Syriac: NT

Marathi

Philippians

2

1ܐܢ ܐܝܬ ܠܟܘܢ ܗܟܝܠ ܒܘܝܐܐ ܒܡܫܝܚܐ ܘܐܢ ܡܡܠܐ ܒܠܒܐ ܒܚܘܒܐ ܘܐܢ ܫܘܬܦܘܬܐ ܕܪܘܚܐ ܘܐܢ ܪܘܚܦܐ ܘܪܚܡܐ ܀
1जर मग ख्रिस्तात तुमच्यामध्ये काही उत्तेजन आहे, जर तुमच्यामध्ये तुमच्या प्रीतितून वाढणारे सांत्वन आहे, जर तुमच्यामध्ये आत्म्यात काही भाग आहे, जर तुमच्यामध्ये जिव्हाळा व कळवळा आहे,
2ܫܠܡܘ ܚܕܘܬܝ ܕܚܕ ܪܥܝܢܐ ܢܗܘܐ ܠܟܘܢ ܘܚܕ ܚܘܒܐ ܘܚܕܐ ܢܦܫ ܘܚܕܐ ܬܪܥܝܬܐ ܀
2तर मला पूर्णपणे आनंदी करा. मी सांगतो की, तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करता, एकमेकांविषयी सारखेच प्रेम आहे तर आत्म्यात एक व्हा, आणि एकच उद्देश असू द्या.
3ܘܡܕܡ ܒܚܪܝܢܐ ܐܘ ܒܬܫܒܘܚܬܐ ܤܪܝܩܬܐ ܠܐ ܬܥܒܕܘܢ ܐܠܐ ܒܡܟܝܟܘܬ ܪܥܝܢܐ ܟܠܢܫ ܠܚܒܪܗ ܐܝܟ ܕܡܝܬܪ ܡܢܗ ܢܚܫܘܒ ܀
3हेवा किंवा पोकळ व्यर्थ अभिमानाने काहीही करु नका. उलट नम्रतेने एकमेकांना स्वत:पेक्षा चांगले माना.
4ܘܠܐ ܐܢܫ ܕܢܦܫܗ ܢܐܨܦ ܐܠܐ ܟܠܢܫ ܐܦ ܕܚܒܪܗ ܀
4प्रत्येक व्यक्तीने केवळ आपलेच हित पाहू नये, तर प्रत्येकाने दुसऱ्यांचे हितसुद्धा पाहावे.
5ܘܗܕܐ ܐܬܪܥܘ ܒܢܦܫܟܘܢ ܗܝ ܕܐܦ ܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܀
5ख्रिस्त येशूच्या ठायी जे विचार होते तसेच तुमचेही असू द्या.
6ܗܘ ܕܟܕ ܐܝܬܘܗܝ ܒܕܡܘܬܐ ܕܐܠܗܐ ܠܐ ܗܘܐ ܚܛܘܦܝܐ ܚܫܒܗ ܗܕܐ ܕܐܝܬܘܗܝ ܦܚܡܐ ܕܐܠܗܐ ܀
6जरी तो देवाच्या स्वरुपाचा होता तरी देवासारखे असणे हे संपत्ती राखून ठेवण्यासारखे मानले नाही.
7ܐܠܐ ܢܦܫܗ ܤܪܩ ܘܕܡܘܬܐ ܕܥܒܕܐ ܢܤܒ ܘܗܘܐ ܒܕܡܘܬܐ ܕܒܢܝܢܫܐ ܘܒܐܤܟܡܐ ܐܫܬܟܚ ܐܝܟ ܒܪܢܫܐ ܀
7उलट त्याने सर्व काही सोडून दोल, आणि त्याने गुलामाचे स्वरुप धारण केले आणि मनुष्याचे रुप धारण केले व तो आपल्या दिसण्यात मनुष्यासारखा झाला.
8ܘܡܟܟ ܢܦܫܗ ܘܐܫܬܡܥ ܥܕܡܐ ܠܡܘܬܐ ܡܘܬܐ ܕܝܢ ܕܙܩܝܦܐ ܀
8त्याने स्वत:ला नम्र केले. आणि मरेपर्यंत तो आज्ञाधारक राहिला. होय, वधस्तंभावरच्या मरणापर्यंत तो नम्र झाला.
