1EN el año segundo del rey Darío en el mes sexto, en el primer día del mes, fué palabra de Jehová, por mano del profeta Haggeo, á Zorobabel hijo de Sealtiel, gobernador de Judá, y á Josué hijo de Josadac, gran sacerdote, diciendo:
1पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दोच्या दुसव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हाग्गयला देवाकडून संदेश मिळाला. हा संदेश शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल व यहोसादाकचा मुलगा यहोशवा यांच्याबद्दल होता. जरुब्बाबेल हा यहूदाचा राज्यपाल व यहोशवा प्रमुख याजक होता. संदेश असा आहे:
2Jehová de los ejércitos habla así, diciendo: Este pueblo dice: No es aún venido el tiempo, el tiempo de que la casa de Jehová sea reedificada.
2सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो “लोकांच्या मते परमेश्वराचे मंदिर बांधण्यास ही वेळ योग्य नाही.”
3Fué pues palabra de Jehová por mano del profeta Haggeo, diciendo:
3हाग्गयला परमेश्वराकडून पुन्हा एकदा संदेश मिळाला हाग्गयने तो पुढीलप्रमाणे सांगितला:
4¿Es para vosotros tiempo, para vosotros, de morar en vuestras casas enmaderadas, y esta casa está desierta?
4“चांगल्या घरात स्वत: राहण्यास लोकांनो, तुम्हाला ही योग्य वेळ वाटते. भिंतीला सुरेख लाकडी तावदान असलेल्या घरांत तुम्ही राहता पण परमेश्वराचे घर झ्र्मंदिरट अजूनही भग्नावस्थेतच आहे.
5Pues así ha dicho Jehová de los ejércitos: Pensad bien sobre vuestros caminos.
5आता सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, ‘काय घडत आहे, त्याचा विचार करा.
6Sembráis mucho, y encerráis poco; coméis, y no os hartáis; bebéis, y no os saciáis; os vestís, y no os calentáis; y el que anda á jornal recibe su jornal en trapo horadado.
6तुम्ही खूप पेरले पण तुमच्या हाती थोडेच पीक लागले. तुम्हाला खायला मिळते खरे, पण पोटभर नाही. थोडेफार पिण्यास मिळते, पण धुंदी चढण्याईतके नाही. काही ल्यायला आहे, पण ऊब आणण्याईतके नाही. तुम्ही थोडा पैसा कमविता, पण तो कोठे जातो तेच कळत नाही. जणू काही तुमच्या खिशाला छिद्र पडले आहे.”
7Así ha dicho Jehová de los ejércitos: Meditad sobre vuestros caminos.
7सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “तुम्ही काय करीत आहात, त्याच्या विचार करा.
8Subid al monte, y traed madera, y reedificad la casa; y pondré en ella, mi voluntad, y seré honrado, ha dicho Jehová.
8लाकडे आणण्यासाठी पर्वतावर जा, आणि मंदिर बांधा. मग मला त्यामुळे संतोष वाटेल आणि माझा गौरव झाला असे वाटेल.” परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या.
9Buscáis mucho, y halláis poco; y encerráis en casa, y soplo en ello. ¿Por qué? dice Jehová de los ejércitos. Por cuanto mi casa está desierta, y cada uno de vosotros corre á su propia casa.
9सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “तुम्ही खूप पिकाची अपेक्षा करता, पण पीक काढताना तुमच्या हाती फार थोडे धान्य लागते. ते धान्य तुम्ही घरी आणता आणि मी पाठविलेला वारा ते सर्व उधळून लावतो. हे का घडत आहे? का? कारण स्वत:च्या घराच्या काळजीने तुमच्यातील प्रत्येकजण घराकडे धाव घेतो. पण माझे घर मात्र अजूनही भग्नावस्थेत आहे.
10Por eso se detuvo de los cielos sobre vosotros la lluvia, y la tierra detuvo sus frutos.
10म्हणूनच आकाश दवाला व पृथ्वी पिकांना रोखून धरते.”
11Y llamé la sequedad sobre esta tierra, y sobre los montes, y sobre el trigo, y sobre el vino, y sobre el aceite, y sobre todo lo que la tierra produce, y sobre los hombres sobre y las bestias, y sobre todo trabajo de manos.
11परमेश्वर म्हणतो, “मी भूमीला आणि पर्वतांना रुक्ष होण्याची आज्ञा दिली आहे. जमिनीतून निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची आणि धान्य, नवीन मद्य, जैतुनाचे तेल ह्यांची नासाडी होईल. सर्व लोक आणि सर्व प्राणी दुर्बल होतील.”
12Y oyó Zorobabel hijo de Sealtiel, y Josué hijo de Josadac, gran sacerdote, y todo el demás pueblo, la voz de Jehová su Dios, y las palabras del porfeta Haggeo, como lo había enviado Jehová el Dios de ellos; y temió el pueblo delante de Jehová.
12परमेश्वर देवाने शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल आणि यहोसादकाचा मुलगा यहोशवा ह्यांच्याशी बोलण्यासाठी हाग्गयला पाठविले होते. यहोशवा हा प्रमुख याजक होता. ह्या दोघांनी व इतर लोकांनी त्यांच्या परमेश्वर देवाची वाणी व हाग्गय प्रेषिताचे म्हणणे ऐकले. आणि त्यांनी त्यांचे भय. आणि परमेश्वर त्यांच्या देवाबद्दल, त्यांना वाठणारा आदर दाखविला.
13Entonces Haggeo, enviado de Jehová, habló por mandado de Jehová, al pueblo, diciendo: Yo soy con vosotros, dice Jehová.
13परमेश्वर देवाचा संदेश लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी, देवानेच हाग्गयला दूत म्हणून पाठविले होते. तो संदेश असा होता. परमेश्वर म्हणतो, “मी तुझ्याबरोबर आहे.”
14Y despertó Jehová el espíritu de Zorobabel hijo de Sealtiel, gobernador de Judá, y el espíritu de Josué hijo de Josadac, gran sacerdote, y el espíritu de todo el resto del pueblo; y vinieron é hicieron obra en la casa de Jehová de los ejércitos, su Dios.
14परमेश्वर देवाने, यहू दाचा राज्यपाल आणि शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल याला यहोसादाकचा मुलगा प्रमुख याजक यहोशवाला आणि इतर लोकांना मंदिर बांधण्याच्याकामी उत्तेजन दिले. म्हणून त्या सर्वांनी, त्यांच्या देवाच्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाला सुरवात केली.
15En el día veinte y cuatro del mes sexto, en el segundo año del rey Darío.
15त्यांनी हे काम, पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षीच्या सहाव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी सुरु केले.