Marathi

Psalms

127

1जर परमेश्वर घर बांधीत नसेल तर ते बांधणारे लोक त्यांचा वेळ व्यर्थ घालवीत आहेत. जर परमेश्वर शहरावर नजर ठेवीत नसेल तर पहारेकरी त्यांचा वेळ वाया घालवीत आहेत.2भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. देव ज्या लोकांवर प्रेम करतो त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो.3मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत. आईच्या शरीरातून मिळालेले ते फळ आहे.4तरुण माणसाची मुले सैनिकाच्या भात्यातील बाणांसारखी आहेत.5जो माणूस त्याचा भाता मुलांनी भरुन टाकेल तो सुखी होईल.