9ܡܛܠ ܗܢܐ ܐܦ ܐܠܗܐ ܐܤܓܝ ܪܡܪܡܗ ܘܝܗܒ ܠܗ ܫܡܐ ܕܡܝܬܪ ܡܢ ܟܠ ܫܡܗܝܢ ܀
9म्हणून देवाने सुद्धा त्याला अत्युच्च केले, व सर्व नावाहून जे नाव श्रष्ठ आहे ते त्याला दिले.
10ܕܒܫܡܗ ܕܝܫܘܥ ܟܠ ܒܪܘܟ ܬܟܘܦ ܕܒܫܡܝܐ ܘܒܐܪܥܐ ܘܕܠܬܚܬ ܡܢ ܐܪܥܐ ܀
10यासाठी की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे आहेत त्या सर्वांनी येशूच्या नावाच्या महिम्यासाठी गुडघे टेकावेत.
11ܘܟܠ ܠܫܢ ܢܘܕܐ ܕܡܪܝܐ ܗܘ ܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܠܫܘܒܚܐ ܕܐܠܗܐ ܐܒܘܗܝ ܀
11व प्रत्येक जिभेने जाहीर करावे की, “येशू खिस्त हा देव पिता आहे.”
12ܡܟܝܠ ܚܒܝܒܝ ܐܝܟܢܐ ܕܒܟܠܙܒܢ ܐܫܬܡܥܬܘܢ ܠܐ ܟܕ ܩܪܝܒ ܐܢܐ ܠܟܘܢ ܒܠܚܘܕ ܐܠܐ ܗܫܐ ܕܪܚܝܩ ܐܢܐ ܡܢܟܘܢ ܝܬܝܪܐܝܬ ܒܕܚܠܬܐ ܘܒܪܬܝܬܐ ܦܠܘܚܘ ܦܘܠܚܢܐ ܕܚܝܝܟܘܢ ܀
12म्हणून माझ्या प्रियांनो, जसे तुम्ही मी प्रत्यक्ष असतानाच नव्हे तर आता दूर असतानासुद्धा आज्ञा पाळता तसे भीतीने कापत तुमचे तारण पूर्ण होण्यासाठी कार्य करीत राहा.
13ܐܠܗܐ ܗܘ ܓܝܪ ܡܚܦܛ ܒܟܘܢ ܐܦ ܠܡܨܒܐ ܐܦ ܠܡܤܥܪ ܗܘ ܡܕܡ ܕܨܒܝܢ ܐܢܬܘܢ ܀
13कारण देवच असा एक आहे जो तुमच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा निर्माण करतो व तो संतुष्ट होईल अशा रीतीने कार्य पूर्णत्वास नेतो.
14ܟܠܡܕܡ ܗܘܝܬܘܢ ܥܒܕܝܢ ܕܠܐ ܪܛܢܐ ܘܕܠܐ ܦܘܠܓ ܀
14प्रत्येक गोष्ट तक्रार किंवा भांडण न करता करा, यासाठी की,
15ܕܬܗܘܘܢ ܬܡܝܡܐ ܘܕܠܐ ܡܘܡ ܐܝܟ ܒܢܝܐ ܕܟܝܐ ܕܐܠܗܐ ܕܥܡܪܝܢ ܒܕܪܐ ܥܤܩܐ ܘܡܥܩܡܐ ܘܐܬܚܙܘ ܒܝܢܬܗܘܢ ܐܝܟ ܢܗܝܪܐ ܒܥܠܡܐ ܀
15तुम्ही निर्दोष व शुद्ध असे या कुटिल व विपरीत पिढीतील लोकांमध्ये असावे. आणि त्यांच्यामध्ये अंधाऱ्या जगातील प्रकाशासारखे चमकावे.
16ܕܐܝܬܝܟܘܢ ܠܗܘܢ ܒܕܘܟܬ ܚܝܐ ܠܫܘܒܗܪܝ ܕܝܠܝ ܒܝܘܡܗ ܕܡܫܝܚܐ ܕܠܐ ܗܘܐ ܐܝܩܐ ܪܗܛܬ ܘܠܐ ܤܪܝܩܐܝܬ ܥܡܠܬ ܀
16तुम्ही त्यांना जीवनाचे वजन सांगत असता, माझे शर्यतीत धावणे व्यर्थ झाले नाही असे मला दिसते, यासाठी की ख्रिस्ताच्या परत येण्याच्या दिवशी मला तुमचा अभिमान वाटावा.
