1EN el mes séptimo, á los veinte y uno del mes, fué palabra de Jehová por mano del profeta Haggeo, diciendo:
1सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी हाग्गयला परमेश्वराकडून संदेश मिळाला:
2Habla ahora á Zorobabel hijo de Sealtiel, gobernador de Judá, y á Josué hijo de Josadac, gran sacerdote, y al resto del pueblo, diciendo:
2यहूदाचा राज्यपाल आणि शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल व प्रमुख याजक यहोसादाकचा मुलगा यहोशवा आणि इतर लोक यांच्याशी तू बोल. त्यांना ह्या गोष्टी सांग.
3¿Quién ha quedado entre vosotros que haya visto esta casa en su primera gloria, y cual ahora la veis? ¿No es ella como nada delante de vuestros ojos?
3“तुमच्यातील कितीजण ह्या मंदिराकडे पाहून ह्याची तुलना आधीच्या नाश झालेल्या सुंदर मंदिराशी करण्याचा प्रयत्न करतात? तुम्हाला काय वाटते? आधीच्या मंदिराच्या तुलनेत हे काहीच नाही ना?
4Pues ahora, Zorobabel, esfuérzate, dice Jehová; esfuérzate también Josué, hijo de Josadac, gran sacerdote; y cobra ánimo, pueblo todo de la tierra, dice Jehová, y obrad: porque yo soy con vosotros, dice Jehová de los ejércitos.
4पण आता परमेश्वर म्हणतो, ‘जरुब्बाबेल, निराश होऊ नकोस.’ यहोसादाकच्या मुला, प्रमुख याजक यहोशवा, ‘नाउमेद होऊ नकोस. या देशाच्या सर्व लोकांनो, धीर सोडू नका. हे काम चालू ठेवा, मी तुमच्याबरोबर आहे.’ सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.”
5Según el pacto que concerté con vosotros a vuestra salida de Egipto, así mi espíritu estará en medio de vosotros: no temáis.
5परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मिसर सोडले, तेव्हा मी तुमच्याबरोबर करार केला. मी माझ्या वचनाला जागलो. माझा आत्मा तुमच्यात आहे. तेव्हा घाबरु नका.
6Porque así dice Jehová de los ejércitos: De aquí á poco aun haré yo temblar los cielos y la tierra, y la mar y la seca:
6का? कारण सर्वशक्तिमान परमेश्वर हे सांगत आहे. अगदी थोड्या वेळात मी पुन्हा एकदा सर्व गोष्टी हलवून सोडीन आकाश आणि पृथ्वी कंपित करीन समुद्र आणि कोरडी जमीन यांना कंपित करीन.
7Y haré temblar á todas las gentes, y vendrá el Deseado de todas las gentes; y henchiré esta casa de gloria, ha dicho Jehová de los ejércitos.
7मी राष्ट्रांना धक्का देईन आणि मग प्रत्येक राष्ट्र तुमच्याकडे संपत्ती घेऊन येईल मग हे मंदिर वैभवाने भरुन टाकीन. सर्वशक्तिमान परमेश्वर हे सांगत आहे.
8Mía es la plata, y mío el oro, dice Jehová de los ejércitos.
8त्यांच्याकडील सर्व सोने-चांदी माझ्या मालकीची आहे सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगत आहे.
9La gloria de aquesta casa postrera será mayor que la de la primera, ha dicho Jehová de los ejércitos; y daré paz en este lugar, dice Jehová de los ejércitos.
9[This verse may not be a part of this translation]
10A veinticuatro del noveno mes, en el segundo año de Darío, fué palabra de Jehová por mano del profeta Haggeo, diciendo:
10पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षीच्या नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याला परमेश्वराकडून पुढील संदेश मिळाला.
11Así ha dicho Jehová de los ejércitos: Pregunta ahora á los sacerdotes acerca de la ley, diciendo:
11सर्वशक्तिमान परमेश्वर या गोष्टींविषयी नियम काय सांगत आहे, हे तू याजकांना विचारावे अशी मी तुला आज्ञा देतो.
12Si llevare alguno las carnes sagradas en la falda de su ropa, y con el vuelo de ella tocare el pan, ó la vianda, ó el vino, ó el aceite, ú otra cualquier comida, ¿será santificado? Y respondieron los sacerdotes, y dijeron: No.
12“समजा एखादा माणूस वस्त्रांमधून मांस नेतो. ते मांस परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आहे म्हणून ते पवित्र आहे. पण ज्या वस्त्रांत ते गुंडाळले आहे, त्या वस्त्राचा स्पर्श भाकरी, किंवा शिजविलेले अन्न, मद्य, तेल किंवा इतर अन्नाला झाला, तर ह्या स्पर्श झालेल्या सर्व वस्तू पवित्र होतील का?” याजक उत्तरले, “नाही”
13Y dijo Haggeo: Si un inmundo á causa de cuerpo muerto tocare alguna cosa de éstas, ¿será inmunda? Y respondieron los sacerdotes, y dijeron: Inmunda será.
