Marathi

Psalms

128

1परमेश्वराचे सर्व भक्त सुखी आहेत. ते देवाच्या इच्छे प्रमाणे जगतात.2तू ज्या गोष्टींसाठी काम करतोस त्या गोष्टींचा तू उपभोग घेशील, तू आनंदी राहाशील आणि तुझ्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील.3घरी तुझी बायको सुफलीत द्राक्षवेलीसारखी असेल. मेजाभोवती तुझी मुले तू लावलेल्या जैतूनाच्या झाडांसारखी असतील.4परमेश्वर अशा रीतीने त्याच्या भक्तांना आशीर्वाद देईल.5परमेश्वर तुला सियोनवरुन आशीर्वाद देवो. परमेश्वराच्या आशीर्वादाचा तू यरुशलेममध्ये जन्मभर आनंद उपभोगावा अशी आशा करतो.6आणि तू तुझी नातवंडे पाही पर्यंत जगशील अशी मी आशा करतो. इस्राएलमध्ये शांती नांदू दे.