17ܐܠܐ ܐܦܢ ܡܬܢܩܐ ܐܢܐ ܥܠ ܕܒܚܬܐ ܘܬܫܡܫܬܐ ܕܗܝܡܢܘܬܟܘܢ ܚܕܐ ܐܢܐ ܘܪܘܙ ܐܢܐ ܥܡ ܟܠܟܘܢ ܀
17तुमच्या यज्ञार्पणासमवेत तसेच तुमच्या विश्वासाच्या सेवेसमवेत जरी मी अर्पिला गेलो तरी ते आनंदाने करतो आणि तुमच्या समवेत आनंदी बनतो.
18ܗܟܢܐ ܐܦ ܐܢܬܘܢ ܚܕܘ ܘܪܘܙܘ ܥܡܝ ܀
18त्याच प्रकारे, तुम्हीसुद्धा आनंदी असावे, आणि तुमच्या आनंदात मला सहभागी करावे.
19ܡܤܒܪ ܐܢܐ ܕܝܢ ܒܡܪܢ ܝܫܘܥ ܕܐܫܕܪ ܠܘܬܟܘܢ ܠܛܝܡܬܐܘܤ ܒܥܓܠ ܕܐܦ ܠܝ ܢܗܘܐ ܠܝ ܢܝܚܐ ܟܕ ܐܠܦ ܡܛܠܬܟܘܢ ܀
19पण मला आशा आहे, प्रभु येशूच्या साहाय्यने मी लवकरच तीमथ्यीला तुमच्याकडे पाठवीन यासाठी की, तुमच्याविषयीच्या बातमीने मला उत्तेजन मिळावे.
20ܠܝܬ ܠܝ ܓܝܪ ܐܚܪܝܢ ܗܪܟܐ ܕܐܝܟ ܢܦܫܝ ܗܘ ܕܐܟܝܦܐܝܬ ܝܨܦ ܕܝܠܟܘܢ ܀
20तोच एक आहे ज्याला पाठविण्याची माझी इच्छा आहे कारण माझ्यासारख्याच भावना असणारा दुसरा कोणी माझ्याजवळ नाही आणि त्याला तुमच्या कल्याणाची मनापासून कळकळ आहे.
21ܟܠܗܘܢ ܓܝܪ ܕܢܦܫܗܘܢ ܗܘ ܒܥܝܢ ܘܠܐ ܕܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܀
21सर्व जण त्यांच्या हिताकडेच लक्ष देतात व ख्रिस्ताच्या हिताकडे लक्ष देत नाहीत.
22ܒܘܩܝܗ ܕܝܢ ܕܗܢܐ ܝܕܥܝܬܘܢ ܕܐܝܟ ܒܪܐ ܥܡ ܐܒܘܗܝ ܗܟܢܐ ܦܠܚ ܥܡܝ ܒܤܒܪܬܐ ܀
22आणि तुम्हांला त्याचा स्वभाव माहीत आहे, सुवार्ता वाढविण्यासाठी जसे मुलगा पित्याची सेवा करतो तशी त्याने त्याच्या योग्यतेने माझ्याबरोबर सेवा केली आहे.
23ܠܗܢܐ ܡܤܒܪ ܐܢܐ ܕܐܫܕܪ ܠܘܬܟܘܢ ܒܥܓܠ ܡܐ ܕܚܙܝܬ ܡܐ ܕܠܘܬܝ ܀
23त्याला तुमच्याकडे पाठविण्याविषयी मी आशा करीत आहे. माझ्याबाबतीत काय होते ते कळताच त्याला तुमच्याकडे पाठविन.
24ܘܬܟܝܠ ܐܢܐ ܥܠ ܡܪܝ ܕܐܦ ܐܢܐ ܒܥܓܠ ܐܬܐ ܐܢܐ ܠܘܬܟܘܢ ܀
24आणि माझा असा विश्वास आहे की, देवाच्या साहाय्याने मला स्वत:लासुद्धा तुमच्याकडे येणे लवकरच शक्य होईल.
