Marathi

Psalms

131

1परमेश्वरा, मी गर्विष्ठ नाही. मी कुणीतरी मोठा आहे असे मी वागत नाही. मी खूप भव्य असे काही करायचा प्रयत्न करत नाही. मी माझ्या आवाक्या बाहेरच्या गोष्टींची चिंता कधीच करत नाही.2मी अगदी अविचल आहे. माझा आत्मा शांत आहे.3माझा आत्मा आईच्या कुशीत समाधान पावलेल्या बाळासारख अविचल आणि शांत आहे. 4इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव. त्याच्यावर आता आणि सदैव विश्वास ठेवत राहा.