Marathi

Psalms

121

1मी वर डोंगरांकडे बघतो. पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे?2माझी मदत परमेश्वराकडून, स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे.3देव तुला खाली पडू देणार नाही. तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही.4इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही. देव कधीही झोपत नाही.5परमेश्वर तुझा पाठीराखा आहे तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो.6दिवसा सूर्य तुला दु:ख पोहोचवणार नाही. आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.7परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील. परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील.8परमेश्वरा तुला जाण्या - येण्यात मदत करील. परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.