Russian 1876

Marathi

Lamentations

4

1Как потускло золото, изменилось золото наилучшее! камни святилища раскиданы по всем перекресткам.
1सोने कसे निस्तेज झाले आहे पाहा! चांगले सोने कसे बदलले आहे बघा! रत्ने सगळीकडे पसरली आहेत. रस्त्याच्या नाक्या-नाक्यावर ती विखुरली आहेत.
2Сыны Сиона драгоценные, равноценные чистейшему золоту, как они сравнены с глиняною посудою, изделием рук горшечника!
2सियोमच्या लोकांची किंमत भारी आहे. ते आपल्या वजनाचे मोल सोन्यात ठरवितात. पण आता शत्रू त्यांना मातीच्या जुन्या रांजणांप्रमाणे मानतो. कुंभाराने केलेल्या मडक्याप्रमाणे तो त्यांना किंमत देतो.
3И чудовища подают сосцы и кормят своих детенышей, а дщерь народа моего стала жестока подобно страусам в пустыне.
3राजकुत्रेसुध्दा आपल्या पिल्लांना भरवितात. कोल्हीही आपल्या पिल्लांना दुध देते. पण माझ्या लोकांची कन्या दुष्ट आहे. त्या वाळवंटात राहणाऱ्या शहामृगाप्रमाणे आहेत.
4Язык грудного младенца прилипает к гортани его от жажды; дети просят хлеба, и никто не подает им.
4तान्ह्या मुलांची जीभ तहानेने टाळ्याला चिकटली आहे. बालके भाकरी मागतात. पण त्यांना कोणीही भाकरी देत नाही.
5Евшие сладкое истаевают на улицах; воспитанные на багрянице жмутся к навозу.
5एकेकाळी ज्यांनी पौष्टिक अन्न खाल्ले, तेच आता रस्त्यावर मरत आहेत. जे चांगल्या, लाल कपड्यात वाढले, ते आता कचऱ्याच्या ढिगांतून मिळेल ते उचलतात.
6Наказание нечестия дщери народа моего превышает казнь за грехи Содома: тот низринут мгновенно, и руки человеческие не касались его.
6माझ्या लोकांच्या मुलीचे पाप मोठे होते. सदोम व गमोरा यांच्यापेक्षाही ते पाप मोठे होते. सदोमचा व गमोराचा अचानक नाश झाला, आणि त्यात कोठल्याही माणसाचा हात नव्हता.
7Князья ее были в ней чище снега, белее молока; они были телом краше коралла, вид их был, как сапфир;
7यहुदातील काही लोकांनी एका विशेष प्रकारे आपले जीवन देवाला वाहिले होते. ते फार शुध्द होते. ते हिमापेक्षा शुभ्र होते. दुधापेक्षा पांढरे होते. त्यांची कांती पोवळयांप्रमाणे लाल होती. त्यांच्या दाढ्या म्हणजे जणू काही तेजस्वी इंद्रनीलच.
8а теперь темнее всего черного лице их; не узнают их на улицах; кожа их прилипла к костям их, стала суха, как дерево.
8पण आता त्यांचे चेहरे काजळीपेक्षा काळे झाले आहेत. त्यांना रस्त्यांत कोणी ओळखतसुध्दा नाही. त्यांची कातडी सुरकुतली आहे. लाकडाप्रमाणे शुष्क होऊन ही हाडाला चिकटली आहे.
9Умерщвляемые мечом счастливее умерщвляемых голодом, потому что сии истаевают, поражаемые недостатком плодов полевых.
9उपासमारीने मरण्यापेक्षा तलवारीने मेलेले बरे! कारण उपासमार झालेले फारच दु:खी होते. ते व्याकुळ झाले होते. शेतामधून काहीच न मिळाल्यामुळे ते मेले.
10Руки мягкосердых женщин варили детей своих, чтобы они были для них пищею во время гибели дщери народа моего.
10त्या वेळी, प्रेमळ बायकांनीसुध्दा आपली मुले शिजविली ती मुलेच त्यांच्या आयांचे अन्न झाले. माझ्या लोकांचा नाश झाला. तेव्हा असे घडले.
11Совершил Господь гнев Свой, излил ярость гнева Своего и зажег на Сионе огонь, который пожрал основания его.
11परमेश्वराने आपला सगळा क्रोध प्रकट केला. त्यांने आपला सगळा राग बाहेर काढला. त्याने सियोनमध्ये आग लावली त्या आगीत पायापर्यंत सियोन बेचिराख झाले
12Не верили цари земли и все живущие во вселенной, чтобы враг инеприятель вошел во врата Иерусалима.
