1ܦܘܠܘܤ ܘܛܝܡܬܐܘܤ ܥܒܕܐ ܕܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܠܟܠܗܘܢ ܩܕܝܫܐ ܕܒܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܕܐܝܬ ܒܦܝܠܝܦܘܤ ܥܡ ܩܫܝܫܐ ܘܡܫܡܫܢܐ ܀
1ख्रिस्त येशूचे दास असलेल्या पौल व तीमथ्य यांजकडून, फिलिप्पै येथे राहणाऱ्या ख्रिस्त येशूमधील देवाच्या सर्व पवित्र लोकांना, तसेच सर्व वडील मंडळीला व खास मदतनिसांना,
2ܛܝܒܘܬܐ ܥܡܟܘܢ ܘܫܠܡܐ ܡܢ ܐܠܗܐ ܐܒܘܢ ܘܡܢ ܡܪܢ ܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܀
2देव आपला पिता आणि आपला प्रभु येशू ख्रिस्त याजपासून तुम्हांस कृपा असो.
3ܡܘܕܐ ܐܢܐ ܠܐܠܗܝ ܥܠ ܥܘܗܕܢܟܘܢ ܐܡܝܢܐ ܀
3प्रत्येक वेळी जेव्हा मी तुमची आठवण करतो, तेव्हा देवाचे आभार मानतो.
4ܕܒܟܠ ܒܥܘܬܝ ܕܥܠ ܐܦܝܟܘܢ ܘܟܕ ܚܕܐ ܐܢܐ ܡܬܟܫܦ ܐܢܐ ܀
4नेहमीच तुमच्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रार्थनेच्यावेळी मी आनंदाने प्रार्थना करतो.
5ܥܠ ܫܘܬܦܘܬܟܘܢ ܕܒܐܘܢܓܠܝܘܢ ܡܢ ܝܘܡܐ ܩܕܡܝܐ ܘܥܕܡܐ ܠܗܫܐ ܀
5कारण अगदी पहिल्या दिवसांपासून ते आजपर्यंत सुवार्तेच्या कामात तुमचा सहभाग आहे.
6ܡܛܠ ܕܬܟܝܠ ܐܢܐ ܥܠ ܗܕܐ ܕܗܘ ܡܢ ܕܫܪܝ ܒܟܘܢ ܥܒܕܐ ܛܒܐ ܗܘ ܢܫܠܡ ܥܕܡܐ ܠܝܘܡܗ ܕܡܪܢ ܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܀
6मला याची खात्री आहे की, ज्या देवाने तुमच्यामध्ये अशा प्रकारचे चांगले कार्य सुरु केले आहे, तो ख्रिस्त येशू येण्याच्या वेळेपर्यंत ते पूर्ण करीत आणीला.
7ܗܟܢܐ ܓܝܪ ܙܕܩ ܠܝ ܠܡܬܪܥܝܘ ܥܠ ܟܠܟܘܢ ܡܛܠ ܕܒܠܒܝ ܤܝܡܝܢ ܐܢܬܘܢ ܘܒܐܤܘܪܝ ܘܒܡܦܩ ܒܪܘܚܝ ܕܥܠ ܫܪܪܗ ܕܐܘܢܓܠܝܘܢ ܕܫܘܬܦܝ ܐܢܬܘܢ ܒܛܝܒܘܬܐ ܀
7तुम्हा सर्वाविषयी असा विचार करणे मला योग्य वाटते कारण तुम्ही माझ्या हृदयात आहात. आणि मी तुरुंगात असतानाच केवळ नव्हे तर जेव्हा मी सुवार्तेचे सत्य ठासून सिद्ध करीत होतो, तेव्हा ही देवाने जी कृपा मला दिली आहे त्यात तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर वाटेकरी होता.
8ܤܗܕ ܗܘ ܠܝ ܓܝܪ ܐܠܗܐ ܕܐܝܟܢܐ ܡܚܒ ܐܢܐ ܠܟܘܢ ܒܪܚܡܘܗܝ ܕܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܀
8देव माझा साक्षी आहे, कारण ख्रिस्त येशूने जे प्रेम दाखविले त्यामुळे तुम्हां सर्वांसाठी मी अधीर झालो होतो.