13मग हाग्गयने विचारले, “एखाद्याने प्रेताला स्पर्श केला, तर तो अशुध्द होतो, ह्या माणसाने दुसऱ्या कोणत्या गोष्टीला स्पर्श केला, तर ती गोष्टसुध्दा अशुध्द होईल का?” याजक म्हणाले, “हो! ती गोष्टसुध्दा अशुध्दच होईल.”
14Y respondió Haggeo y dijo: Así es este pueblo, y esta gente, delante de mí, dice Jehová; y asimismo toda obra de sus manos; y todo lo que aquí ofrecen es inmundo.
14मग हाग्गय म्हणाला, “परमेश्वर देव, या गोष्टी सांगतो. ‘ह्या राष्ट्रातील लोकांबद्दलही असेच म्हणणे योग्य आहे. ते माझ्या दृष्टीने शुध्द व पवित्र नव्हते. म्हणून त्यांनी ज्या गोष्टींना स्पर्श केला, त्या अशुध्द झाल्या आणि ते वेदीवर जे जे अर्पण करतात ते ते अशुध्द आहे.
15Ahora pues, poned vuestro corazón desde este día en adelante, antes que pusiesen piedra sobre piedra en el templo de Jehová,
15‘आजच्या दिवसाच्या आधी काय घडले त्याचा विचार करा. परमेश्वराच्या मंदिराचे काम तुम्ही सुरु केलेत त्या पूर्वीच्या काळाचा विचार करा.
16Antes que fuesen estas cosas, venían al montón de veinte hanegas, y había diez; venían al lagar para sacar cincuenta cántaros del lagar, y había veinte.
16लोकांना वीस मापे धान्य पाहिजे असताना, राशीत दहा मापेच होते मद्यकुंडातून लोकांना पन्नास बुधले मद्य पाहिजे होते पर त्याच्यात फक्त वीसच बुधले मद्य होते.
17Os herí con viento solano, y con tizoncillo, y con granizo en toda obra de vuestras manos; mas no os convertisteis á mí, dice Jehová.
17का? कारण मी तुम्हाला शिक्षा केली. मी पाठविलेल्या रोगाने तुमची झाडे मेली. तुम्ही स्वत:च्या हाताने बनविलेल्या वस्तू मी पाठविलेल्या गारपिटीने नष्ट झाल्या. मी एवढे केले तरी तुम्ही मला शरण आला नाहीत.’ परमेश्वरच असे म्हणाला.”
18Pues poned ahora vuestro corazón desde este día en adelante, desde el día veinticuatro del noveno mes, desde el día que se echó el cimiento al templo de Jehová; poned vuestro corazón.
18परमेश्वर म्हणाला, “आज नवव्या महिन्याचा चोविसावा दिवस आहे. परमेश्वराच्या मंदिराच्या पायाचे काम तुम्ही पूर्ण केले आहे. आता ह्यापुढे काय होते त्यावर लक्ष ठेवा.
19¿Aun no está la simiente en el granero? ni la vid, ni la higuera, ni el granado, ni el árbol de la oliva ha todavía florecido: mas desde aqueste día daré bendición.
19कोठारात अजून काही धान्य आहे का? नाही. केली, अंजीर, डाळिंबे, जैतुन ह्या झाडांकडे पाहा. त्यांना फळे धरत आहेत का? नाही. पण आजपासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन.”
20Y fué segunda vez palabra de Jehová á Haggeo, á los veinticuatro del mismo mes, diciendo:
20हाग्गयला महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, परमेश्वराकडून आणखी एक संदेश आला तो असा होता:
21Habla á Zorobabel, gobernador de Judá, diciendo: Yo haré temblar los cielos y la tierra;
21“राज्यपाल जरुब्बाबेलकडे जा. त्याला सांग की मी आकाश-पृथ्वी हालवीन.
22Y trastornaré el trono de los reinos, y destruiré la fuerza del reino de las gentes; y trastornaré el carro, y los que en él suben; y vendrán abajo los caballos, y los que en ellos montan, cada cual por la espada de su hermano.
22मी पुष्कळ राजे आणि राज्ये उलथवून टाकीन. त्या दुसऱ्या लोकांच्या राज्यसत्तेचा मी नाश करीन. मी त्यांच्या रथांचा व सारथ्यांचा नाश करीन. आता त्या सैन्यांमध्ये मैत्री आहे. पण ते एकमेकांविरुध्द उठातील आणि तलवारीने एकमेकांना मारतील.
23En aquel día, dice Jehová de los ejércitos, te tomaré, oh Zorobabel, hijo de Sealtiel, siervo mío, dice Jehová, y ponerte he como anillo de sellar: porque yo te escogí, dice Jehová de los ejércitos.
23सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगत आहे शल्तीएलच्या मुला, जरुब्बाबेल, तू माझा सेवक आहेस मी तुझी निवड केली आहे, आणि त्यावेळी मी तुझा मुद्रांकित अंगठीप्रमाणे उपयोग करीन. मी ह्या गोष्टी केल्या आहेत ह्याचा तू साक्षी वा पुरावा असशील.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.