25ܗܫܐ ܕܝܢ ܐܠܨܬܢܝ ܨܒܘܬܐ ܕܐܫܕܪ ܠܘܬܟܘܢ ܠܐܦܦܪܘܕܝܛܤ ܐܚܐ ܕܐܝܬܘܗܝ ܡܥܕܪܢܐ ܘܦܠܚܐ ܕܥܡܝ ܕܝܠܟܘܢ ܕܝܢ ܫܠܝܚܐ ܘܡܫܡܫܢܐ ܕܚܫܚܬܝ ܀
25एपफ्रदीत, जो माझा बंधु आहे. सहकारी व सहशिपाई आहे, त्याला तुमच्याकडे पाठविण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटले, तसेच तो तुमचा प्रतिनिधी आहे जो माझ्या गरजेच्या वेळी मला साहाय्य करतो. मी असे करण्याचे ठरविले आहे कारण तो तुम्हा सर्वांना भेटण्यास आतुर झाला आहे.
26ܡܛܠ ܕܤܘܐ ܗܘܐ ܠܡܚܙܐ ܠܟܠܟܘܢ ܘܡܥܩ ܗܘܐ ܕܝܕܥ ܕܫܡܥܬܘܢ ܕܐܬܟܪܗ ܀
26मी त्याला पाठवितो कारण त्याला तुम्हांला फार भेटावेसे वाटते. तुम्ही तो आजरी असल्याचे जे ऐकले त्यामुळे त्याला काळजी वाटत आहे.
27ܐܦ ܐܬܟܪܗ ܓܝܪ ܥܕܡܐ ܠܡܘܬܐ ܐܠܐ ܐܠܗܐ ܪܚܡ ܥܠܘܗܝ ܠܐ ܗܘܐ ܕܝܢ ܥܠܘܗܝ ܒܠܚܘܕ ܐܠܐ ܐܦ ܥܠܝ ܕܠܐ ܬܗܘܐ ܠܝ ܥܩܐ ܥܠ ܥܩܐ ܀
27तो खरोखरच आजारी होता, अगदी मरणाला टेकला होता, पण देवाने त्याच्यावर करुणा केली; त्याच्यावरच केली असे नाही, तर माझ्यावरही केली; यासाठी की, मला आणखी दु:ख होऊ नये.
28ܚܦܝܛܐܝܬ ܗܟܝܠ ܫܕܪܬܗ ܠܘܬܟܘܢ ܕܟܕ ܬܚܙܘܢܝܗܝ ܬܘܒ ܬܚܕܘܢ ܘܠܝ ܩܠܝܠ ܢܗܘܐ ܢܦܐܫܐ ܀
28म्हणून, अधिक अधीरतेने, मी त्याला पाठवित आहे. यासाठी की जेव्हा तुम्ही त्याला पाहाल तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही आनंदी व्हाल आणि मी निश्रिंत असेन.
29ܩܒܠܘܗܝ ܗܟܝܠ ܒܡܪܝܐ ܒܟܠ ܚܕܘܐ ܘܠܐܝܠܝܢ ܕܗܟܢܐ ܐܢܘܢ ܒܐܝܩܪܐ ܐܚܘܕܘ ܐܢܘܢ ܀
29म्हणून, प्रभूमध्ये त्याचे स्वागत करा आणि अशा लोकांचा सन्मान करा, कारण ख्रिस्ताच्या कामासाठी तो जवळजवळ मेला होता.
30ܡܛܠ ܥܒܕܐ ܓܝܪ ܕܡܫܝܚܐ ܥܕܡܐ ܠܡܘܬܐ ܡܛܝ ܘܒܤܪ ܥܠ ܢܦܫܗ ܕܢܡܠܐ ܡܕܡ ܕܒܨܪܬܘܢ ܗܘܝܬܘܢ ܒܬܫܡܫܬܐ ܕܠܘܬܝ ܀
30त्याने त्याचे जीवन धोक्यात घातले, यासाठी की, माझी सेवा करण्यात तुमच्या जी उणीव होती ती भरुन काढावी.