твои.
8देवा, इथे तुझ्यासारखा कुणीही नाही. तू जे केलेस ते कोणीही करु शकणार नाही.
9(85:9) Все народы, Тобою сотворенные, приидут и поклонятся пред Тобою, Господи, и прославят имя Твое,
9प्रभु तूच प्रत्येकाला निर्माण केलेत. ते सर्व येतील आणि तुझी उपासना करतील आणि तुझ्या नावाला मान देतील अशी मी आशा करतो.
10(85:10) ибо Ты велик и творишь чудеса, – Ты, Боже, един Ты.
10देवा, तू महान आहेस. तू अद्भुत गोष्टी करतोस. तू आणि फक्त तूच देव आहेस.
11(85:11) Наставь меня, Господи, на путь Твой, и буду ходить в истине Твоей; утверди сердце мое в страхе имени Твоего.
11परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव. मी तुझी सत्ये जाणे, तुझी सत्ये पाळीन. तुझ्या नावाचा जप ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट करायला मला मदत कर.
12(85:12) Буду восхвалять Тебя, Господи, Боже мой, всемсердцем моим и славить имя Твое вечно,
12देवा, माझ्या प्रभु मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला सदैव मान देईन.
13(85:13) ибо велика милость Твоя ко мне: Ты избавил душу мою от ада преисподнего.
13देवा, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे तू माझे मृत्यूलोकापासून रक्षण करतोस.
14(85:14) Боже! гордые восстали на меня, и скопище мятежников ищет души моей: не представляют они Тебя пред собою.
14गर्विष्ठ लोक माझ्यावर हल्ला करतात. देवा, वाईट लोकांचा समूह मला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते लोक तुला मान देत नाहीत.
15(85:15) Но Ты, Господи, Боже щедрый и благосердный, долготерпеливый и многомилостивый и истинный,
15प्रभु, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस. तू सहनशील निष्ठावान आणि प्रेमपूर्ण आहेस.
16(85:16) призри на меня и помилуй меня; даруй крепость Твою рабу Твоему, и спаси сына рабы Твоей;
16देवा, तू माझे ऐकतोस हे मला दाखव. तू माझ्यावर दया कर. मी तुझा दास आहे. मला शक्ती दे. मी तुझा सेवक आहे मला वाचव.
17(85:17) покажи на мне знамение во благо, да видят ненавидящие меня и устыдятся, потому что Ты, Господи, помог мне и утешил меня.
17देवा, तू मला वाचवणार आहेस याची प्रचीती मला दाखव. माझ्या शत्रूंना ती खूण दिसेल आणि ते निराश होतील. तू माझी प्रार्थना ऐकलीस आणि तू मला मदत करणार आहेस हे यावरुन दिसून येईल.