1परमेश्वराची स्तुती करा. स्वर्गातल्या देवदूतांनो स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा.
1Aleluya. ALABAD á Jehová desde los cielos: Alabadle en las alturas.
2सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा. त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
2Alabadle, vosotros todos sus ángeles: Alabadle, vosotros todos sus ejércitos.
3सूर्य - चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा. त्याऱ्यांनो आणि आकाशातील दिव्यांनो, त्याची स्तुती करा.
3Alabadle, sol y luna: Alabadle, vosotras todas, lucientes estrellas.
4सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा. आकाशावरील जलाशयांनो, त्याची स्तुती करा.
4Alabadle, cielos de los cielos, Y las aguas que están sobre los cielos.
5परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा. का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली.
5Alaben el nombre de Jehová; Porque él mandó, y fueron criadas.
6देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती त्या सदैव राहाव्यात म्हणून केली. देवाने कधीही न संपणारे नियम केले.
6Y las hizo ser para siempre por los siglos; Púso les ley que no será quebrantada.
7पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींनो, परमेश्वराची स्तुती करा. महासागरातल्या सागरी प्राण्यांनो, परमेश्वराची स्तुती करा.
7Alabad á Jehová, de la tierra Los dragones y todos los abismos;
8देवाने अग्न्नी आणि गारा, बर्फ आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली.
8El fuego y el granizo, la nieve y el vapor, El viento de tempestad que ejecuta su palabra;
9देवाने टेकड्या आणि पर्वत फळ झाडे आणि देवदार वृक्ष निर्मिले.
9Los montes y todos los collados; El árbol de fruto, y todos los cedros;
10देवाने सर्व जंगली प्राणी आणि पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले.
10La bestia y todo animal; Reptiles y volátiles;
11देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले. त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले.
11Los reyes de la tierra y todos los pueblos; Los príncipes y todos los jueces de la tierra;
12देवाने तरुण आणि तरुणी निर्मिल्या. देवाने वृध्द आणि तरुण माणसे निर्माण केली.
12Los mancebos y también las doncellas; Los viejos y los niños,
13परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा. त्याच्या नावाला सदैव मान द्या. स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.
13Alaben el nombre de Jehová, Porque sólo su nombre es elevado; Su gloria es sobre tierra y cielos.
14देव त्याच्या माणसांना बलवान करील. लोक त्याच्या भक्तांची स्तुती करतील. लोक इस्राएलची स्तुती करतील. हेच ते लोक ज्यांच्यासाठी देव लढतो. परमेश्वराची स्तुती करा.
14El ensalzó el cuerno de su pueblo; Aláben le todos sus santos, los hijos de Israel, El pueblo á él cercano. Aleluya.