1(113:9) Не нам, Господи, не нам, но имени Твоему дай славу, ради милости Твоей, ради истины Твоей.
1परमेश्वरा, आम्हाला कुठलाही सन्मान मिळायला नको. सन्मान तुझा आहे, तुझ्या प्रेमामुळे आणि आमच्या तुझ्यावर असलेल्या विश्वासामुळे सन्मान तुझा आहे.
2(113:10) Для чего язычникам говорить: „где же Бог их"?
2आमचा देव कुठे आहे, याचा राष्ट्रांना का विचार पडावा?
3(113:11) Бог наш на небесах; творит все, что хочет.
3देव स्वर्गात आहे आणि त्याला हवे ते तो करतो.
4(113:12) А их идолы – серебро и золото, дело рук человеческих.
4त्या देशांचे “देव” सोन्या चांदीचे नुसते पुतळे आहेत. कुणीतरी केलेले ते नुसते पुतळे आहेत.
5(113:13) Есть у них уста, но не говорят; есть у них глаза, но не видят;
5त्या पुतळ्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही. त्यांना डोळे आहेत पण बघता येत नाही.
6(113:14) есть у них уши, но не слышат; есть у них ноздри, но не обоняют;
6त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे पण वास घेता येत नाही.
7(113:15) есть у них руки, но не осязают; есть у них ноги, но не ходят; и они не издают голоса гортанью своею.
7त्यांना हात आहेत पण हाताने स्पर्श करत नाही. त्यांना पाय आहेत पण चालता येत नाही आणि त्यांच्या घशातून कुठलाही आवाज येत नाही.
8(113:16) Подобны им да будут делающие их и все, надеющиеся на них.
8ज्या लोकांनी असे पुतळे केले आणि त्यावर जे विश्वास ठेवतात ते त्या पुतळ्यांसारखेच होतात.
9(113:17) Дом Израилев! уповай на Господа: Он наша помощь и щит.
9इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
10(113:18) Дом Ааронов! уповай на Господа: Он наша помощь и щит.
10अहरोनच्या कुटुंबा, परमेश्वरावर विश्वास ठेव. परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
11(113:19) Боящиеся Господа! уповайте на Господа: Он наша помощь и щит.
11परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वराच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
12(113:20) Господь помнит нас, благословляет нас , благословляетдом Израилев, благословляет дом Ааронов;
12परमेश्वर आमची आठवण ठेवतो. परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल. परमेश्वर इस्राएलला आशीर्वाद देईल. परमेश्वर अहरोनच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.
13(113:21) благословляет боящихся Господа, малых с великими.
13परमेश्वर त्याच्या लहान आणि मोठ्या भक्तांना आशीर्वाद देईल.
14(113:22) Да приложит вам Господь более и более, вам и детям вашим.
14परमेश्वर तुला आणि तुझ्या मुलांना अधिकाधिक आशीर्वाद देईल. अशी मी आशा करतो.
15(113:23) Благословенны вы Господом, сотворившим небо и землю.
15परमेश्वरानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आणि परमेश्वर तुमचे स्वागत करतो.
16(113:24) Небо – небо Господу, а землю Он дал сынам человеческим.
16स्वर्ग परमेश्वराचा आहे. पण त्यांने लोकांना पृथ्वी दिली.
17(113:25) Ни мертвые восхвалят Господа, ни все нисходящие в могилу;
17मृत लोक परमेश्वराची स्तुती करीत नाहीत. जे लोक खाली थडग्यात आहेत ते परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
18(113:26) но мы будем благословлять Господа отныне и вовек. Аллилуия.
18पण आता आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो आणि आम्ही त्याला सदैव धन्य मानू. परमेश्वराची स्तुती करा.