9ܘܗܕܐ ܡܨܠܐ ܐܢܐ ܕܬܘܒ ܢܤܓܐ ܘܢܬܝܬܪ ܚܘܒܟܘܢ ܒܝܕܥܬܐ ܘܒܟܠ ܤܘܟܠ ܕܪܘܚ ܀
9आणि माझी हीच प्रार्थना आहे: की तुमचे प्रेम अधिकाधिक वाढत जाईल पूर्ण ज्ञान व सर्व प्रकारच्या समजबुद्धीने वाढत जाईल.
10ܕܬܗܘܘܢ ܦܪܫܝܢ ܐܝܠܝܢ ܕܥܗܢܢ ܘܬܗܘܘܢ ܕܟܝܢ ܕܠܐ ܬܘܩܠܐ ܒܝܘܡܗ ܕܡܫܝܚܐ ܀
10मी अशी प्रार्थना करतो की, तुमच्याठायी हे गुण असावेत, यासाठी की जे शुद्ध व निर्दोष ते तुम्ही निवडावे, आणि अशा प्रकारे ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवासासाठी तुम्ही शुद्ध व निर्दोष असावे,
11ܘܡܠܝܢ ܦܐܪܐ ܕܙܕܝܩܘܬܐ ܕܒܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܠܫܘܒܚܐ ܘܠܐܝܩܪܐ ܕܐܠܗܐ ܀
11आणि देवाच्या गौरवासाठी, स्तुति साठी आणि नीतिमत्त्वाचे फळ देण्यासाठी भरुन जावे.
12ܨܒܐ ܐܢܐ ܕܝܢ ܕܬܕܥܘܢ ܐܚܝ ܕܤܘܥܪܢܝ ܕܝܠܝ ܝܬܝܪܐܝܬ ܐܬܐ ܠܩܕܡܘܗܝ ܒܐܘܢܓܠܝܘܢ ܀
12बंधूनो, जे काही माझ्या बाबतीत घडले त्यामुळे सुवार्ताकार्यात प्रत्यक्ष वाढ झाली हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छ आहे.
13ܗܟܢܐ ܕܐܦ ܐܤܘܪܝ ܐܬܓܠܝܘ ܒܡܫܝܚܐ ܒܦܪܛܘܪܝܢ ܟܠܗ ܘܠܫܪܟܐ ܕܟܠܢܫ ܀
13याचा परिणाम असा झाला की, राजवाड्याच्या सर्व पहारेकऱ्यांना व येथे असणाऱ्या सर्वांना हे माहीत झाले की, मी ख्रिस्ताला अनुसरतो म्हणून मला तुरुंगवास भोगावा लागत आहे.
14ܘܤܘܓܐܐ ܕܐܚܐ ܕܒܡܪܢ ܐܬܬܟܠܘ ܥܠ ܐܤܘܪܝ ܘܐܫܝܚܘ ܝܬܝܪܐܝܬ ܕܠܐ ܕܚܠܐ ܠܡܡܠܠܘ ܡܠܬܐ ܕܐܠܗܐ ܀
14शिवाय, पुष्कळशा बांधवांना माझ्या तुरुंगवासामुळे उत्तेजन मिळाले. व ते बोलण्यात ख्रिस्तामध्ये अधिकाधिक धीट होत चालले आहेत व न भिता संदेश देत आहेत.
15ܘܐܢܫ ܐܢܫ ܡܢ ܚܤܡܐ ܘܚܪܝܢܐ ܐܢܫ ܐܢܫ ܕܝܢ ܒܨܒܝܢܐ ܛܒܐ ܘܒܚܘܒܐ ܠܡܫܝܚܐ ܡܟܪܙܝܢ ܀
15हे खरे आहे की त्याच्यातील काही जण हेव्याने व वैरभावने ख्रिस्ताचा संदेश देतात, पण इतर चांगल्या भावनेने ख्रिस्ताचा संदेश देतात.
16ܡܛܠ ܕܝܕܥܝܢ ܕܠܡܦܩ ܒܪܘܚܐ ܕܐܘܢܓܠܝܘܢ ܤܝܡ ܐܢܐ ܀
16हे लोक प्रेमापोटी असे करतात, कारण त्यांना माहीत आहे की, सुवार्तेचे समर्यन करण्यासाठी देवाने मला येथे ठेवले आहे.