12जगातील राजे, जे घडले त्यावर विश्वास ठेवू शकले नाहीत. पृथ्वीवरील लोकांचा ह्यावर विश्वास बसला नाही. यरुशलेमच्या प्रवेशद्वारांतून शत्रू येऊ शकेल ह्यवर कोणाचाच विश्वास बसला नाही.
13Все это – за грехи лжепророков его, за беззакония священников его, которые среди него проливали кровь праведников;
13यरुशलेमच्या संदेष्ट्यांनी पाप केले, धर्मगुरुंनी दुष्कृत्ये केली, लोकांनी प्रामाणिक माणसांचे रक्त यरुशलेममध्ये सांडले, म्हणूनच असे घडले.
14бродили как слепые по улицам, осквернялись кровью, так что невозможно было прикоснуться к одеждам их.
14संदेष्टे आणि याजक आंधळयांप्रमाणे रस्त्यात भटकत होते. ते रक्ताने माखले होते. कोणीही त्यांच्या वस्त्रालाही शिवू शकले नाहीत कारण ती रक्ताने भरली होती.
15„Сторонитесь! нечистый!" кричали им; „сторонитесь, сторонитесь, не прикасайтесь"; и они уходили в смущении; а между народом говорили: „их более не будет!
15लोक ओरडले, “लांब व्हा! दूर ब्ह! आम्हाला शिवू नका.” ते लोक इकडे तिकडे भटकले कारण त्यांना घरे नव्हती. दुसऱ्या राष्ट्रांतील लोक म्हणाले, “त्यांनी आमच्याबरोबर राहू नये असेच आम्हाला वाटते.”
16лице Господне рассеет их; Он уже не призрит на них", потому чтоони лица священников не уважают, старцев не милуют.
16परमेश्वराने स्वत: त्या लोकांचा नाश केला. त्याने त्यांची अजिबात काळजी घेतली नाही. त्यांने याजकांना मानले नाही त्यांने यहुदातील वृध्दांना दया दाखवली नाही.
17Наши глаза истомлены в напрасном ожидании помощи; со сторожевой башни нашей мы ожидали народ, который не мог спасти нас.
17मदतीची वाट पाहून आमचे डोळे थकले आहेत. पण कोठूनही मदत मिळत नाही. आमचेरक्षण करण्यास एखादे राष्ट्र येत आहे का, ह्यची आम्ही बुरुजावरुन टेहळणी केली. पण एकही देश आमच्याकडे आला नाही.
18А они подстерегали шаги наши, чтобы мы не могли ходить по улицам нашим; приблизился конец наш, дни наши исполнились; пришел конец наш.
18सर्वकाळ, आमच्या शत्रूंनी आमची शिकार केली. आम्ही रस्त्यांवरसुध्दा जाऊ शकलो नाही. आमचा शेवट जवळ आला! आमचे आयुष्य सरले होते! आमचा अंत आला!
19Преследовавшие нас были быстрее орлов небесных; гонялись за нами по горам, ставили засаду для нас в пустыне.
19आमचा पाठलाग करणारे गरुडापेक्षाही वेगवान होते. त्यांनी आमचा डोंगरांत पाठलाग केला. आम्हाला पकडण्यासाठी ते वाळवंटात दडून बसले.
20Дыхание жизни нашей, помазанник Господень пойман в ямы их, тот, о котором мы говорили: „под тенью его будем жить среди народов".
20आमच्या दृष्टीने राजा सर्वश्रेष्ठ होता. तो आमचा श्वास होता. पण त्यांनी राजाला सापळ्यात पकडले. प्रत्यक्ष परमेश्वरानेच राजाची निवड केली होती. राजाबद्दल आम्ही असे म्हणालो होतो, “आम्ही त्याच्या सावलीत राहू. तो इतर राष्ट्रांपासून आमचे रक्षण करतो.”
21Радуйся и веселись, дочь Едома, обитательница земли Уц! И до тебя дойдет чаша; напьешься допьяна и обнажишься.
21अदोमच्या लोकांनो, आनंदित व्हा. ऊस देशात राहणाऱ्यांनो, हर्षित व्हा. पण लक्षात ठेवा की परमेश्वराच्या क्रोधाचा प्याला तुमच्याकडेसुध्दा येईल. तुम्ही जेव्हा त्यातील पेय (शिक्षा) प्याल, तेव्हा झिंगाल आणि विवस्त्र व्हाल.
22Дщерь Сиона! наказание за беззаконие твое кончилось; Он не будет более изгонять тебя; но твое беззаконие, дочь Едома, Он посетит и обнаружит грехи твои.
22सियोन, तुझी शिक्षा संपली. आता पुन्हा तुला कैद करुन नेले जाणार नाही. पण अदोमवासीयांनो, तुमची पापे उघडी करुन परमेश्वर तुम्हाला शिक्षा करील.