Spanish: Reina Valera (1909)

Marathi

Zephaniah

3

1AY de la ciudad ensuciada y contaminada y opresora!
1यरुशलेम, तुझे लोक देवाविरुध्द लढले. त्यांनी दुसऱ्यांना दुखाविले आणि तुला पापाचा डाग लागला.
2No escuchó la voz, ni recibió la disciplina: no se confió en Jehová, no se acercó á su Dios.
2तुझ्या लोकांनी माझे ऐकले नाही. त्यांनी माझी शिकवण आत्मसात केली नाही. यरुशलेमने परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही. ती तिच्या देवाला शरण केली नाही.
3Sus príncipes en medio de ella son leones bramadores: sus jueces, lobos de tarde que no dejan hueso para la mañana:
3यरुशलेममधील नेते गुरगुरणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. तिचे न्यायाधीश संध्याकाळी मेंढ्यांवर हल्ला करुन, सकाळी आपल्या भक्ष्याची काहीही नामोनिशाणी न ठेवणाऱ्या भुकेल्या लांडग्याप्रमाणे आहेत.
4Sus profetas, livianos, hombres prevaricadores: sus sacerdotes contaminaron el santuario, falsearon la ley.
4तिचे संदेष्टे अविचारी असून जास्तीच जास्त हडप करण्यासाठी नेहमीच कट करीत असतात तिचे याजक पवित्र गोष्टी अपवित्र गोष्टींप्राणेच हाताळतात. देवाच्या शिकवणुकीचा त्यांनी वाईट उपयोग केला आहे.
5Jehová justo en medio de ella, no hará iniquidad: de mañana sacará á luz su juicio, nunca falta: mas el perverso no tiene vergüenza.
5पण देव अजूनही त्या नगरीत आहे. आणि तो नेहमीच चांगला वागतो. देव कोणाचाही कधीच अपराध करीत नाही. तो त्याच्या लोकांना नेहमीच मदत करीत राहतो. योग्य निर्णय घेण्यास तो लोकांना रोजय मदत करतो. पण वाईट लोकांना त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींची लाज वाटत नाही.
6Hice talar gentes; sus castillos están asolados; hice desiertas sus calles, hasta no quedar quien pase: sus ciudades están asoladas hasta no quedar hombre, hasta no quedar morador.
6देव म्हणतो, “मी संपूर्ण राष्ट्रांचा नाश केला आहे. मी सरंक्षक बुरुज नष्ट केले आहेत. मी त्यांच्या रस्त्यांचा नाश केला आहे. आता येथून कोणीही जात नाही. त्यांची गावे निर्जन झाली आहेत. तेथे कोणीही राहात नाही.
7Dije: Ciertamente me temerás, recibirás corrección; y no será su habitación derruída por todo aquello sobre que los visité. Mas ellos se levantaron de mañana y corrompieron todas sus obras.
7तू ह्यापासून धडा शिकावास, म्हणून तुला मी ह्या गोष्टी सांगत आहे. तू मला घाबरावेस व माझा मान राखावास, असे मला वाटते. जर तू असे वागलास, तर तुझ्या घराचा नाश होणार नाही. ठरविल्याप्रमाणे मग मी तुला शिक्षाही करणार नाही.” पण ते वाईट लोक, केल्या आहेत त्यापेक्षा अधिक वाईट गोष्टीच करु इच्छीत होते.
8Por tanto, esperadme, dice Jehová, al día que me levantaré al despojo: porque mi determinación es reunir las gentes, juntar los reinos, para derramar sobre ellos mi enojo, todo el furor de mi ira; porque del fuego de mi celo será consumida toda la tierra.
8परमेश्वर म्हणाला, “थोडे थांब मी ऊभा राहून तुझा न्यायनिवाडा करण्याची वाट बघ! अनेक राष्ट्रांतील लोकांना गोळा करुन, तुला सजा देण्यासाठी त्यांचा वापर करण्याचा मला हक्‌क आहे. माझा तुझ्यावरचा राग दाखविण्यासाठी मी त्या लोकांचा उपयोग करीन. मी किती चिडलो आहे हे त्यावरुन कळेल. संपूर्ण देशाचा नाश होईल.
9Por entonces volveré yo á los pueblos el labio limpio, para que todos invoquen el nombre de Jehová, para que de un consentimiento le sirvan.
9[This verse may not be a part of this translation]
10De esa parte de los ríos de Etiopía, mis suplicantes, la hija de mis esparcidos, me traerán ofrenda.
10कूश देशातील नदीपलीकडचे लोकसुध्दा येतील. माझी विखुरलेली माणसे मला शरण येतील. माझी उपासना करणारे मला वाहण्यासाठी काही गोष्टी घेऊन येतील.