17ܗܢܘܢ ܕܝܢ ܕܒܚܪܝܢܐ ܠܡܫܝܚܐ ܡܟܪܙܝܢ ܠܐ ܗܘܐ ܕܟܝܐܝܬ ܐܠܐ ܕܤܒܪܝܢ ܕܡܘܤܦܝܢ ܐܘܠܨܢܐ ܠܐܤܘܪܝ ܀
17पण दुसरे ख्रिस्ताची घोषणा स्वार्थी ध्येयाने करतात आणि प्रामाणिकपणे करीत नाहीत, कारण त्यांना वाटते की, मी तुरुंगात असताना मला त्रास देणे त्यांना शक्य होईल.
18ܘܒܗܕܐ ܚܕܝܬ ܘܚܕܐ ܐܢܐ ܕܒܟܠ ܦܪܘܤ ܐܢ ܒܥܠܬܐ ܘܐܢ ܒܩܘܫܬܐ ܡܫܝܚܐ ܢܬܟܪܙ ܀
18पण त्यामुळे काय होते? महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, प्रत्येक मार्गाने चांगला हेतू असो की वाईट हेतू असो, ख्रिस्त गाजविला जातो. आणि त्यामुळे मला आनंद होतो. आणि मला आनंद होतच राहील.
19ܝܕܥ ܐܢܐ ܓܝܪ ܕܗܠܝܢ ܠܚܝܐ ܡܫܬܟܚܢ ܠܝ ܒܒܥܘܬܟܘܢ ܘܒܡܘܗܒܬܐ ܕܪܘܚܐ ܕܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܀
19कारण मला माहीत आहे तुमच्या प्रार्थनेमुळे आणि येशू ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे येणाऱ्या मदतीमुळे याचा परिणाम माझ्या सुटकेत होणार आहे.
20ܐܝܟܢܐ ܕܡܤܒܪ ܐܢܐ ܘܡܤܟܐ ܐܢܐ ܕܒܡܕܡ ܠܐ ܐܒܗܬ ܐܠܐ ܒܓܠܝܘܬ ܐܦܐ ܐܝܟ ܕܒܟܠܙܒܢ ܐܦ ܗܫܐ ܢܬܪܘܪܒ ܡܫܝܚܐ ܒܦܓܪܝ ܐܢ ܒܚܝܐ ܘܐܢ ܒܡܘܬܐ ܀
20हे माझ्या उत्सुक अपेक्षेप्रमाणे व आशेप्रमाणे आहे, कारण मला खात्री आहे, की, माझी निराशा होणार नाही, पण आता नेहमीसारखे माझ्या सर्व धैर्याने माझ्या जगण्याने किंवा मरण्याने ख्रिस्ताचा माझ्या शरीराद्वारे महिमा होईल.
21ܚܝܝ ܓܝܪ ܕܝܠܝ ܡܫܝܚܐ ܗܘ ܘܐܢ ܐܡܘܬ ܝܘܬܪܢܐ ܗܘ ܠܝ ܀
21कारण माझ्यासाठी जगणे म्हणजे ख्रिस्त आणि मरणे म्हणजे लाभ आहे.
22ܐܢ ܕܝܢ ܐܦ ܒܗܠܝܢ ܚܝܐ ܕܒܤܪܐ ܦܐܪܐ ܐܝܬ ܠܝ ܒܥܒܕܝ ܠܐ ܝܕܥ ܐܢܐ ܡܢܐ ܐܓܒܐ ܠܝ ܀
22पण जर मी या शरीरातच राहिलो तर त्याचा अर्थ असा की, माझ्या कामाचे फळ, आनंद मी अनुभवीन. मला माहीत नाही की मी काय निवडीन.
23ܐܠܨܢ ܠܝ ܓܝܪ ܬܪܬܝܗܝܢ ܠܡܦܛܪ ܪܓܝܓ ܐܢܐ ܕܥܡ ܡܫܝܚܐ ܐܗܘܐ ܘܗܕܐ ܛܒ ܦܩܚܐ ܗܘܬ ܠܝ ܀
23या दोन पर्यायातून निवडण्यासाठी माझ्यावर मोठा दबाव आहे. माझी अशी इच्छा आहे की, या जीवनातून जाऊन ख्रिस्ताबरोबर असावे कारण ते फार फार चांगले होईल.
