Marathi

Psalms

120

1मी संकटात होतो, मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने मला वाचवले.2परमेश्वरा, माझ्याविषयी खोट बोलणाऱ्या लोकांपासून मला वाचव. त्या लोकांनी खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगितल्या.3खोटारड्यांनो तुम्हाला काय मिळणार आहे ते माहीत आहे का? त्यापासून तुमचा काय फायदा होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे का?4सैनिकाचे अणकुचीदार बाण आणि जळते निखारे तुम्हाला शिक्षा म्हणून मिळतील.5खोटारड्यांनो, तुमच्याजवळ राहाणे म्हणजे मेशेखात राहाण्यासारखे आहे, केदारच्या तंबून राहाण्यासारखे आहे6शांतीचा तिरस्कार करणाऱ्या लोकांजवळ मी खूप काळ राहिलो आहे.7मी म्हणालो, मला शांती हवी, म्हणून त्यांना युध्द हवे आहे.