Marathi

Psalms

129

1“मला आयुष्यभर खूप शत्रू होते.” इस्राएल, आम्हाला त्या शंत्रूंबद्दल सांग.2मला आयुष्यभर खूप शत्रू होते पण ते कधीही विजयी झाले नाहीत.3माझ्या पाठीत खोल जखमा होईपर्यंत त्यांनी मला मारले. मला खूप मोठ्या आणि खोल जखमा झाल्या.4पण परमेश्वराने दोर कापले आणि मला त्या दुष्टांपासून सोडवले.5जे लोक सियोनचा तिरस्कार करीत होते, त्यांचा पराभव झाला. त्यांनी लढणे थांबवले आणि ते पळून गेले.6ते लोक छपरावरच्या गवतासारखे होते. ते गवत वाढण्या आधीच मरुन जाते.7ते गवत कामगाराला मूठ भरही मिळू शकत नाही. धान्याचा ढीग करण्याइतकेही ते नसते.8त्यांच्या जवळून जाणारे लोक, “परमेश्वर तुला आशीर्वाद देवो” असे म्हणणार नाहीत. लोक त्यांचे स्वागत करुन, “आम्ही परमेश्वराच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद देतो” असे म्हणणार नाहीत.