Marathi

Psalms

130

1परमेश्वरा, मी खूप मोठ्या संकटात आहे म्हणून मी तुला मदतीसाठी हाक मारीत आहे.2माझ्या प्रभु, माझ्याकडे लक्ष दे. माझ्या मदतीच्या हाकेला ओ दे.3परमेश्वरा, तू जर लोकांना खरोखरच त्यांच्यासगळ्या पापांबद्दल शिक्षा केलीस तर कुणीही माणूस जिवंत राहाणार नाही.4परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर म्हणजे मग तुझी उपासना करण्यासाठी लोक असतील.5मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे. माझा आत्मा त्याची वाट बघत आहे. परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे.6मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे. मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.7इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव. केवळ परमेश्वराजवळच खरे प्रेम मिळते. परमेश्वर पुन्हा पुन्हा आपला उध्दार करतो आणि परमेश्वर इस्राएलला त्याच्या सर्व पापांबद्दल क्षमा करील.8[This verse may not be a part of this translation]