24ܐܠܐ ܐܦ ܕܐܩܘܐ ܒܦܓܪܝ ܐܠܨܐ ܠܝ ܨܒܘܬܐ ܡܛܠܬܟܘܢ ܀
24पण तुमच्यासाठी या शरीरात राहणे हे माझ्यासाठी अधिक आवश्यक आहे.
25ܘܗܕܐ ܬܟܝܠܐܝܬ ܝܕܥ ܐܢܐ ܕܦܐܫ ܐܢܐ ܘܡܩܘܐ ܐܢܐ ܠܚܕܘܬܐ ܕܝܠܟܘܢ ܘܠܬܪܒܝܬܐ ܕܗܝܡܢܘܬܟܘܢ ܀
25आणि मला याची खात्री असल्याने मला माहीत आहे की मी येथेच राहीन व तुमच्याबरोबर असेन.
26ܕܟܕ ܐܬܐ ܬܘܒ ܠܘܬܟܘܢ ܢܬܝܬܪ ܒܝ ܫܘܒܗܪܟܘܢ ܕܒܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܒܠܚܘܕ ܀
26यासाठी की तुमच्याबरोबर पुन्हा असण्याचा परिणाम म्हणून तुम्हांला अभिमान बाळगण्यास अधिक योग्य कारण मिळेल.
27ܐܝܟܢܐ ܕܝܐܐ ܠܤܒܪܬܗ ܕܡܫܝܚܐ ܗܘܝܬܘܢ ܡܬܕܒܪܝܢ ܕܐܢ ܐܬܐ ܐܚܙܝܟܘܢ ܘܐܢ ܦܪܝܩ ܐܢܐ ܐܫܡܥ ܥܠܝܟܘܢ ܕܩܝܡܝܢ ܐܢܬܘܢ ܒܚܕܐ ܪܘܚ ܘܒܚܕܐ ܢܦܫ ܘܡܬܢܨܚܝܬܘܢ ܐܟܚܕ ܒܗܝܡܢܘܬܐ ܕܐܘܢܓܠܝܘܢ ܀
27पण कोणत्याही परिस्थितीत ख्रिस्ताच्या सुवार्तेला योग्य अशा प्रकारे तुम्ही वागा. यासाठी की, जरी मी तुम्हांला येऊन भेटलो किंवा तुमच्यापासून दूर असलो तरी मला तुमच्याविषयी असे ऐकायला मिळो की तुम्ही एका आत्म्यात खंबीर असे उभे आहात, तुम्ही सुवार्तेच्या विश्वासाने, एकजीवाने धडपड करीत आहात.
28ܘܒܡܕܡ ܠܐ ܡܬܬܙܝܥܝܢ ܐܢܬܘܢ ܡܢ ܗܢܘܢ ܕܩܝܡܝܢ ܠܩܘܒܠܢ ܠܬܚܘܝܬܐ ܕܐܒܕܢܗܘܢ ܘܠܚܝܐ ܕܝܠܟܘܢ ܀
28आणि जे तुम्हांला विरोध करतात त्यांना तुम्ही भ्याला नाहीत. तुमचे हे धैर्य त्याच्या नाशाचा पुरावा होईल. पण तुमच्या तारणाचा पुरावा होईल. आणि हे देवाकडून असेल.
29ܘܗܕܐ ܡܢ ܐܠܗܐ ܗܘ ܐܬܝܗܒܬ ܠܟܘܢ ܕܠܐ ܒܠܚܘܕ ܡܗܝܡܢܘ ܬܗܝܡܢܘܢ ܒܗ ܒܡܫܝܚܐ ܐܠܐ ܐܦ ܕܥܠ ܐܦܘܗܝ ܬܚܫܘܢ ܀
29कारण, ख्रिस्ताच्या वतीने केवळ त्याच्यावर विश्वास ठेवणे एवढेच नव्हे तर त्याच्यासाठी दु:ख भोगणे असा हक्क तुम्हांला देण्यात आलेला आहे.
30ܘܬܤܝܒܪܘܢ ܐܓܘܢܐ ܐܝܟ ܗܘ ܕܚܙܝܬܘܢ ܒܝ ܘܗܫܐ ܫܡܥܝܬܘܢ ܥܠܝ ܀
30माझ्यामध्ये चाललेले युंद्ध तुम्ही अनुभवलेले आहे आणि पाहिले आहे आताही ते माझ्यामध्ये चालले असल्याचे तुम्ही ऐकत आहात.