11En aquel día no serás avergonzada por ninguna de tus obras con que te rebelaste contra mí; porque entonces quitaré de en medio de ti los que se alegran en tu soberbia, y nunca más te ensoberbecerás del monte de mi santidad.
11“मग, यरुशलेम, तुझ्या लोकांनी माझ्याविरुध्द केलेल्या दुष्कृत्यांची तुला लाज वाठणार नाही. का? कारण त्या वाईट लोकांना मी यरुशलेममधून बाहेर घालवीन. त्या गर्विष्ठांना मी दूर नेईन. माझ्या पवित्र पर्वतावर त्या माणसांतील कोणीही गर्विष्ठ असणार नाही.
12Y dejaré en medio de ti un pueblo humilde y pobre, los cuales esperarán en el nombre de Jehová.
12माझ्या नगरीत (यरुशलेममध्ये) मी फक्त नम्र व लीन लोकांनाच राहू देईन. ते परमेश्वराच्या नावावर श्रध्दा ठेवतील.
13El resto de Israel no hará iniquidad, ni dirá mentira, ni en boca de ellos se hallará lengua engañosa: porque ellos serán apacentados y dormirán, y no habrá quien los espante.
13“इस्राएलमधील जिवंत राहिलेले लोक वाईट कृत्ये करणार नाहीत. ते खोटे बोलणार नाहीत. खोट्याच्या आधारे ते इतरांना फसविणार नाहीत. चरुन आडव्या होणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे ते शांत राहतील त्यांना कोणीही त्रास देणार नाही.”
14Canta, oh hija de Sión: da voces de júbilo, oh Israel; gózate y regocíjate de todo corazón, hija de Jerusalem.
14यरुशलेम, गा आणि सुखी हो! इस्राएल, आनंदाने जल्लोष कर!यरुशलेम, आनंदात राहा! मजा कर!
15Jehová ha apartado tus juicios, ha echado fuera tus enemigos: Jehová es Rey de Israel en medio de ti; nunca más verás mal.
15का? कारण परमेश्वराने तुला शिक्षा करण्याचे थांबविले आहे. त्यांने तुझ्या शत्रूंचे भक्‌कम मोर्चे नष्ट केले आहेत. इस्राएलचा राजा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. आता तुला कोणत्याही अरिष्टाची काळजी करण्याचे कारण नाही.
16En aquel tiempo se dirá á Jerusalem: No temas: Sión, no se debiliten tus manos.
16त्या वेळेला, यरुशलेमला, असे सांगितले जाईल. समर्थ हो! घाबरु नको!
17Jehová en medio de ti, poderoso, él salvará; gozaráse sobre ti con alegría, callará de amor, se regocijará sobre ti con cantar.
17परमेश्वर तुझा देव, तुमच्याबरोबर आहे. तो बलवान वीराप्रमाणे आहे. तो तुला वाचवील. तो तुझ्यावर किती प्रेम करतो, हे तो तुला दाखवून देईल. तुझ्याबरोबर तो किती सुखी आहे, हेही तुला दिसेल.
18Reuniré á los fastidiados por causa del largo tiempo; tuyos fueron; para quienes el oprobio de ella era una carga.
18मेजवानीच्या वेळेला लोक असे हासतात, आनंदात असतात, तसाच तो तुझ्याबरोबर हासेल आनंदात असेल.” परमेश्वर म्हणाला, “मी तुझी अप्रतिष्ठा दूर करीन. त्या लोकांना मी तुला दुखवू देणार नाही.
19He aquí, en aquel tiempo yo apremiaré á todos tus opresores; y salvaré la coja, y recogeré la descarriada; y pondrélos por alabanza y por renombre en todo país de confusión.
19त्या वेळी, तुला हजा करणाऱ्यांना मी शिक्षा करीन. माझ्या इजा झालेल्या माणसांना मी वाचवीन. बळजबरीने दूर पळून जायला लागलेल्या माझ्या माणसांना मी परत आणीन. मी त्यांना कीर्ती मिळवून देईन. सर्व लोक त्यांची प्रशंसा करतील.
20En aquel tiempo yo os traeré, en aquel tiempo os reuniré yo; pues os daré por renombre y por alabanza entre todos los pueblos de la tierra, cuando tornaré vuestros cautivos delante de vuestros ojos, dice Jehová.
20त्या वेळी, मी तुला परत आणीन. मी तुम्हा सर्वांना परत एकत्र आणीन. मी तुला प्रसिध्दी मिळवून देईन. सगळीकडचे लोक तुझी स्तुती करतील प्रत्यक्ष तुझ्या डोळ्यांदेखत मी कैद्यांना परत आणीन, तेव्हाच हे सर्व घडून येईल.” परमेश्वरच असे म्हणाला आहे.